जागतिक दौरा सन्मानाचा: पंतप्रधान मोदींना या 29 देशांनी केले आहे सन्मानित - हे आहे त्याचे कारण!

July 07th, 04:59 pm

कुवेत, फ्रान्स, पापुआ न्यू गिनी आणि अन्य दोन डझनहून अधिक देशांकडून भारताच्या पंतप्रधानांना त्यांच्या देशाचे सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते, तेव्हा त्यातून राजनैतिक सदिच्छेपेक्षाही बरेच काही प्रतिबिंबित होते. हे देशाचा वाढता प्रभाव, त्याची मूल्ये आणि नेतृत्वाला जगन्मान्यता मिळत असल्याचे द्योतक आहे.

सायप्रसच्या अध्यक्षांसमवेतच्या संयुक्त पत्रकार परिषदेतले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य

June 16th, 01:45 pm

सर्वप्रथम स्नेहपूर्ण स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी आदरणीय राष्ट्राध्यक्षांचे मनःपूर्वक आभार मानतो.सायप्रसच्या भूमीवर काल पाऊल ठेवल्यापासून, राष्ट्राध्यक्ष आणि या देशाच्या जनतेचा स्नेह आणि आपुलकी याने मी भारावून गेलो आहे.

सायप्रसचा सर्वोच्च सन्मान 'ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III' स्वीकारताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

June 16th, 01:35 pm

द ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III पुरस्कार देऊन मला गौरवल्याबद्दल मी तुमचे, सायप्रस सरकारचे आणि येथील जनतेचे आभार मानतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मॅकॅरिओस III हा सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान

June 16th, 01:33 pm

सायप्रसचे अध्यक्ष महामहिम निकोस क्रिस्टोडौलिड्स यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार -ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III देऊन गौरवण्यात आले.