गुजरात नगर विकास उपक्रमाला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गांधीनगर मध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 27th, 11:30 am
मी दोन दिवस गुजरातमध्ये आहे. काल वडोदरा, दाहोद, भुज, अहमदाबाद आणि आज सकाळी गांधीनगरला, मी जिथे जिथे गेलो तिथे असे वाटले की, देशभक्ती म्हणजे गर्जना करणारा सिंदूरिया सागर, सिंदूरिया सागराची गर्जना आणि फडकणारा तिरंगा ध्वज, लोकांच्या हृदयात मातृभूमीबद्दलचे अपार प्रेम, हे एक दृश्य होते, आणि हे फक्त गुजरातमध्येच नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यात आहे. ते प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहे. शरीर कितीही निरोगी असले तरी, जर काटा टोचला तर संपूर्ण शरीर अस्वस्थ राहते. आता आपण तो काटा काढून टाकण्याचा निर्धार केला आहे.गुजरातच्या शहरी विकासाच्या 20 वर्षांच्या यशानिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
May 27th, 11:09 am
गुजरातच्या शहरी विकासाच्या 20 वर्षांच्या यशानिमित्त आज गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. या प्रसंगी त्यांनी शहरी विकास वर्ष 2005 ची 20 वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून शहरी विकास वर्ष 2025 ला सुरुवात केली. उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपासून वडोदरा, दाहोद, भुज, अहमदाबाद आणि गांधीनगरच्या त्यांच्या भेटीदरम्यान, ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा जयघोष आणि फडकणारे तिरंगी ध्वज या माध्यमातून देशभक्तीचा उत्साह त्यांना अनुभवायला मिळाला आहे. ही दृश्य संस्मरणीय असून, ही भावना केवळ गुजरातमध्येच नाही तर भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आणि प्रत्येक भारतीयाच्या हृदयात होती, असे ते म्हणाले.भारताने दहशतवादाचा काटा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि दृढनिश्चयाने तो पूर्ण केला , असे पंतप्रधान म्हणाले.पंतप्रधानांचा गुजरात दौरा – 26 व 27 मे रोजी
May 25th, 09:14 am
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी 26 व 27 मे रोजी गुजरातच्या दौऱ्यावर असतील. 26 मे रोजी ते दाहोद येथे जातील. सकाळी सुमारे 11:15 वाजता ते दाहोद येथील लोकोमोटिव्ह उत्पादन प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील आणि एका इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हला हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर ते सुमारे 24,000 कोटी रुपये किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी व लोकार्पण करतील. पंतप्रधान यावेळी एका सार्वजनिक सभेला देखील संबोधित करतील.