आमचे सरकार भाविकांसाठी तीर्थयात्रेचा उत्तम अनुभव सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे : पंतप्रधान

January 13th, 06:17 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचे हज आणि उमरा मंत्री तौफिक बिन फवजान अल-रबिया यांच्यासमवेत करण्यात आलेल्या हज करार 2025 चे स्वागत केले आहे. हा करार भारतातील हज यात्रेकरूंसाठी चांगली बातमी आहे, असे मोदी म्हणाले. आमचे सरकार भाविकांसाठी तीर्थयात्रेचा उत्तम अनुभव सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे पंतप्रधान म्हणाले.