PM shares a Subhashitam emphasising how true strength lies in collective solidarity
January 05th, 09:17 am
In a heartfelt tribute to India’s timeless culture and spiritual heritage, PM Modi today shared a Sanskrit verse reflecting how India’s civilisational journey has endured through the collective strength of its people, who have protected the nation’s cultural legacy with unwavering commitment.भगवान बुद्ध यांच्याशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मराठी अनुवाद
January 03rd, 12:00 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी गजेंद्र सिंह शेखावत जी, किरण रिजिजू जी, रामदास आठवले जी, राव इंद्रजीत जी, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होता, त्यांना निघावे लागले आणि दिल्लीचे सर्व मंत्री सहकारी, दिल्लीचे नायब राज्यपाल सक्सेना जी, महामहीम, राजनैतिक समुदायाचे सर्व माननीय सदस्य, बौद्ध विद्वान, धम्माचे अनुयायी, भगिनी आणि बंधुंनो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन
January 03rd, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात, ‘द लाईट अँड द लोटस: रेलिक्स ऑफ द अवेकन्ड वन’ (प्रकाश आणि कमळ: प्रबुद्धाचे अवशेष) असे शीर्षक असणाऱ्या, भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन केले. सव्वाशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताचा वारसा परत आला आहे, भारताचा ठेवा परत आला आहे, असे या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले. आजपासून भारतातील लोकांना भगवान बुद्धांचे हे पवित्र अवशेष पाहता येतील आणि त्यांचे आशीर्वाद घेता येतील, असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी या पावन प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. बौद्ध परंपरेशी संबंधित भिक्खू आणि धर्माचार्य देखील यावेळी उपस्थित असल्याचे त्यांनी नमूद केले आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. भिक्खू आणि धर्माचार्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला नवी ऊर्जा मिळत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. 2026 या वर्षाच्या अगदी सुरुवातीला होणारा हा मंगल सोहळा अत्यंत प्रेरणादायी आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. भगवान बुद्धांच्या आशीर्वादाने 2026 हे वर्ष जगासाठी शांतता, समृद्धी आणि सलोख्याचा नवा अध्याय घेऊन येवो, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
December 31st, 01:51 pm
अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या पावन प्रसंगी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आणि जगभरातील भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.'विकसित भारत'चा संकल्प निश्चितच पूर्ण होईल: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
December 28th, 11:30 am
2025 मध्ये भारताने राष्ट्रीय सुरक्षा, क्रीडा, विज्ञान प्रयोगशाळा आणि जागतिक व्यासपीठांवर आपला ठसा उमटवल्याचे पंतप्रधान मोदी मन की बातच्या या वर्षातील शेवटच्या भागात म्हणाले. 2026 मध्ये देश नवीन संकल्पांसह पुढे जाण्यासही सज्ज असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग, क्विझ स्पर्धा, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2025 आणि फिट इंडिया चळवळ यासारख्या युवा-केंद्रित उपक्रमांवरही पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.आसाममधील नामरूप येथील युरिया प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
December 21st, 04:25 pm
ही वीरांची भूमी आहे. सौलुंग सुकाफा, महावीर लचित बोरफुकन, भीमबर देउरी, शहीद कुसल कुवर, मोरान राजा बोडौसा, मालती मेम, इंदिरा मिरी, स्वर्गदेव सर्वानंद सिंह आणि वीरांगना सती साधनी यांसारख्या महान व्यक्तींनी ही भूमी पवित्र केली आहे. अशा या वरच्या आसामच्या मातीत मी आदराने नमन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आसाममधील दिब्रुगड मधील नामरूप इथे आसाम व्हॅली फर्टिलायझर अँड केमिकल कंपनी लिमिटेडच्या वतीने उभारल्या जात असलेल्या अमोनिया-युरिया खत प्रकल्पाची पायाभरणी
