It is the need of the hour that we transform 'Vocal for Local' into a mass movement: PM Modi in Vadodara
May 11th, 06:15 pm
Addressing a special gathering during the inauguration of Sardardham Hostel in Vadodara, PM Modi said education, skill development and women’s empowerment are key to shaping India’s future workforce and entrepreneurial growth. Highlighting the impact of global economic challenges and the West Asia crisis, he urged citizens to support “Vocal for Local”, reduce dependence on imports, conserve foreign exchange and strengthen self-reliance through collective responsibility and everyday actions.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधल्या वडोदरा इथे सरदारधाम वसतिगृहाचे उद्घाटन
May 11th, 06:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वडोदरा, गुजरात इथे सरदारधाम वसतिगृहाचे उद्घाटन केले. वडोदरा इथल्या सरदारधाममध्ये एका प्रतिष्ठित मेळाव्याला संबोधित करताना, ज्या दिवशी सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा 75 वा वर्धापन दिन साजरा केला गेला, त्याच दिवशी शैक्षणिक संस्थांच्या उद्घाटनाचा आध्यात्मिक स्मरणाशी असलेल्या शुभ योगाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. यावेळी डॉ. दुष्यंत आणि दक्षा पटेल संकुलाचे उद्घाटन, अध्यापन सहाय्य योजनेचा शुभारंभ तसेच अनेक शैक्षणिक प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. पंतप्रधानांनी या विविध उपक्रमांचे वर्णन तरुणांच्या भावी करिअरसाठी 'लाँचिंग पॅड्स' असे केले. काही तासांपूर्वी मी प्रभास पाटण येथे सोमनाथ अमृत महोत्सव साजरा करत होतो आणि आता आपण इथे परिवर्तन घडवणाऱ्या शैक्षणिक संस्थांचे उद्घाटन करत आहोत, हा समन्वय वारसा आणि प्रगती एकत्रितपणे कशी पुढे जाते याचे प्रतीक आहे, असे मोदी यांनी नमूद केले.पंतप्रधान मोदींचे जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक भारतीयाला खंबीर आवाहन
May 10th, 08:39 pm
पंतप्रधान मोदींनी हैदराबादमधील एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी अलीकडील संघर्ष आणि पुरवठा साखळीतील विस्कळीतपणामुळे निर्माण झालेल्या जागतिक आर्थिक आव्हानांवर भाष्य केले आणि भारताची लवचिकता मजबूत करण्यासाठी सामूहिक राष्ट्रीय जबाबदारीचे आवाहन केले. आयातीवरील ताण कमी करण्यासाठी आणि परकीय चलन वाचवण्यासाठी त्यांनी नागरिकांना इंधन वापर कमी करणे, कारपूलिंगला प्रोत्साहन देणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले.Spiritual centres like Sri Adichunchanagiri Mahasamsthana Matha are great contributions of this sacred land: PM Modi in Mandya
April 15th, 11:10 am
PM Modi inaugurated Sri Guru Bhairavaikya Mandira at Sri Kshetra Adichunchanagiri Mahasamsthana Math in Mandya, Karnataka. Addressing the gathering, he observed that the Math serve as a moral and spiritual compass for the region, praising the current leadership for advancing its rich legacy with renewed vigour. The PM also presented nine appeals to the citizens for the realisation of a Viksit Bharat.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील मंड्या येथील श्री क्षेत्र आदिचुंचनगिरी येथे श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन केले
