“सबका साथ, सबका विकास – जनतेच्या आकांक्षांची पूर्तता” या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष संबोधन
March 09th, 10:30 am
अर्थसंकल्पानंतर आयोजित करण्यात आलेल्या या वेबिनार मालिकेतील आजचा हा चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा वेबिनार आहे. Fulfilling aspirations of people म्हणजेच जनतेच्या आकांक्षांची पूर्तता हा केवळ चर्चेचा विषय नाही; तो या अर्थसंकल्पाचा मुख्य उद्देश आहे आणि या सरकारचा संकल्पही आहे. या जनआकांक्षांची पूर्तता करण्यासाठी शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्य, पर्यटन, क्रीडा आणि संस्कृती अशी मूलभूत क्षेत्रे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे या वेबिनारमध्ये आपण या महत्त्वपूर्ण पैलूंवर चर्चा करत आहोत. अर्थसंकल्पातील घोषणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या क्षेत्रांशी संबंधित सर्व तज्ञ, धोरणनिर्माते, संशोधक, उद्योजक आणि माझे तरुण सहकारी – आपले विचार आणि सूचना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या चौथ्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारच्या सत्रात मी आपले मनःपूर्वक स्वागत आणि अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पानंतरच्या “सब का साथ सब का विकास – जनतेच्या आकांक्षांची पूर्तता” विषयक वेबिनारला केले संबोधित
March 09th, 10:15 am
अर्थसंकल्पानंतर सुरू करण्यात आलेल्या वेबिनार मालिकेतील चौथ्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेला संबोधित केले. ‘सब का साथ सब का विकास – जनतेच्या आकांक्षांची पूर्तता’ असा या भागाचा विषय होता. शिक्षण, कौशल्य, आरोग्य, पर्यटन, क्रीडा आणि संस्कृती ही क्षेत्रे जनतेच्या आकांक्षांच्या पूर्ततेसाठीची मुख्य साधने असल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले. अर्थसंकल्पातील घोषणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तज्ज्ञ आणि धोरणकर्त्यांचे त्यांनी स्वागत केले. “जनतेच्या आकांक्षा पूर्ण करणे हा केवळ एक विषय नाही; तर तो या अर्थसंकल्पाचा मुख्य उद्देश आणि सरकारचा निश्चय आहे,” असे मोदी यांनी स्पष्ट केले.पंतप्रधानांच्या मलेशिया दौऱ्याची फलिते
February 08th, 11:05 am
भारत सरकार आणि मलेशिया सरकार यांच्यातील दृक्-श्राव्य सह-निर्मितीसंदर्भातील करारमलेशियाच्या पंतप्रधानांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन
February 08th, 08:35 am
गेल्या वर्षी आसियान शिखर परिषदेसाठी माझी मलेशिया भेट होऊ शकली नव्हती. परंतु, मी माझ्या मित्राला लवकरच मलेशियात येण्याचे आश्वासन दिले होते.India Malaysia Joint Statement on the occasion of the Official visit by Prime minister of India to Malaysia
February 08th, 08:30 am
At the invitation of Prime Minister of Malaysia, His Excellency, Dato’ Seri Anwar Ibrahim, His Excellency, Shri Narendra Modi, Prime Minister of the Republic of India, undertook an official visit to Malaysia from 7 to 8 February 2026. The visit reflected the deep-rooted friendship and enduring people-to-people ties, based on civilizational connections between the two countries. It reaffirmed the shared commitment of the two Leaders to further consolidate and expand the India–Malaysia Comprehensive Strategic Partnership.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथिओपियाच्या पंतप्रधानांसोबत केली द्विपक्षीय चर्चा
December 17th, 12:02 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथिओपियाच्या फेडरल डेमोक्रॅटिक रिपब्लिकचे पंतप्रधान महामहिम डॉ. अबी अहमद यांची आज आदिस अबाबा येथील नॅशनल पॅलेसमध्ये भेट घेतली. पॅलेसमध्ये आगमनावेळी पंतप्रधान मोदी यांचे पंतप्रधान डॉ. अबी अहमद यांनी मनःपूर्वक स्वागत केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांचा औपचारिक सन्मान करण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स शिखर परिषदेतील पर्यावरण, कॉप 30 आणि जागतिक आरोग्य या विषयावरील सत्राला केले संबोधित
July 07th, 11:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ब्रिक्स शिखर परिषदेतील पर्यावरण, कॉप 30 आणि जागतिक आरोग्य या विषयावरील सत्राला संबोधित केले. या सत्राला ब्रिक्स समूहातील सदस्य देश, भागीदार राष्ट्र आणि आमंत्रित देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जगाच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या विषयांवर अधिवेशन आयोजित केल्याबद्दल त्यांनी ब्राझीलचे आभार मानले. भारतासाठी हवामान बदल हा केवळ ऊर्जेशी निगडित प्रश्न नसून जीवन आणि निसर्ग यांच्यातील समतोलावर परिणाम करणारा प्रश्न आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. हवामान न्याय या मुद्द्याकडे भारत नैतिक जबाबदारी या दृष्टिकोनातून बघत असून ती पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे, असे ते म्हणाले. हवामानाशी सुसंगत कृतीसाठी भारत पूर्णपणे वचनबद्ध असून त्यादिशेने नागरिक आणि आपल्या वसुंधरेच्या समृद्धी आणि विकासाकरता भारत, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी आघाडी, जागतिक जैवइंधन आघाडी, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स, मिशन लाईफ, एक पेड माँ के नाम इत्यादी उपक्रम राबवत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.ब्रिक्स सत्रात पर्यावरण, सीपीओ-30 आणि जागतिक आरोग्य विषयावर पंतप्रधानांचे निवेदन
July 07th, 11:13 pm
मला आनंद आहे की ब्राझीलच्या अध्यक्षतेखाली, ब्रिक्सने (ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका) पर्यावरण आणि आरोग्य सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांना उच्च प्राधान्य दिले आहे. हे विषय केवळ परस्पर संबंधित नाहीत, तर मानवतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.