कर्नाटकातील हसन येथील अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी केला शोक व्यक्त
September 13th, 08:36 am
कर्नाटकातील हसन येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शोक व्यक्त केला. त्यांनी मृतांच्या नातेवाइकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले.