पंतप्रधानांनी सर्वांना दिल्या नवरात्रीच्या शुभेच्छा
March 19th, 09:48 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रसंगी त्यांनी समृद्धी, आरोग्य व 'विकसित भारत'चा संकल्प पूर्ण व्हावा, अशी प्रार्थना केली.कृषी आणि ग्राम परिवर्तन या संकल्पनेवरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनामधील पंतप्रधानांच्या संबोधनाचा मराठी अनुवाद.
March 06th, 01:14 pm
अर्थसंकल्पोत्तर वेबिनार मालिकेतील तिसऱ्या वेबिनारमध्ये, मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. याआधी, तंत्रज्ञान, सुधारणा आणि आर्थिक विकास यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर दोन वेबिनार झाले आहेत. आज, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर चर्चा होत आहे. तुम्ही सगळ्यांनी अर्थसंकल्प तयार करण्यात तुमच्या मौल्यवान सूचनांच्या माध्यमातून खूप सहकार्य केले आणि तुम्ही पाहिले असेल, अर्थसंकल्पात तुम्हा सगळ्यांच्या सूचना प्रतिबिंबित झाल्या आहेत, खूप कामी आल्या आहेत. पण आता अर्थसंकल्प सादर झाला आहे, या अर्थसंकल्पानंतर त्याच्या पूर्ण क्षमतेचा लाभ देशाला मिळावा, या दिशेनेही तुमचा अनुभव, तुमच्या सूचना आणि सुलभ रितीने अर्थसंकल्पाचा जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळायला हवा. अर्थसंकल्पातील एकेक पैसा ज्या हेतूने दिला गेला आहे, तो पूर्ण कसा करता येईल? लवकरात लवकर कसा करता येईल? तुमच्या सूचना या वेबिनारसाठी खूप महत्वाच्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कृषी आणि ग्रामीण परिवर्तनावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित
March 06th, 01:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'कृषी आणि ग्रामीण परिवर्तन' या विषयावर भर असलेल्या तिसऱ्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित केले. तंत्रज्ञान आणि आर्थिक विकासाशी संबंधित मागील सत्रांचा संदर्भ देत पंतप्रधानांनी नमूद केले की, अर्थसंकल्प तयार करताना भागधारकांनी मोलाचे सहकार्य केले होते. आता, अर्थसंकल्पानंतर हे तितकेच महत्त्वाचे आहे की देशाला त्याच्या पूर्ण क्षमतेचा लाभ मिळावा, आणि या दृष्टीने तुमच्या सूचना आणि हा अर्थसंकल्पोत्तर वेबिनार अत्यंत महत्त्वाचा आहे, यावर मोदी यांनी यावर भर दिला.अबू धाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांचा भारत दौरा
February 19th, 05:45 pm
अबू धाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नहयान 18-19 फेब्रुवारी 2026 दरम्यान भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत.19 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ते भारतात आले आहेत. सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या त्यांच्या मागील भेटीनंतर ही त्यांची दुसरी अधिकृत भारत भेट आहे.India – France Joint Statement
February 18th, 08:10 am
At the invitation of Hon’ble Prime Minister of India, Shri Narendra Modi, President of the French Republic H.E. Mr. Emmanuel Macron paid an official visit to India from 17 to 19 February 2026 and participated in the Artificial Intelligence Impact Summit 2026. During the visit, the two leaders held bilateral talks and jointly inaugurated the 2026 India-France Year of Innovation in Mumbai on 17 February. This is President Macron’s 4th visit to India and it follows Prime Minister Modi’s visit to France in February 2025.फलनिष्पत्ती - फ्रेंच प्रजासत्ताकाच्या राष्ट्राध्यक्षांची भारतभेट
February 17th, 07:00 pm
भारत-फ्रान्स संबंध 'विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी' या दर्जापर्यंत उंचावणेपंतप्रधानांच्या हस्ते 13 फेब्रुवारीला सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन-1 आणि 2 चे उद्घाटन
February 12th, 12:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 1:30 वाजता सेवा तीर्थ इमारतींच्या संकुलातील नामफलकांचे अनावरण करण्यात येणार आहे. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन-1 आणि 2 चे औपचारिकरीत्या उद्घाटन करण्यात येणार असून सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ते सेवा तीर्थ येथे होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करतील.India – Seychelles Joint Vision for Sustainability, Economic Growth and Security through Enhanced Linkages