April 15th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातील मंड्या येथील श्री क्षेत्र आदिचुंचनगिरी येथे श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन केले. या सोहळ्याचा गहन अध्यात्मिक आशय अधोरेखित करत, पंतप्रधान मोदी यांनी श्री गुरु भैरवैक्य मंदिराच्या भव्य उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याची आपल्याला संधी मिळाली, याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, आणि अत्यंत उच्च अध्यात्मिक साधना असलेल्या संतांशी संवाद साधला. ऐतिहासिक ज्वाला पीठ या स्थळाला भेट आणि भाविकांच्या विशाल मेळाव्याला संबोधित केल्यावर आपल्या मनात उमटलेले भाव शब्दातीत असल्याचे त्यांनी नमूद केले. हा दिव्य अनुभव कायम आपल्या स्मरणात राहील, असे ते म्हणाले.Today, BJP stands for good governance and last-mile delivery: PM Modi
April 06th, 12:30 pm
PM Modi addressed BJP Karyakartas on the party’s Sthapana Diwas, paying tribute to generations of workers and their dedication, sacrifice and unwavering commitment. He reminisced about the early years when the BJP had neither power nor resources, and karyakartas travelled tirelessly to connect with people. He reiterated their belief in a brighter future for Bharat, which kept them going despite challenges like the Emergency, political isolation and violence.PM Modi addresses Party Karyakartas on BJP Sthapana Diwas
April 06th, 12:00 pm
PM Modi addressed BJP Karyakartas on the party’s Sthapana Diwas, paying tribute to generations of workers and their dedication, sacrifice and unwavering commitment. He reminisced about the early years when the BJP had neither power nor resources, and karyakartas travelled tirelessly to connect with people. He reiterated their belief in a brighter future for Bharat, which kept them going despite challenges like the Emergency, political isolation and violence.न्यूज 18 रायझिंग भारत समिटमधील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
February 27th, 08:30 pm
आपण सर्वजण रायझिंग भारताची चर्चा करत आहोत. आणि यामध्ये स्ट्रेंथ विदिन यावर तुम्हा सर्वांचा भर आहे, म्हणजेच सोप्या शब्दात सांगायचं तर, आपलं स्वतःचं सामर्थ्य हा तुमचा प्रमुख मुद्दा आहे. आणि आपल्याकडे शास्त्रांमध्ये तर म्हटलंच आहे - तत् त्वम असि! म्हणजे ज्या ब्रह्माच्या शोधात आपण निघालो आहोत, ते आपणच आहोच, ते आपल्यामध्येच आहे. जे सामर्थ्य आपल्या आतमध्येच आहे, तेच आपल्याला ओळखायचं आहे. गेल्या 11 वर्षांमध्ये भारताने आपलं तेच सामर्थ्य ओळखलं आहे, आणि हे सामर्थ्य आणखी सशक्त करण्यासाठी आज देश अविरत प्रयत्न करत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेटवर्क18 रायझिंग भारत शिखर परिषदेत भाषण
February 27th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्ट्रेंथ विदीन या विषयावर आधारित रायझिंग भारत शिखर परिषदेला संबोधित केले. पंतप्रधानांनी गेल्या 11 वर्षांतील भारताच्या प्रवासावर प्रकाश टाकत देशाचे गमावलेले सामर्थ्य पुन्हा प्राप्त करणे, आर्थिक स्वावलंबन आणि 2047 पर्यंत विकसित भारत बनविण्यासाठीचा आराखडा या मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले.मन की बात फेब्रुवारी 2026
February 22nd, 11:30 am
‘मन की बात’ मध्ये आपले स्वागत आहे, शुभेच्छा आहेत. (अभिनंदन आहे.) मन की बात हे देशाच्या आणि देशवासियांच्या कार्यकर्तृत्वाला (उपलब्धी) सर्वांसमोर आणण्यासाठी एक सशक्त व्यासपीठ आहे. नुकत्याच दिल्लीत संपन्न झालेल्या ग्लोबल एआय इम्पॅक्ट समिटमध्ये देशाने अशीच एक उपलब्धी पाहिली. अनेक देशांतील नेते, उद्योग क्षेत्रातील अग्रणी, नवोन्मेषक आणि स्टार्ट अप क्षेत्राशी संबंधित लोक, एआय इम्पॅक्ट समिटसाठी भारत मंडपम मध्ये एकत्र आले होते. आगामी एआय च्या शक्तीचा उपयोग जगभरात कसा केला जाईल या दृष्टीने ही शिखर परिषद एक महत्त्वाचे वळण ठरली.‘परीक्षा पे चर्चा 2026’ कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादाचा मजकूर
