पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' मध्ये देशवासियांना डिजिटल जनगणना 2027 मध्ये सहभागी होऊन ती यशस्वी करण्याचे आवाहन केले.
April 26th, 11:30 am
या महिन्याच्या 'मन की बात' भागात, पंतप्रधान मोदींनी अणू आणि पवन ऊर्जा क्षेत्रातील भारताच्या प्रगतीवर प्रकाश टाकला. त्यांनी भगवान बुद्धांची शिकवण, 'बीटिंग रिट्रीट' सोहळा, निसर्ग संवर्धन, बांबू क्षेत्र, प्राचीन ग्रंथ आणि 'गणितीय ऑलिम्पियाड कार्यक्रम' यासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले. पंतप्रधानांनी सध्या सुरू असलेल्या डिजिटल जनगणनेच्या मोहिमेबद्दलही माहिती दिली आणि सर्वांना या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले.ऑस्ट्रियाच्या चॅन्सलरसोबत संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी केलेले निवेदन
April 16th, 11:55 am
चार दशकांनंतर ऑस्ट्रियाच्या चॅन्सलर यांचा हा भारत दौरा अतिशय महत्त्वाचा आहे. वर्ष 2026 च्या ऐतिहासिक भारत-युरोपीय महासंघासोबतच्या मुक्त व्यापार करारानंतर, भारत आणि युरोपीय महसंघ यांच्यातील संबंधांमध्ये एका नव्या सुवर्णयुगाची सुरुवात झाली आहे. चॅन्सेलर स्टॉकर यांच्या दौऱ्यामुळे आम्ही भारत-ऑस्ट्रिया संबंधांनाही एका नव्या युगात घेऊन जात आहोत.राष्ट्रसेवेला व मानवतेला समर्पित भावना व्यक्त करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक
February 11th, 10:31 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रसेवेला व मानवतेला समर्पित असल्याची भावना व्यक्त करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.