February 09th, 03:28 pm
At the invitation of Prime Minister Narendra Modi, the President of the Republic of Seychelles Dr. Patrick Herminie is on a State Visit to India. During their meeting on 9 February 2026, PM Modi and President Herminie had comprehensive and productive discussions covering the entire spectrum of bilateral relations. The two leaders reaffirmed Seychelles' role as an important pillar in India's MAHASAGAR Vision and announced a Joint Vision for SESEL.Seychelles is an integral part of India’s MAHASAGAR Vision: PM Modi at the India and Seychelles joint press meet
February 09th, 01:00 pm
While addressing the joint press meet with Seychelles President Patrick Herminie, PM Modi said that Seychelles is an integral part of India’s MAHASAGAR Vision. He announced a Special Economic Package of 175 million dollars for Seychelles and discussed further strengthening ties across multiple sectors. Both sides issued the India–Seychelles Joint Vision, which will serve as a roadmap for cooperation in the coming years.Prime Minister holds official talks with Prime Minister of Malaysia
February 08th, 11:19 am
PM Modi held productive talks with PM Anwar Ibrahim of Malaysia. The two leaders reviewed cooperation in areas such as energy, biotechnology, trade, IT and infrastructure. They agreed to further strengthen collaboration in sectors like defence, digital technologies, security, semiconductors and AI.मलेशियात भारतीय समुदायासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 07th, 03:59 pm
सर्वप्रथम, मी माझे प्रिय मित्र, पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांचे, या सामुदायिक उत्सवात सहभागी झाल्याबद्दल आभार मानतो. त्यांनी आत्ताच आपल्या भाषणात भारत-मलेशिया मैत्रीची व्याप्ती आणि भविष्यातील संधी इतक्या सुंदर शब्दांत व्यक्त केल्या, त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियातील क्वालालंपूर येथे एका सामुदायिक कार्यक्रमाला संबोधित केले
February 07th, 03:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मलेशियातील क्वालालंपूर येथे एका सामुदायिक कार्यक्रमाला संबोधित केले. या स्वागतातील उत्साहातून आपल्या परस्पर सामायिक संस्कृतीमधील सुंदर विविधतेचे प्रतिबिंब उमटल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. या सामुदायिक उत्सवात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी त्यांचे प्रिय मित्र पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांचे आभार मानले. पंतप्रधान अन्वर इब्राहिम आपल्याला विमानतळावर घेण्यासाठी आले होते आणि त्यांनी स्वतःच्या गाडीतून आपल्याला या कार्यक्रमात आणले, याचा दखलपूर्ण उल्लेख त्यांनी आपल्या संबोधनात केला. यातून पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांचे भारताप्रती आणि इथल्या लोकांसाठी असलेले प्रेम आणि आदराची भावना दिसून येते, असे पंतप्रधानांनी सांगितले.आरोग्य, दीर्घायुष्य आणि राष्ट्रसेवेसाठी आशीर्वाद मागणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक
February 06th, 11:53 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या अक्षय संस्कृतीच्या ज्ञानाकडे आपले लक्ष वेधत आरोग्य, दीर्घायुष्य आणि राष्ट्रसेवेच्या समर्पणासाठी देशाच्या सामूहिक आकांक्षेचे प्रतिबिंब दर्शविणारे आवाहन केले.व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी एलोइना रॉड्रिग्ज गोमेझ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला
January 30th, 09:05 pm
