पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेरा सचखंड बल्लनला भेट दिली

February 01st, 09:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंजाब मधील डेरा सचखंड बल्लन ला भेट दिली. श्री गुरु रविदास महाराज जी यांच्या जयंतीदिनी डेरा सचखंड बल्लनला दिलेली भेट विशेष अनुभूती होती, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी संत निरंजन दास जी यांची घेतली भेट

February 01st, 07:21 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संत निरंजन दास जी यांची डेरा सचखंड बल्लान येथे गुरु रविदास महाराज जी यांच्या जयंतीच्या विशेष प्रसंगी भेट घेतली. समाजासाठी केलेल्या प्रेरणादायी सेवेसाठी त्यांना अलीकडेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

आदमपूर विमानतळाला ‘श्री गुरु रविदास महाराज जी विमानतळ’ असे नाव देणे ही श्री गुरु रविदास महाराज जी यांच्या शाश्वत आदर्शांना अर्पण केलेली योग्य आदरांजली: पंतप्रधान नरेंद्र मोदी

February 01st, 06:21 pm

आज, संत रविदास जयंतीच्या पावन दिनी असा निर्णय घेण्यात आला आहे की, आदमपूर विमानतळ यापुढे ‘श्री गुरु रविदास महाराज जी विमानतळ’ म्हणून ओळखले जाईल, ही अत्यंत सन्मानाची आणि अभिमानाची बाब आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ही श्री गुरु रविदास महाराजजी यांच्या शाश्वत आदर्शांना अर्पण केलेली योग्य आदरांजली आहे, असेही ते म्हणाले. संत रविदास यांनी दिलेला समानता, करुणा आणि सेवेचा संदेश आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.