नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा 2025 मध्ये मॅग्नस कार्लसनवर पहिला विजय मिळविल्याबद्दल पंतप्रधानांकडून गुकेशचे अभिनंदन

June 02nd, 08:23 pm

नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा 2025 च्या सहाव्या फेरीत मॅग्नस कार्लसनवर आपला पहिला विजय मिळविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुकेशचे अभिनंदन केले आहे.

बुद्धिबळ विश्वविजेता गुकेश डी. याने पंतप्रधानांची घेतली भेट

December 28th, 06:34 pm

बुद्धिबळ विश्वविजेता गुकेश डी. याने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदी यांनी गुकेशच्या निर्धार आणि निष्ठेची प्रशंसा केली आणि त्याचा आत्मविश्वास प्रेरणादायी असल्याचे म्हटले. पंतप्रधानांनी असेही सांगितले की, योग आणि ध्यानाच्या परिवर्तनशील सामर्थ्याबद्दल आजचे संभाषण होते.

सर्वात कमी वयाचा जागतिक बुद्धिबळ विजेता ठरल्याबद्दल गुकेश डी याचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

December 12th, 07:35 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात कमी वयाचा जागतिक बुद्धिबळ विजेता ठरलेल्या गुकेश डी याचे आज अभिनंदन केले. त्याची कामगिरी ऐतिहासिक आणि अनुकरणीय असल्याचे सांगून कौतुकाचा वर्षाव केला.