हजरत इमाम हुसेन यांना पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

June 26th, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हजरत इमाम हुसेन (एएस) यांच्या सर्वोच्च त्यागाचे तसेच सत्य व न्यायाप्रति असलेल्या त्यांच्या अतूट वचनबद्धतेचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली. इमाम हुसेन यांचे जीवन व त्यांचे बलिदान हे धैर्य आणि दृढ विश्वासाच्या सामर्थ्याची निरंतर आठवण करून देणारे आहे, असे मोदी यांनी नमूद केले.

हजरत इमाम हुसैन (अ.स.) यांनी दिलेल्या बलिदानातून त्यांच्या धर्मनिष्ठेची प्रचिती येते: पंतप्रधान

July 06th, 08:10 am

हजरत इमाम हुसैन (अ.स.) यांनी दिलेल्या बलिदानातून त्यांच्या धर्मनिष्ठेची प्रचिती येते. प्रतिकूल परिस्थितीतही सत्य टिकवून ठेवण्याची प्रेरणा ते लोकांना देतात, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात व्यक्त केल्या आहेत.

आशुरा दिनानिमित्ताने हजरत इमाम हुसैन (अ.स.) यांच्या बलिदानाचे पंतप्रधानांकडून स्मरण

July 29th, 12:41 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशुरा दिनानिमित्ताने हजरत इमाम हुसेन (अ.स.) यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण केले.

अशुराच्या दिवशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजरत इमाम हुसैन (एएस )यांच्या बलिदानाचे स्मरण केले

August 09th, 12:38 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशुराच्या दिवशी प्रेषित मोहम्मदांचे नातू हजरत इमाम हुसेन (एएस) यांच्या बलिदानाचे स्मरण केले. सत्याप्रती अतूट वचनबद्धता आणि अन्यायाविरुद्धच्या लढ्यासाठी त्यांचे स्मरण केले जाते, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी आशुराच्या दिवशी हजरत इमाम हुसेन (एएस.) यांच्या हौतात्म्याचे केले स्मरण

August 20th, 01:57 pm

पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी यांनी आज आशुराच्या दिवशी हजरत इमाम हुसेन (एएस) यांच्या बलिदानाचे स्मरण केले आणि त्यांच्या धैर्याचे तसेच न्यायाप्रती असलेल्या त्यांच्या वचनबद्धतेचे स्मरण केले.