पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स शिखर परिषदेतील पर्यावरण, कॉप 30 आणि जागतिक आरोग्य या विषयावरील सत्राला केले संबोधित
July 07th, 11:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ब्रिक्स शिखर परिषदेतील पर्यावरण, कॉप 30 आणि जागतिक आरोग्य या विषयावरील सत्राला संबोधित केले. या सत्राला ब्रिक्स समूहातील सदस्य देश, भागीदार राष्ट्र आणि आमंत्रित देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जगाच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या विषयांवर अधिवेशन आयोजित केल्याबद्दल त्यांनी ब्राझीलचे आभार मानले. भारतासाठी हवामान बदल हा केवळ ऊर्जेशी निगडित प्रश्न नसून जीवन आणि निसर्ग यांच्यातील समतोलावर परिणाम करणारा प्रश्न आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. हवामान न्याय या मुद्द्याकडे भारत नैतिक जबाबदारी या दृष्टिकोनातून बघत असून ती पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे, असे ते म्हणाले. हवामानाशी सुसंगत कृतीसाठी भारत पूर्णपणे वचनबद्ध असून त्यादिशेने नागरिक आणि आपल्या वसुंधरेच्या समृद्धी आणि विकासाकरता भारत, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी आघाडी, जागतिक जैवइंधन आघाडी, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स, मिशन लाईफ, एक पेड माँ के नाम इत्यादी उपक्रम राबवत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.ब्रिक्स सत्रात पर्यावरण, सीपीओ-30 आणि जागतिक आरोग्य विषयावर पंतप्रधानांचे निवेदन
July 07th, 11:13 pm
मला आनंद आहे की ब्राझीलच्या अध्यक्षतेखाली, ब्रिक्सने (ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका) पर्यावरण आणि आरोग्य सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांना उच्च प्राधान्य दिले आहे. हे विषय केवळ परस्पर संबंधित नाहीत, तर मानवतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.जागतिक सरकार शिखर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 14th, 02:30 pm
जागतिक सरकार शिखर परिषदेत मुख्य भाषण देणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे.आणि हे भाग्य मला दुसऱ्यांदा मिळत आहे. या निमंत्रणासाठी आणि शानदार स्वागतासाठी मी महामहिम शेख मोहम्मद बिन रशीद जी यांचा खूप खूप आभारी आहे.मी माझे बंधू महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद यांचेही आभार मानतो. अलीकडच्या काळात त्यांना अनेकदा भेटण्याची संधी मला मिळाली. ते केवळ दूरदृष्टी असलेले नेतेच नाहीत तर संकल्प आणि वचनबद्धता दर्शवणारे देखील नेते आहेत.जागतिक सरकार शिखर परिषद 2024 मध्ये पंतप्रधान सहभागी
February 14th, 02:09 pm
संयुक्त अरब अमिरातीचे उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि दुबईचे शासक महामहीम शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 फेब्रुवारी 2024 रोजी दुबई येथे जागतिक सरकार शिखर परिषदेत सन्माननीय अतिथी म्हणून सहभागी झाले. भविष्यातील सरकारांना आकार देणे या परिषदेच्या संकल्पनेवर पंतप्रधानांनी विशेष मुख्य भाषण केले . 2018 मधील जागतिक सरकार शिखर परिषदेला देखील पंतप्रधान सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी या शिखर परिषदेत 10 राष्ट्राध्यक्ष आणि 10 पंतप्रधानांसह 20 जागतिक नेते सहभागी झाले. या जागतिक परिषदेला120 हून अधिक देशांची सरकारे आणि प्रतिनिधी उपस्थित होते.इन्फिनिटी फोरमच्या दुसऱ्या आवृत्तीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 09th, 11:09 am
गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई, राज्य सरकारचे मंत्री, आयएफसीए चे अध्यक्ष के. राजारामन जी, जगातील प्रतिष्ठित वित्तीय संस्था आणि विविध संस्थांचे नेते, महिला आणि पुरुष,पंतप्रधानांनी इन्फिनिटी फोरम 2.0 ला केले संबोधित
December 09th, 10:40 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीमार्फत फिनटेकवरील जागतिक विचार नेतृत्व मंच असलेल्या इन्फिनिटी फोरमच्या दुसऱ्या आवृत्तीला संबोधित केले. व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषद 2024 च्या पूर्वी एक विशेष कार्यक्रमाच्या रुपात आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA), आणि GIFT City यांच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकारच्या नेतृत्वाखाली, इन्फिनिटी फोरमची दुसरी आवृत्ती आयोजित केली जात आहे. इन्फिनिटी फोरमच्या दुसऱ्या आवृत्तीची मुख्य संकल्पना 'GIFT-IFSC: नव्या काळातील जागतिक वित्तीय सेवांचे मुख्य केंद्र' ही आहे.कॉप-28 मध्ये भारताने यूएई बरोबर ग्लोबल ग्रीन क्रेडिट इनिशिएटिव्ह कार्यक्रमाचे सह-आयोजन केले
December 01st, 08:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्यासमवेत 1 डिसेंबर 2023 रोजी दुबई येथे कॉप-28 मध्ये 'ग्रीन क्रेडिट प्रोग्राम' (हरित कर्ज कार्यक्रम) या उच्चस्तरीय कार्यक्रमाचे सह-आयोजन केले. या कार्यक्रमात स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन, मोझांबिकचे अध्यक्ष फिलिप न्युसी आणि युरोपियन परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल सहभागी झाले.कॉप-28 परिषदेत ‘ट्रान्सफॉर्मिंग क्लायमेट फायनान्स’ या विषयावरील सत्रात पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 01st, 08:06 pm
भारताने आपल्या जी-20 अध्यक्षपदांतर्गत शाश्वत विकास आणि हवामान बदल या दोन्ही विषयांना मोठे प्राधान्य दिले आहे.The holistic fusion of carbon credits with social responsibility will serve as the new philosophy of Green Credit: PM Modi
December 01st, 07:22 pm
Addressing a high-level event on 'Green Credit Programme', PM Modi said The holistic fusion of carbon credits with social responsibility will serve as the new philosophy of Green Credit. He added that in the health card of planet Earth there is an addition of some positive points and this will be reinforced through the Green Credit initiative.