February 09th, 10:30 am
माझ्या प्रिय मित्रांनो, 'परीक्षा पे चर्चा' च्या या महत्त्वपूर्ण भागात तुमचे स्वागत आहे. यावेळचा परीक्षा पे चर्चा कार्यक्रम काहीतरी वेगळा आहे, काहीतरी खास आहे. अनेक विद्यार्थ्यांनी मला सूचना पाठवल्या होत्या की देशाच्या वेगवेगळ्या भागांतही परीक्षा पे चर्चा व्हायला पाहिजे. म्हणून यावेळी मी देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विद्यार्थ्यांसोबत बसून परीक्षा पे चर्चा केली आहे. या विशेष भागात तुम्हाला हेच पाहायला मिळणार आहे. तर चला प्रथम तामिळनाडूतील कोइम्बतूरला जाऊया. तामिळनाडूतील विद्यार्थ्यांची ऊर्जा आणि उत्सुकता पाहून मी खूप प्रभावित झालो. चला, पाहूया.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा 2026 च्या दुसऱ्या भागात कोईम्बतूर, रायपूर, देवमोगरा आणि गुवाहाटी येथील विद्यार्थ्यांशी साधला संवाद
February 09th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परीक्षा पे चर्चा 2026 च्या 9 व्या आवृत्तीला पुढे सुरू ठेवत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षा पे चर्चा 2026 च्या दुसऱ्या भागात पंतप्रधानांनी कोईम्बतूर, रायपूर, देवमोगरा आणि गुवाहाटी येथील 'एक्झॅम वॉरियर्स'शी अनौपचारिक संवाद साधला. 'परीक्षा पे चर्चा'च्या या विशेष आवृत्तीत विद्यार्थ्यांचे स्वागत करताना श्री मोदी यांनी नमूद केले की, यावेळी हा कार्यक्रम देशाच्या विविध भागांत आयोजित करण्यात आला आहे. कोईम्बतूर आवृत्तीची सुरुवात करताना पंतप्रधानांनी नमूद केले की, तामिळनाडूच्या विद्यार्थ्यांमधील ऊर्जा आणि कुतूहलाने ते मनापासून प्रभावित झाले आहेत. वणक्कम म्हणून त्यांचे स्वागत करत त्यांनी हलकाफुलका संवाद साधला. विद्यार्थ्यांनी आपला उत्साह व्यक्त करताना सांगितले की, त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता जेव्हा त्यांनी पंतप्रधानांना पाहिले; त्यांना वाटले होते की पंतप्रधानांचे आगमन खूप नाट्यमय असेल, परंतु त्यांना ते अत्यंत साधे, नम्र आणि जमिनीशी नाते असलेले वाटले. एका विद्यार्थ्याने आपला अनुभव सांगताना म्हटले की, पंतप्रधानांच्या आगमनाच्या वेळी त्यांना कमालीचे दडपण आल्यासारखे वाटत होते.“परीक्षा पे चर्चा 2026” कार्यक्रमात पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद
February 06th, 10:21 am
मी सानवी आचार्य, मी तुमच्याच राज्यातून म्हणजे गुजरातमधील आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे की, पालक आमची चिंता करतात आणि शिक्षक देखील आम्हाला मदत करतात. मात्र मुख्य मुद्दा तेव्हा येतो , जेव्हा शिक्षक आम्हाला अभ्यासाची एक वेगळी पद्धत सुचवतात. पालक वेगळ्या पद्धतीने सांगतात की या पॅटर्ननुसार अभ्यास करा आणि विद्यार्थ्यांमध्ये तर वेगळाच ट्रेंड सुरु असतो, त्यामुळे त्यावेळी आम्ही गोंधळून जातो की कोणती पद्धत बरोबर आहेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'परीक्षा पे चर्चा 2026' या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी साधला संवाद
February 06th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'परीक्षा पे चर्चा' (पीपीसी) च्या नवव्या भागात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी 'एक्झाम वॉरियर्स'सोबत अनौपचारिक संवाद साधला.अंदमान आणि निकोबार व्दीपसमूहावर पराक्रम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्य प्रणालीव्दारे केलेले भाषण
January 23rd, 05:15 pm