December 21st, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आसाममधील दिब्रुगड मधील नामरूप इथे आसाम व्हॅली फर्टिलायझर अँड केमिकल कंपनी लिमिटेडच्या वतीने उभारल्या जात असलेल्या अमोनिया-युरिया खत प्रकल्पाची पायाभरणी झाली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. ही भूमी चाओलंग सुखाफा आणि महावीर लाचित बोरफुकन यांसारख्या महान वीरांची भूमी असल्याचे त्यांनी नमूद केले. भीमबर देउरी, शहीद कुशल कुंवर, मोरान राजा बौदोसा, मालती मेम, इंदिरा मिरी, स्वर्गदेव सर्वानंद सिंग आणि पराक्रमी सती साधनी यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेखही त्यांनी यावेळी केला. या शौर्य आणि बलिदानाच्या महान भूमीला, उजनी आसामच्या पवित्र मातीला आपण नमन करत असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत दीपावलीचा समावेश झाल्याचे पंतप्रधानांकडून स्वागत
December 10th, 12:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत दीपावलीचा समावेश झाल्याबद्दल आनंद आणि अभिमान व्यक्त केला.युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा समितीच्या विसाव्या सत्राला भारतात प्रारंभ झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
December 08th, 08:53 pm
युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा समितीच्या विसाव्या सत्राला भारतात प्रारंभ झाल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आहे. जगभरातील जागत्या परंपरांना संरक्षित आणि लोकप्रिय करण्याचा सामायिक दृष्टिकोन असणारे जवळपास 150 हून जास्त देशांमधले प्रतिनिधी या चर्चासत्राला आले आहेत असे त्यांनी सांगितले.वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेतील विशेष चर्चेमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 08th, 12:30 pm
मी आपले आणि सदनातील सर्व माननीय सदस्यांचे हार्दिक आभार मानतो, आपण या महत्त्वाच्या क्षणानिमित्त एक सामूहिक चर्चेचा निर्णय घेतला. ज्या मंत्राने, ज्या जयघोषाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला ऊर्जा दिली होती, प्रेरणा दिली होती, त्याग आणि तपस्येचा मार्ग दाखवला होता, त्या वंदे मातरमचे पुण्यस्मरण करणे, हे या सदनातील आपल्या सर्वांचे खूप मोठे भाग्य आहे. आणि आपल्यासाठी ही अभिमानाची बाब आहे की वंदे मातरमच्या 150 वर्षांनिमित्त या ऐतिहासिक प्रसंगाचे आपण साक्षीदार ठरत आहोत. एक असा कालखंड जो आपल्या समोर इतिहासातल्या अगणित घटना समोर घेऊन येतो. ही चर्चा सदनाची वचनबद्धता तर प्रकट करेलच त्याचसोबत आगामी पिढ्यांसाठीही, प्रत्येक पिढीसाठी शिकवण ठरू शकेल, जर आपण सर्वांनी मिळून याचा सदुपयोग केला तर.वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत आयोजित विशेष चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
December 08th, 12:00 pm
वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत आयोजित विशेष चर्चेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. या अत्यंत विशेष प्रसंगी, सामुहिक चर्चेचा मार्ग निवडल्याबद्दल पंतप्रधानांनी सदनातील सर्व सन्माननीय सदस्यांप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले की, त्याग आणि तपश्चर्येचा मार्ग दाखवत देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला उर्जा आणि प्रेरणा देणारा वंदे मातरम हा मंत्र आणि हे आवाहन आपण स्मरतो आहोत ही सभागृहातील सर्वांसाठी अत्यंत विशेष बाब आहे.आपल्या देशाला वंदे मातरमची ऐतिहासिक अशी 150 वी वर्षपूर्ती पाहायला मिळते आहे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे हे त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधान म्हणाले की हा कालावधी आपल्यासमोर इतिहासातील असंख्य घटना उभ्या करतो.या चर्चेद्वारे सदनाची कटिबद्धता दर्शवण्यासोबतच जर सगळ्यांनी या चर्चेचा चांगला उपयोग करून घेतला तर ही चर्चा भविष्यातील पिढ्यांसाठी शिक्षणाचा स्त्रोत म्हणून देखील काम करू शकते यावर पंतप्रधानांनी अधिक भर दिला.हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 06th, 08:14 pm
