पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मध्ये उन्हाळ्याच्या उष्णतेपासून बचावासाठी उपाय सांगितले आणि नागरिकांना पुरेसे पाणी पिऊन शरीरात पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्याचा सल्ला दिला.
May 31st, 11:30 am
‘मन की बात’ मध्ये पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागांत आपल्या देशातले लोक देशहितासाठी, समाजहितासाठी अशा काही अद्भूत गोष्टी करत आहेत की, जेव्हा त्यांच्याबद्दल आपण ऐकतो तेव्हा आपल्याला एक नवीन प्रेरणा मिळते. आज कार्यक्रमाची सुरुवात मी ऍथलेटिक्समधील देशाच्या अशाच एका कामगिरीने करणार आहे. काही दिवसांपूर्वीच झारखंडच्या रांची येथे नॅशनल सिनियर ऍथलेटिक्स फेडरेशन स्पर्धा झाली. यामध्ये देशभरातून आलेल्या जवळजवळ 800 खेळाडूंनी भाग घेतला होता. यादरम्यान चार वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांमध्ये चार राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले. गुरिंदरवीर सिंह, विशाल टीके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार. या खेळाडूंनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केले. मी सर्वात आधी या सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.Samrat Samprati Museum is the heritage of millions of people in India, heritage of India's glorious past: PM Modi in Gandhinagar, Gujarat
March 31st, 10:25 am
PM Modi inaugurated the Samrat Samprati Sangrahalay, Jain Heritage Museum at Koba Tirth in Gandhinagar, Gujarat, on the auspicious occasion of Bhagwan Mahavir Janma Kalyanak. Speaking on the occasion, the PM said the Sangrahalay belongs to the crores of people of India and stands as a testament to our glorious past. Lauding the ahimsa philosophy of Samrat Samprati, he called on people to rise above personal aspirations and work for the nation.महावीर जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गांधीनगरमधील कोबा तीर्थ येथील सम्राट सम्प्रती संग्रहालयाचे उद्घाटन
March 31st, 10:15 am
भगवान महावीर जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गांधीनगरमधील कोबा तीर्थ येथील सम्राट सम्प्रती संग्रहालय या जैन वारसा संग्रहालयाचे उद्घाटन झाले. “कोबा तीर्थ आध्यात्मिक शांततेने भरुन गेले आहे, याठिकाणी अनेक जैन मुनींची आणि संतांची तपस्या फळाला आली आणि इथे सर्जनशीलता व सेवाभाव नैसर्गिकरित्या फुलला,” असे मोदी म्हणाले.पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' मध्ये पश्चिम आशियातील संकटावर मात करण्यासाठी 140 कोटी भारतीयांच्या एकजुटीवर विश्वास व्यक्त केला.
March 29th, 11:30 am
या महिन्याच्या 'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी पश्चिम आशियातील संघर्षावर भाष्य केले आणि या संकटावर मात करण्यासाठी एकजूट राहण्याच्या गरजेवर भर दिला. त्यांनी नागरिकांना अफवांना बळी न पडण्याचे आणि केवळ सरकारने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी ज्ञान भारतम सर्वेक्षण, खेळ आणि तंदुरुस्ती, जलसंधारण, मत्स्यपालन आणि सौर ऊर्जा अशा प्रमुख विषयांचाही उल्लेख केला.भगवान स्वामी नारायण यांच्या शिक्षापत्रीच्या द्विशताब्दी सोहळ्यातील पंतप्रधानांचे भाषण
January 23rd, 02:12 pm
आपण सगळेच आज एका विशेष समारंभात सहभागी झालो आहोत. भगवान स्वामी नारायण यांच्या शिक्षापत्रीला दोनशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित केलेला हा सोहळा आणि या पावन सोहळ्यातील आपला सहभाग हा आपल्या सर्वांसाठी भाग्याचा दिवस आहे. आजच्या या पावन दिनी सर्व संतांना माझे नमन. भगवान स्वामी नारायण यांच्या करोडो भक्तांना या द्विशताब्दी सोहळ्याच्या शुभेच्छा आणि अभिनंदन.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षापत्री द्विशताब्दी महोत्सवाला केले संबोधित
January 23rd, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्य प्रणालीव्दारे संदेश सामायिक करत शिक्षापत्री द्विशताब्दी महोत्सवाबद्दलचे आपले विचार व्यक्त केले. आपण सर्वजण भगवान स्वामीनारायण यांच्या शिक्षापत्रीला 200 वर्षे पूर्ण होत असल्याचा, एक विशेष प्रसंग अनुभवत आहोत. हा द्विशताब्दी महोत्सव आणि या पवित्र क्षणांचा भाग होणे हा सर्वांसाठीच भाग्याचा प्रसंग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व संतांना वंदन केले, तसेच भगवान स्वामीनारायण यांच्या कोट्यवधी अनुयायांना द्विशताब्दी महोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन 2025 ला संबोधित केले
