पंतप्रधानांनी हरियाणाच्या जनतेला हरियाणा दिनाच्या शुभेच्छा दिल्या
November 01st, 09:20 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणा दिनाच्या निमित्ताने हरियाणाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हरियाणाने आपल्या शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमांद्वारे, सैनिकांच्या अतुलनीय शौर्याद्वारे आणि तरुणांच्या उल्लेखनीय कामगिरीद्वारे नेहमीच देशासाठी प्रेरणास्थान म्हणून कार्य केले आहे, असे मोदी म्हणाले. त्यांनी राज्यातील सर्व नागरिकांना आनंदी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. राज्य विकासाच्या मार्गावर वेगाने प्रगती करत आहे, असे ते म्हणाले.