येथे हिंदुस्तान टाइम्स शिखर परिषदेत देश-विदेशातील अनेक मान्यवर उपस्थित आहेत. आयोजकांचे आणि ज्यांनी आपले विचार मांडले त्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. थोड्याच वेळापूर्वी शोभना जींनी दोन मुद्दे मांडले, जे मी विशेष लक्षात घेतले आहेत. एक म्हणजे त्यांनी सांगितले की मागच्या वेळी मोदीजी आले होते, तेव्हा त्यांनी एक सूचना दिली होती. या देशात माध्यम संस्थांनी काय काम करावे, हे सांगण्याचे धैर्य कोणीही करू शकत नाही. पण मी ते केले होते, आणि मला आनंद आहे की शोभनाजी आणि त्यांच्या टीमने ते काम मोठ्या आवडीने केले. आणि देशाला – मी आत्ताच प्रदर्शन पाहून आलो – मी सर्वांना विनंती करतो की प्रदर्शन नक्की पाहा. या छायाचित्रकार सहकाऱ्यांनी त्या क्षणांना असे टिपले आहे की ते क्षण अमर झाले आहेत. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली आणि तीही मी ज्या शब्दांत समजलो, त्यांनी म्हटले की तुम्ही पुढेही… त्या असेही म्हणू शकल्या असत्या की तुम्ही पुढेही देशाची सेवा करत राहा, पण हिंदुस्तान टाइम्सने असे म्हटले की तुम्ही पुढेही अशीच सेवा करत राहा, यासाठी मी विशेष आभार व्यक्त करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत आयोजित हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप समिट 2025 या शिखर परिषदेला केले संबोधित
December 06th, 08:13 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत आयोजित हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप समिट 2025 या शिखर परिषदेला संबोधित केले. त्यांनी संमेलनात उपस्थित असलेल्या देशातील आणि परदेशातील अनेक मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीची दखलपूर्ण नोंद घेतली. त्यांनी आयोजकांना तसेच या परिषदेत आपले विचार मांडलेल्या सर्वांना अभिनंदनपर शुभेच्छाही दिल्या. शोभना यांनी उल्लेख केलेल्या दोन मुद्द्यांची आपण काळजीपूर्वक नोंद घेतली असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. त्यांनी आपल्या मागील भेटीचा संदर्भ दिला, त्यावेळी आपण त्यांना माध्यम समुहांतर्फे क्वचितच हाती घेतल्या जाणार्या गोष्टीबद्दल सुचवले होते याची आठवण त्यांनी करून दिली, आणि या समुहाने ते केले, असेही त्यांनी नमूद केले. शोभना आणि त्यांच्या चमूने उत्साहाने आपली सूचना पूर्ण केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. जेव्हा आपण प्रदर्शनाला भेट दिली, तेव्हा छायाचित्रकारांनी क्षण अशा पद्धतीने टिपले की ते अमर झाल्यासारखे वाटले असे ते म्हणाले. आपण ते प्रदर्शन पाहिले असून, सर्वांनी ते पाहावे, असे आवाहन त्यांनी केले. शोभना यांनी उल्लेख केलेल्या दुसर्या मुद्याच्या संदर्भानेही त्यांनी भाष्य केले. त्यांचे म्हणणे म्हणजे केवळ आपण देशाची सेवा करत राहावी अशी इच्छा नाही, तर हिंदुस्तान टाईम्सनेच आपण त्याच पद्धतीने सेवा करत राहावे, असे म्हटले आहे, असे म्हणत याबद्दल त्यांनी विशेष कृतज्ञताही व्यक्त केली.गोव्यामधील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्धापनदिन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
November 28th, 03:35 pm
आज या पवित्र प्रसंगी मनामध्ये खोलवर शांतता भरली आहे. साधू-संतांच्या सानिध्यामध्ये बसल्यानंतर आपोआपच आध्यात्मिक अनुभव येत असतो. इथे विशाल संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांमुळे लक्षात येते की, या मठाची शतकांपासूनच प्राचीन जीवंत शक्ती आजही वृद्धिंगत होत आहे. आज या समारंभाला मला उपस्थित राहता आले, याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान मानतो. इथे येण्यापूर्वी मला राम मंदिर आणि वीर विठ्ठल मंदिराचे दर्शन करण्याचे भाग्य लाभले. त्या शांत वातावरणाने या कार्यक्रमाच्या आध्यात्मिकतेला आणखी सखोलता प्राप्त झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्षपूर्ती समारंभाला केले संबोधित
November 28th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्षपूर्ती समारंभाला संबोधित केले. या पवित्र प्रसंगी आपले मन गहन शांतीने भरले आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. संतांच्या उपस्थितीत, त्यांच्या सोबत बसणे हा स्वतःच एक आध्यात्मिक अनुभव आहे, यावर त्यांनी भर दिला. येथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भक्तांमुळे या मठाची शतकानुशतके जुनी जिवंत शक्ती आणखी वाढली आहे, असे नमूद करून मोदी म्हणाले की, आज या समारंभात लोकांमध्ये उपस्थित राहणे हे आपले भाग्य आहे. येथे येण्यापूर्वी आपल्याला राम मंदिर आणि वीर विठ्ठल मंदिराला भेट देण्याचा सौभाग्य लाभले, असे त्यांनी सांगितले. तेथील शांतता आणि तिथल्या वातावरणामुळे या समारंभाची आध्यात्मिकता अधिक सखोल झाली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.उडुपी येथील श्रीकृष्ण मठातील लक्षकंठ गीता पारायण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
November 28th, 11:45 am
मी माझे भाषण सुरु करण्यापूर्वी — इथे काही मुलं चित्र काढून घेऊन आली आहेत. SPG चे लोक आणि स्थानिक पोलिस थोडी मदत करतील का, ती चित्रं गोळा करण्यासाठी? जर तुम्ही त्याच्या मागे तुमचा पत्ता लिहिला असेल, तर मी नक्कीच तुम्हाला आभारपत्र पाठवेन. ज्यांनी जे काही आणले असेल, ते देऊन टाका, ते गोळा करतील आणि मग तुम्ही निवांत बसू शकता. ही मुले इतकी मेहनत करतात, आणि कधी कधी, मीच त्यांच्या बाबतीत अन्याय करतो असं वाटतं, तेव्हा मला खूप वाईट वाटतं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील उडुपी येथील श्री कृष्ण मठातील 'लक्ष कंठ गीता पारायण' कार्यक्रमाला केले संबोधित
November 28th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातील उडुपी येथील श्री कृष्ण मठातील 'लक्ष कंठ गीता पारायण' कार्यक्रमाला संबोधित केले. भगवान श्रीकृष्णाचे दिव्य दर्शनाचे समाधान, श्रीमद् भगवद्गीतेच्या मंत्रांचा आध्यात्मिक अनुभव आणि इतक्या पूज्य संत आणि गुरूंची उपस्थिती, हे आपल्यासाठी एक परम भाग्य आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. हे असंख्य आशीर्वादांची प्राप्ती करण्यासारखे आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.कुरुक्षेत्र येथे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या 'शहीदी दिवसा'ला पंतप्रधानांनी केलेले भाषणv
November 25th, 04:40 pm
आजचा दिवस भारताच्या परंपरेचा एक अद्भुत संगम ठरला आहे. आज सकाळी मी रामायणाची नगरी अयोध्येत होतो आणि आता मी इथे गीतेची नगरी कुरुक्षेत्रात आलो आहे. आपण सर्व श्री गुरु तेग बहादुरजींच्या 350 व्या बलिदानदिनानिमित्त त्यांना वंदन करत आहोत. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व संतमहंतांना आणि उपस्थित मान्यवरांना आदरपूर्वक नमस्कार.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील कुरुक्षेत्र येथे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या 'शहीदी दिवसा'ला संबोधित केले
November 25th, 04:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणातील कुरुक्षेत्र येथे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या 'शहीदी दिवसा' निमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी नमूद केले की, आजचा दिवस भारताच्या वारशाचा एक उल्लेखनीय संगम आहे. सकाळी ते रामायणाची नगरी असलेल्या अयोध्येत होते आणि आता ते गीतेची नगरी असलेल्या कुरुक्षेत्रात आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले.श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या हौतात्म्य दिनानिमित्त सर्वजण त्यांना आदरांजली वाहत असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी कार्यक्रमात संत आणि आदरणीय समुदायाच्या उपस्थितीची दखल घेतली आणि सर्वांना आदराने वंदन केले.अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 25th, 10:20 am
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परम पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत जी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष पूज्य महंत नृत्य गोपाल दास जी, पूज्य संत समुदाय, येथे उपस्थित सर्व भक्तगण, देश आणि जगातून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनत असलेले कोट्यवधी रामभक्त, स्त्री-पुरुषहो!