October 31st, 06:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली मध्ये रोहिणी येथे आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन 2025 ला संबोधित केले. या प्रसंगी बोलताना मोदी म्हणाले की, आत्ताच ऐकलेल्या मंत्रांची ऊर्जा आपल्या सर्वांना अजूनही जाणवत आहे. आपण जेव्हा अशा संमेलनात येतो तेव्हा आपल्याला दैवी आणि विलक्षण अनुभव येतो, असे त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी या भावनेचे श्रेय स्वामी दयानंद यांच्या आशीर्वादाला दिले. पंतप्रधानांनी स्वामी दयानंद यांच्या आदर्शांबद्दल आदर व्यक्त केला. उपस्थित सर्व विचारवंतांबरोबरच्या अनेक दशकांच्या जिव्हाळ्याच्या संबंधांमुळे आपल्याला वारंवार त्यांच्यामध्ये येण्याची संधी मिळत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की जेव्हा ते त्यांना भेटतात आणि त्यांच्याशी संवाद साधतात तेव्हा त्यांच्या मनात एक वेगळीच ऊर्जा आणि एक अनोखी प्रेरणा निर्माण होते.नवी दिल्लीत ज्ञान भारतम् वरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधन
September 12th, 04:54 pm
आज विज्ञान भवन भारताच्या सुवर्ण भूतकाळाच्या पुनरुज्जीवनाचा साक्षीदार बनत आहे. काही दिवसांपूर्वीच, मी ज्ञान भारतम् अभियानाची घोषणा केली होती. आणि आज, इतक्या कमी वेळात, आपण ज्ञान भारतम् आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करत आहोत. त्याचे संकेतस्थळही नुकतेच सुरू करण्यात आले आहे. हा काही सरकारी किंवा शैक्षणिक कार्यक्रम नाही; ज्ञान भारतम् अभियान ही भारताची संस्कृती, साहित्य आणि चेतनेची घोषणा बनत आहे. हजारो पिढ्यांचे चिंतन, भारताचे महान ऋषीमुनी, आचार्य आणि विद्वानांचे ज्ञान आणि संशोधन, आपली ज्ञान परंपरा, आपला वैज्ञानिक वारसा, हे सर्व आपण ज्ञान भारतम् अभियानाद्वारे डिजिटल स्वरूपात आणणार आहोत. मी या अभियानासाठी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. मी ज्ञान भारतमच्या संपूर्ण चमूला आणि संस्कृती मंत्रालयालाही शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत ज्ञान भारतमवरील आंतरराष्ट्रीय परिषदेला केले संबोधित
September 12th, 04:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे ग्यान भारतम या आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित केले.या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, आज विज्ञान भवन भारताच्या सोनेरी भूतकाळाचे पुनरुत्थान पाहत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ग्यान भारतम मिशनची घोषणा केली होती आणि इतक्या कमी कालावधीत ही ग्यान भारतम आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. या मिशनशी संबंधित पोर्टलचेही उद्घाटन केल्याची मोदी यांनी माहिती दिली. हा कोणताही सरकारी किंवा शैक्षणिक कार्यक्रम नसून, ग्यान भारतम मिशन हे भारताची संस्कृती, साहित्य आणि चेतना यांचा उद्घोष बनेल, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी हजारो पिढ्यांच्या चिंतनशील परंपरेवर विचार व्यक्त केले. त्यांनी भारताच्या महान ऋषी, आचार्य आणि विद्वानांच्या ज्ञान आणि संशोधनाचा गौरव केला, तसेच भारताची ज्ञान परंपरा आणि वैज्ञानिक वारसा यावर भर दिला. मोदी म्हणाले की, ग्यान भारतम मिशनच्या माध्यमातून हा वारसा डिजिटाइज केला जात आहे. त्यांनी या मिशनसाठी सर्व नागरिकांचे अभिनंदन केले आणि संपूर्ण ग्यान भारतम टीम तसेच संस्कृती मंत्रालयाला शुभेच्छा दिल्या.नवी दिल्लीत होत असलेल्या ज्ञान भारतमसंबंधी आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये 12 सप्टेंबरला पंतप्रधान होणार सहभागी
September 11th, 04:57 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.30 च्या सुमारास नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे ज्ञान भारतमवरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होणार आहेत. हस्तलिखितांचे डिजिटायझेशन, जतन आणि सार्वजनिक प्रवेश म्हणजेच सर्वांसाठी ही हस्तलिखिते खुली करण्यासाठी समर्पित डिजिटल ज्ञान भारतम पोर्टलचेही उद्घाटन पंतप्रधान करतील. तसेच याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित करतील.