आसाममधील गुवाहाटी येथील लोकप्रिय गोपीनाथ बारदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 20th, 03:20 pm
आपले भाषण सुरू करण्यापूर्वी, मी आपल्या सर्वाना एक विनंती करीत आहे, आजचा हा 'विजय दिन' केवळ आसामसाठीच नाही तर संपूर्ण ईशान्येसाठी विकासाचा उत्सव आहे. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही आपले मोबाईल फोन काढावेत, फोनचा टॉर्च, फ्लॅश लाईट सुरू करावा आणि विकासाच्या या उत्सवात सहभागी व्हावे. प्रत्येकाने आपल्या मोबाईल फोनचा टॉर्च-फ्लॅश सुरू करावा आणि प्रचंड टाळ्यांचा गजरही करावा. संपूर्ण देशाला ऐकू आले पाहिजे आणि दिसले पाहिजे की, आसाम आता विकासाचा उत्सव साजरा करत आहे. ज्यावेळी विकासाचा प्रकाश पोहोचतो, त्यावेळी जीवनाचा प्रत्येक मार्ग नवीन उंची गाठू लागतो. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आसाममधील गुवाहाटी इथे लोकप्रिय गोपीनाथ बर्दोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन
December 20th, 03:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुवाहाटी इथे लोकप्रिय गोपीनाथ बर्दोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन झाले. या उद्घाटनामुळे आसामधील दळणवळणीय जोडणी, अर्थव्यवस्थेचा विस्तार आणि जागतिक सहभागातील परिवर्तनाच्या दिशेने एक मोठा टप्पा गाठला गेला. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधितही केले. आजचा दिवस आसाम आणि ईशान्य भारताच्या विकास आणि प्रगतीचा सोहळा आहे असे ते म्हणाले. जेव्हा प्रगतीची किरणे लोकांपर्यंत पोहोचतात, त्यावेळी जीवनातील प्रत्येक मार्ग नव्या उंचीला स्पर्श करू लागतो, असे त्यांनी अधोरेखित केले. आसामच्या भूमीशी आपली नाळ घट्टपणे जोडलेली असून, इथल्या लोकांचे प्रेम आणि स्नेह, तसेच विशेषतः आसाम आणि ईशान्य भारतातील माता-भगिनींमधला जिव्हाळा आपल्याला सातत्याने प्रेरणा देत आला आहे, त्यातूनच या क्षेत्राच्या विकासाचा सामूहिक संकल्पही मजबूत झाला आहे असे त्यांनी सांगितले. आज आसामच्या विकासात पुन्हा एकदा नवी अध्याय जोडला गेला आहे ही बाब त्यांनी नमूद केली. भारतरत्न भूपेन हजारिका यांच्या गीतातील ओळींचा संदर्भही त्यांनी दिला. विशाल ब्रह्मपुत्रा नदीचा काठ उजळून निघेल, अंधाराची प्रत्येक भिंत तुटून पडेल आणि हाच राष्ट्राचा संकल्प आणि पवित्र प्रतिज्ञा आहे, त्यामुळे हे निश्चितपणे घडून येईल असाच त्याचा अर्थ असल्याचे त्यांनी सांगितले.स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानांतर्गत तीन गिनीज जागतिक विक्रम केल्याबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा
November 01st, 02:16 pm
स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानांतर्गत तीन गिनीज जागतिक विक्रम केल्याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली आहे. या कामगिरीची माहिती देणाऱ्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या एका पोस्टवर आपला अभिप्राय देताना पंतप्रधान म्हणाले, अशा प्रकारचे उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहेत. अशा प्रकारच्या लोकचळवळी महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना अधिक चालना देतात आणि नारी शक्तीच्या जीवनावर परिवर्तनकारी प्रभाव निर्माण करतात, असे त्यांनी नमूद केले.योग चळवळीला बळकटी देणाऱ्या आंध्र प्रदेशच्या योगान्ध्र उपक्रमाचे पंतप्रधानांकडून कौतुक
June 22nd, 02:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशच्या जनतेचे, दैनंदिन आयुष्यात योगअभ्यासाचा समावेश करण्यासाठी तसेच आरोग्य आणि निरोगी राहाण्याच्या देशव्यापी चळवळीला चालना देण्याच्या प्रेरणादायी वचनबद्धतेचे कौतुक केले.सर्वाधिक लोकांनी एकाच वेळी 108 ठिकाणांवर सूर्यनमस्कार करण्याचा जागतिक विक्रम केल्याबद्दल पंतप्रधानांनी गुजरातचे केले अभिनंदन
January 01st, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वाधिक लोकांनी एकाच वेळी 108 ठिकाणांवर सूर्यनमस्कार करण्याचा जागतिक विक्रम केल्याबद्दल गुजरातचे अभिनंदन केले.गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केल्याबद्दल मध्य प्रदेशातील तानसेन महोत्सवात सादर केलेल्या कलाकारांचे पंतप्रधानांनी केले कौतुक
