तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेतील संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी केलेले निवेदन
May 19th, 04:25 pm
लोकशाही, कायद्याचे राज्य आणि बहुपक्षीयतेप्रति असलेली सामायिक वचनबद्धता आपल्या दोन्ही देशांना नैसर्गिक भागीदार बनवते. तंत्रज्ञान व शाश्वतता यांमधील सामायिक प्राधान्यक्रम आपल्या संबंधांना अनेक संधी देऊन परिपूर्ण करतात. म्हणूनच, आठ वर्षांपूर्वी, नॉर्डिक देशांसोबतच्या संबंधांना अधिक ऊर्जा देण्यासाठी आणि गती देण्यासाठी आपण ही शिखर परिषद घेत आहोत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वीडनच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय चर्चा
May 18th, 12:10 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीडनमधील गॉथेनबर्ग येथे पंतप्रधान महामहीम उल्फ क्रिस्टरसन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. स्वीडनच्या राजकुमारी क्राउन प्रिन्सेस व्हिक्टोरिया यांनीही या बैठकीत भाग घेतला आणि महामहीम राजे कार्ल सोळावे गुस्ताफ आणि राणी सिल्व्हिया यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी महामहीम राजांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.पश्चिम बंगालमधील सिंगूर येथील विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 18th, 03:30 pm
काल मी मालदामध्ये होतो आणि आज इथे हुगळीमध्ये तुमच्याशी संवाद साधण्याचे भाग्य मला लाभले आहे. विकसित भारतासाठी पूर्व भारताचा विकास हे उद्दीष्ट ठेवून केंद्र सरकार सातत्यान काम करत आहे. कालचा आणि आजचा कार्यक्रम हाच निर्धार बळकट करणारे आहेत. या दोन दिवसांत पश्चिम बंगालमधील करोडो रुपयांच्या प्रकल्पांचे भूमीपूजन आणि लोकार्पण करण्याची संधी मला मिळाली. देशातली पहिली वंदे भारत शयनयान रेल्वे काल पश्चिम बंगालमधून सुरू झाली. बंगालमध्ये जवळपास अर्धा डझन नवीन अमृत भारत वेगवान रेल्वे सुरू झाल्या आहेत आणि आज आणखी तीन अमृत भारत वेगवान रेल्वे सुरू झाल्या. यातील एका रेल्वेमुळे काशी वाराणसी या माझ्या मतदारसंघाची पश्चिम बंगालसोबतची संपर्कव्यवस्था आणखी मजबूत होणार आहे. शिवाय, दिल्ली आणि तमिळनाडूमध्ये जाणाऱ्या अमृत भारत वेगवान रेल्वे सुरू झाल्या आहेत. पश्चिम बंगालमधील रेल्वे वाहतुकीसाठी हे दोन दिवस अभूतपूर्व असेच म्हणावे लागतील. गेल्या 100 वर्षांत 24 तासांत इतके काम कदाचित कधीच झाले नसेल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील सिंगूर येथे ₹830 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि पहिल्या शयनयान वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ
January 18th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील सिंगूर येथे ₹830 कोटींहून अधिक मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण केले. याप्रसंगी जनसभेला संबोधित करताना मोदी यांनी नमूद केले की, काल ते मालदामध्ये होते आणि आज त्यांना हुगळीतील लोकांमध्ये उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले. त्यांनी अधोरेखित केले की विकसित भारतासाठी पूर्व भारताचा विकास आवश्यक आहे आणि या ध्येयाने केंद्र सरकार सातत्याने काम करत आहे. काल आणि आजचे कार्यक्रम या संकल्पाला बळ देतात, असे त्यांनी सांगितले. या काळात पश्चिम बंगालच्या विकासाशी संबंधित शेकडो कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्याची संधी मिळाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.पंतप्रधान 8 ऑक्टोबर रोजी 9 व्या इंडिया मोबाईल काँग्रेसचे करणार उद्घाटन
October 07th, 10:27 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9:45 च्या सुमाराला नवी दिल्लीतील यशोभूमी, येथे आशियातील सर्वात मोठा दूरसंचार, माध्यमे आणि तंत्रज्ञान कार्यक्रम असलेल्या 9 व्या इंडिया मोबाइल काँग्रेसचे (आयएमसी) 2025 उद्घाटन करणार आहेत.