व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी एलोइना रॉड्रिग्ज गोमेझ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.केरळच्या आर्य वैद्यशाळा धर्मादाय रुग्णालयाच्या शताब्दी सोहळ्यात पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 28th, 02:39 pm
आज या प्रतिष्ठेच्या प्रसंगी, तुम्हा सर्वांशी जोडले जाणे माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. आयुर्वेदाचे जतन, संरक्षण आणि प्रसार करण्यात आर्य वैद्यशाळेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. आपल्या 125 वर्षांच्या प्रवासात या संस्थेने, आयुर्वेदाला उपचाराची एक सशक्त व्यवस्था म्हणून प्रस्थापित केले आहे. आज या निमित्ताने, मी आर्य वैद्यशाळेचे संस्थापक, वैद्यरत्नम पी. एस. वारियर जी यांच्या योगदानाचे स्मरण करतो. आयुर्वेदाप्रति त्यांचा दृष्टिकोन आणि लोककल्याणासाठी असलेले त्यांचे समर्पण, आजही आपल्याला प्रेरित करते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ मधील आर्य वैद्यशाळा धर्मादाय रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सोहळ्याला केले संबोधित
January 28th, 02:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे केरळमधील आर्य वैद्यशाळा धर्मादाय रुग्णालयाच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित केले. या पवित्र प्रसंगी प्रत्येकाला भेटण्याचा योग आल्याबद्दल आनंद वाटत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आर्य वैद्यशाळेने आयुर्वेदाचे जतन, संरक्षण आणि त्याला आधुनिक रुप देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे, आपल्या सव्वाशे वर्षांच्या प्रवासात या संस्थेने आयुर्वेदाला उपचारांची एक प्रभावी पद्धत म्हणून प्रस्थापित केले, असे ते म्हणाले. त्यांनी आर्य वैद्यशाळेचे संस्थापक, वैद्यरत्न पी.एस. वारियर यांच्या योगदानाचे स्मरण केले आणि आयुर्वेदाप्रति त्यांचा दृष्टिकोन आणि लोककल्याणासाठीची त्यांची निष्ठा आजही प्रेरणा देत आहे, असे सांगितले.भगवान स्वामी नारायण यांच्या शिक्षापत्रीच्या द्विशताब्दी सोहळ्यातील पंतप्रधानांचे भाषण
January 23rd, 02:12 pm
आपण सगळेच आज एका विशेष समारंभात सहभागी झालो आहोत. भगवान स्वामी नारायण यांच्या शिक्षापत्रीला दोनशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित केलेला हा सोहळा आणि या पावन सोहळ्यातील आपला सहभाग हा आपल्या सर्वांसाठी भाग्याचा दिवस आहे. आजच्या या पावन दिनी सर्व संतांना माझे नमन. भगवान स्वामी नारायण यांच्या करोडो भक्तांना या द्विशताब्दी सोहळ्याच्या शुभेच्छा आणि अभिनंदन.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षापत्री द्विशताब्दी महोत्सवाला केले संबोधित
January 23rd, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्य प्रणालीव्दारे संदेश सामायिक करत शिक्षापत्री द्विशताब्दी महोत्सवाबद्दलचे आपले विचार व्यक्त केले. आपण सर्वजण भगवान स्वामीनारायण यांच्या शिक्षापत्रीला 200 वर्षे पूर्ण होत असल्याचा, एक विशेष प्रसंग अनुभवत आहोत. हा द्विशताब्दी महोत्सव आणि या पवित्र क्षणांचा भाग होणे हा सर्वांसाठीच भाग्याचा प्रसंग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व संतांना वंदन केले, तसेच भगवान स्वामीनारायण यांच्या कोट्यवधी अनुयायांना द्विशताब्दी महोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.PM Narendra Modi receives a telephone call from the President of Brazil
January 22nd, 09:43 pm
Prime Minister Shri Narendra Modi received a telephone call today from the President of the Federative Republic of Brazil, His Excellency Mr. Luiz Inácio Lula da Silva.स्टार्टअप इंडियाच्या दशकपूर्ती कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण
January 16th, 01:30 pm
आताच मला स्टार्टअप क्षेत्रातील काही प्रतिनिधींशी संवाद साधण्याची, त्यांच्या यशकथा आणि प्रयोग जवळून पाहण्याची, तसेच त्यांचे अनुभव ऐकण्याची संधी मिळाली. कृषी, फिनटेक, गतिशीलता, आरोग्य आणि शाश्वतता या क्षेत्रांत कार्यरत स्टार्टअप्सच्या कल्पना केवळ मला नव्हे, तर सर्वांनाच प्रभावित करणाऱ्या आहेत. तरीही, तुमच्यातील आत्मविश्वास आणि तुमच्या उंचावलेल्या महत्त्वाकांक्षा यांनी मी भारावलो आहे.