नमस्कार ! अंदमान-निकोबारचे नायब राज्यपाल अॅमिरल डी. के. जोशी, नेताजी सुभाषचंद्र बोस आयएनए न्यासाचे अध्यक्ष ब्रिगेडियर आर.एस. छिकारा, भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामधील सहभागी आणि आयएनएचे शाश्वत पुरूष लेफ्टनंट आर माधवन् !!अंदमान आणि निकोबार बेटांवरील पराक्रम दिन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले संबोधित
January 23rd, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अंदमान आणि निकोबार बेटांवरील पराक्रम दिन कार्यक्रमाला संबोधित केले. 23 जानेवारी हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचा दिन म्हणजे गौरवशाली तारीख असल्याचे त्यांनी नमूद केले. नेताजींचे शौर्य आणि धाडस आपल्याला प्रेरणा देते आणि आपले मन त्यांच्याबद्दलच्या आदराने भारून जाते असे ते म्हणाले. गेल्या काही वर्षांत पराक्रम दिन हा देशभावनेचा अविभाज्य सोहळा बनला आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.'विकसित भारत'चा संकल्प निश्चितच पूर्ण होईल: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
December 28th, 11:30 am
2025 मध्ये भारताने राष्ट्रीय सुरक्षा, क्रीडा, विज्ञान प्रयोगशाळा आणि जागतिक व्यासपीठांवर आपला ठसा उमटवल्याचे पंतप्रधान मोदी मन की बातच्या या वर्षातील शेवटच्या भागात म्हणाले. 2026 मध्ये देश नवीन संकल्पांसह पुढे जाण्यासही सज्ज असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग, क्विझ स्पर्धा, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2025 आणि फिट इंडिया चळवळ यासारख्या युवा-केंद्रित उपक्रमांवरही पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.नवी दिल्ली येथे वीर बाल दिवस कार्यक्रमामधील पंतप्रधानांचे संबोधन
December 26th, 01:30 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अन्नपूर्णा देवी, सावित्री ठाकूर, रवनीत सिंह, हर्ष मल्होत्रा, दिल्ली सरकारचे मंत्री महोदय, इतर मान्यवर, देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे उपस्थित असलेले सर्व अतिथी आणि माझ्या प्रिय बालकांनो !पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीर बाल दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले
December 26th, 01:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे 'वीर बाल दिना’निमित्त आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाला संबोधित केले. कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधानांनी देशभरातून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले आणि उपस्थित मुलांना संबोधित केले. ते म्हणाले की, आज देश वीर बाल दिवस साजरा करत आहे. यावेळी सादर झालेल्या वंदे मातरम या गीताच्या सुंदर सादरीकरणातून कलाकारांची निष्ठा आणि प्रयत्न ठळकपणे दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले.पंतप्रधान 27 आणि 28 डिसेंबर रोजी दिल्लीत मुख्य सचिवांच्या पाचव्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षपद भूषवतील
December 26th, 11:06 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 27 आणि 28 डिसेंबर 2025 रोजी दिल्ली येथे होणाऱ्या मुख्य सचिवांच्या पाचव्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवतील. राष्ट्रीय विकास प्राधान्यांवरील संरचित आणि शाश्वत संवादाद्वारे केंद्र-राज्य भागीदारी मजबूत करण्यासाठी ही परिषद आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. सहकारी संघराज्यवादाच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनावर आधारित, ही परिषद केंद्र आणि राज्यांना एकत्र आणणारे व्यासपीठ असून, भारताच्या मानवी भांडवल क्षमतेचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी आणि समावेशक, भविष्यासाठी तयार विकासाला गती देण्यासाठी एकात्मिक आराखडा तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे.