गुजरातमधील हंसलपूर येथे पर्यावरणपूरक वाहतूक उपक्रमांच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
August 26th, 11:00 am
गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, भारतातील जपानचे राजदूत केइची ओनो सान, सुजुकी मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष तोशिहिरो सुजुकी सान, मारुती सुजुकी इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक हिसाशी ताकेउची सान, अध्यक्ष आर. सी. भार्गव, हंसलपूर प्रकल्पातील सर्व कर्मचारी आणि उपस्थित मान्यवर.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील हंसलपूर येथे हरित गतिशीलता उपक्रमांचे उद्घाटन
August 26th, 10:30 am
हरित ऊर्जेच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने मोठी प्रगती करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील हंसलपूर येथे हरित गतिशीलता उपक्रमांचे उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी नमूद केले की गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणात भारताच्या 'मेक इन इंडिया' प्रवासात एक नवीन अध्याय जोडला जात आहे. मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड या सामायिक ध्येयाच्या दिशेने ही एक महत्त्वपूर्ण झेप आहे असे ते म्हणाले. आजपासून भारतात उत्पादित होणारी इलेक्ट्रिक वाहने 100 देशांमध्ये निर्यात केली जाणार आहेत यावर मोदी यांनी भर दिला. देशात हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोड उत्पादन सुरू झाल्याची घोषणा त्यांनी केली. आजचा दिवस भारत आणि जपानमधील मैत्रीला एक नवीन आयाम जोडत आहे यावर भर देत, पंतप्रधानांनी भारतातील सर्व नागरिकांचे , जपानचे आणि सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे मनापासून अभिनंदन केले.