December 26th, 11:02 pm
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केल्याबद्दल मध्य प्रदेशात सुरू असलेल्या 'तानसेन महोत्सवा'मधील 1,282 तबला वादकांच्या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.पुण्यातील एस. पी. महाविद्यालयात 14 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या सर्वात भव्य वाचन उपक्रमाच्या गिनीज विश्वविक्रमाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
December 14th, 04:48 pm
पुणे येथील एस. पी. महाविद्यालयात 14 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या सर्वात भव्य वाचन उपक्रमाची नोंद गिनीज विश्वविक्रमात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे कौतुक केले आहे. कथा सांगण्याच्या माध्यमातून समाजात वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी येथे 3066 पालकांनी आपल्या मुलांना कथा वाचून दाखवल्या.तिसऱ्या G20 परिषदेदरम्यान कर्नाटकच्या हम्पी यथे एकूण 1755 वस्तूंचे ‘लमाणी कशिदाकारीचे जगातील सर्वात मोठे प्रदर्शन’ हा गिनीज विक्रम नोंदवल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
July 10th, 10:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या G20 परिषदे दरम्यान कर्नाटकच्या हम्पी इथे एकूण 1755 वस्तूंचे ‘लमाणी कशिदाकारीचे जगातील सर्वात मोठे प्रदर्शन’ हा गिनीज विक्रम नोंदवल्याबद्दल पंतप्रधानांनी अभिनंदन केले आहे.गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवल्यामुळे पंतप्रधानांनी केले सूरतचे अभिनंदन
June 22nd, 06:53 am
योग सत्रासाठी सर्वात जास्त लोक एकत्र जमल्याबद्दल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं गेल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरतचे अभिनंदन केले आहे.'एक भारत, श्रेष्ठ भारत' ची भावना आपल्या देशाला बळकट करते: पंतप्रधान मोदी 'मन की बात'मध्ये
March 26th, 11:00 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ कार्यक्रमात आम्ही अशा हजारो लोकांची चर्चा केली आहे, जे इतरांची सेवा करण्यासाठी आपलं जीवन समर्पित करतात. अनेक लोक असे असतात की आपल्या कन्यांच्या शिक्षणासाठी आपलं संपूर्ण निवृत्तीवेतन पणाला लावतात, काही जण आपली सारी कमाई पर्यावरण आणि इतरांच्या जीव सेवेसाठी समर्पित करून टाकतात. आमच्या देशात परमार्थाला इतक्या उच्च स्थानी ठेवलं आहे की इतरांच्या सुखासाठी लोक आपलं सर्वस्व अर्पण करायला मागेपुढं पाहात नाहीत. यासाठी तर आम्हाला लहानपणापासून राजा शिबी आणि दधीच ऋषी यांच्यासारख्या देह दान करणाऱ्यांच्या कथा ऐकवल्या जातात.PM Modi dedicates water supply schemes in Modasa, Gujarat
June 30th, 12:10 pm
PM Narendra Modi dedicated water supply schemes in Modasa, Gujarat. While addressing a gathering, the PM said, “We have ensured that farmers across Gujarat get water through our various irrigation schemes.” he also spoke about Fasal Bima Yojana and e-NAM.दिव्यांग व्यक्तींच्या गरजा लक्षात घेऊन आम्ही आमच्या पायाभूत सुविधा विकसित केल्या पाहिजे: पंतप्रधान मोदी
June 29th, 08:13 pm
पंतप्रधानांनी राजकोट इथे सामाजिक अधिकारिता शिबिरांत भाग घेतला आणि दिव्यांग लाभार्थींना विभागीय साधनांचे व सहाय्यक उपकरणांचे वाटप केले. त्यांनी स्टार्ट-अप क्षेत्राला आवाहन केले की त्यांनी दिव्यांग बंधू- भगिनींच्या जीवनांत चांगला बदल घडवून आणावा.पंतप्रधानांनी राजकोट इथे दिव्यांग लाभार्थींना विभागीय साधनांचे व सहाय्यक उपकरणांचे वाटप केले.
June 29th, 05:29 pm
पंतप्रधानांनी दिव्यांग व्यक्तींच्या गरजा लक्षात घेऊन आम्ही आमच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर दिला. त्यांनी स्टार्ट-अप क्षेत्राला आवाहन केले की त्यांनी दिव्यांग व्यक्तींच्या जीवनांत चांगला बदल घडवून आणण्यासाठी नवीन कल्पना आणाव्या.