Bengal’s strength is known worldwide, but TMC has trapped it in corruption: PM Modi in Mathurapur

April 23rd, 01:00 pm

Addressing a Vijay Sankalp rally in Mathurapur, West Bengal, PM Modi contrasted BJP’s 11 years of development with TMC’s 15 years of “lies and betrayal.” Targeting the TMC's syndicate culture, he described widespread “cut money” in jobs, land, rations and mandis. He concluded by asserting that a strong wave of change is visible across Bengal, driven by women and youth.

Today, against TMC’s jungle raj, people across Bengal are blowing the conch of change: PM Modi in Krishnanagar

April 23rd, 12:45 pm

PM Modi addressed a massive public rally in Krishnanagar, delivering a sharp critique of TMC’s misgovernance while presenting BJP’s vision of development, security and women-led growth in West Bengal. He highlighted 15 years of “scams and broken promises” under TMC, contrasting it with BJP’s vision of “Sabka Saath, Sabka Vikas”. Reaffirming Modi's guarantee, he announced 10 guarantees for women.

PM Modi’s high-energy rallies in Krishnanagar and Mathurapur, West Bengal

April 23rd, 12:30 pm

PM Modi addressed massive public gatherings in Krishnanagar and Mathurapur, delivering a sharp critique of TMC’s misgovernance while presenting BJP’s vision of development, security and women-led growth in West Bengal.

पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाचा मजकूर

April 18th, 08:45 pm

आज मी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर विशेषतः देशातील माता-भगिनी आणि मुलींशी संवाद साधण्यासाठी आलो आहे! आज भारताचा प्रत्येक नागरिक पाहत आहे की, भारताच्या नारी शक्तीच्या भरारीला कशा प्रकारे रोखले गेले आहे. त्यांच्या स्वप्नांना निर्दयीपणे चिरडले गेले आहे. आमच्या सर्वतोपरी प्रयत्नांनंतरही आम्ही यशस्वी होऊ शकलो नाही, नारी शक्ती वंदन अधिनियमात दुरुस्ती होऊ शकली नाही! आणि मी यासाठी सर्व माता-भगिनींची, क्षमा मागतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला केले संबोधित

April 18th, 08:30 pm

भारतातील माता, भगिनी आणि कन्यांशी संबंधित एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर देशाला संबोधित करताना, पंतप्रधानांनी महिलांच्या प्रगतीला खीळ बसल्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. सरकारच्या अथक आणि प्रामाणिक प्रयत्नांनंतरही, 'नारी शक्ती वंदन अधिनियम' दुरुस्ती पारित होऊ शकली नाही, ज्यामुळे महिला वर्गाची रास्त स्वप्ने चिरडली गेली, असे त्यांनी नमूद केले. या दुर्दैवी परिस्थितीसाठी मी देशातील सर्व माता आणि भगिनींची मनापासून माफी मागतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 मे रोजी मध्य प्रदेश दौऱ्यावर

May 30th, 11:15 am

लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 मे रोजी मध्य प्रदेशला भेट देणार आहेत. सकाळी 11.15 च्या सुमारास ते भोपाळमध्ये लोकमाता देवी अहिल्याबाई महिला सशक्तिकरण महासंमेलनात सहभागी होणार आहेत. या शिवाय त्यांच्या हस्ते भोपाळमध्ये विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात येणार असून ते सार्वजनिक कार्यक्रमालाही संबोधित करणार आहेत.

गुजरातमधील नवसारी येथे विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर

March 08th, 11:50 am

काही दिवसांपूर्वी महाकुंभमेळ्यात गंगा मातेचा आशीर्वाद मिळाला. आणि आज, मला मातृशक्तीच्या या महान कुंभमेळ्यात आशीर्वाद मिळाला आहे. महाकुंभमेळ्यात गंगा मातेचा आशीर्वाद मिळाला आणि आजच्या या मातृशक्तीच्या महाकुंभात सर्व माता - भगिनींचा आशीर्वाद मिळाला. आजचा हा महिला दिन, गुजरातची माझी मातृभूमी आणि इतक्या मोठ्या संख्येने आपणा सर्व माता, भगिनी आणि मुलींची उपस्थिती, या खास दिवशी तुमचे प्रेम, आपुलकी आणि आशीर्वादाबद्दल मी मस्तक झुकवून मातृशक्तीला वंदन करतो. गुजरातच्या या भूमीवरून मी सर्व देशवासीयांना, देशातील सर्व माता आणि भगिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. आज येथे गुजरात सफल आणि गुजरात मैत्री या दोन योजनांचा शुभारंभ देखील झाला. अनेक योजनांचे पैसे देखील महिलांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केले गेले आहेत. याबद्दलही मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरात मधील नवसारी येथे विकासकामांचा प्रारंभ

March 08th, 11:45 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील नवसारी येथे विविध विकास कामांचा प्रारंभ केला. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी तेथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माता, भगिनी आणि मुलींच्या प्रेम, आपुलकी आणि आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, आणि या विशेष दिनानिमित्त देशातील सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. महाकुंभ मेळ्यात आपण माँ गंगेचा आशीर्वाद प्राप्त केला तर आज मातृशक्तीच्या महाकुंभात माता भगिनींचे आशीर्वाद मिळवल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी आज गुजरातमध्ये जी-सफल (G-SAFAL) (गुजरात स्कीम फॉर अंत्योदय फॅमिलीज फॉर ऑगमेंटिंग लाईव्हलीहूड्स) आणि जी-मैत्री (G-MAITRI) (गुजरात मेंटॉरशिप अँड एक्सेलरेशन ऑफ इंडिव्हिजुअल्स फॉर इंडिव्हिजुअल्स फॉर ट्रान्सफॉर्मिंग रुरल इन्कम) या दोन योजनांचा प्रारंभ झाल्याचे जाहीर केले. विविध योजनांचा निधी थेट महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले आणि या यशाबद्दल सर्व संबंधितांचे अभिनंदन केले.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त, 25 डिसेंबर रोजी मध्य प्रदेशात केन-बेतवा नदी जोड राष्ट्रीय प्रकल्पाची पंतप्रधान करणार पायाभरणी

December 24th, 11:46 am

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 डिसेंबर रोजी मध्यप्रदेशला भेट देणार आहेत. पंतप्रधान दुपारी 12:30 वाजता खजुराहो मधील अनेक विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी यावेळी करणार आहेत.

महाराष्ट्रातील वर्धा येथे राष्ट्रीय ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

September 20th, 11:45 am

दोन दिवस आधीच आपण सगळ्यांनी विश्वकर्मा पुजेचा सण साजरा केला. आणि आज वर्ध्याच्या पावन भूमीवर आपण प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या यशाचा उत्सव साजरा करत आहोत. आजचा दिवस यासाठीही विशेष आहे कारण 1932 मध्ये याच दिवशी महात्मा गांधी यांनी अस्पृश्यतेविरोधात मोहीमेला सुरुवात केली होती. अशा परिस्थितीत विश्वकर्मा योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्याचा हा उत्सव, विनोबा भावे यांच्या साधनेचे ठिकाण, महात्मा गांधी यांची कर्मभूमी, वर्ध्याची ही भूमी, हे यश आणि प्रेरणेचा असा काही संगम आहे, जो विकसित भारताच्या आपल्या संकल्पाला नवी ऊर्जा देईल. विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून आपण कष्टातून समृद्धीचा, या कौशल्याने एक चांगल्या उद्याचा जो संकल्प केला आहे, वर्ध्यातील बापूंची प्रेरणा या संकल्पांना सिद्धीस नेण्याचे माध्यम ठरतील. मी या योजनेशी संबंधित सर्व लोकांचे, देशभरातील सर्व लाभार्थ्यांचे या निमित्ताने अभिनंदन करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील वर्धा येथे राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमाला केले संबोधित

September 20th, 11:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील वर्धा येथे राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास’ योजना आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’ सुरू केली. त्यांनी पीएम विश्वकर्मा लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि कर्जे जारी केली आणि पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत वर्षभरातील प्रगतीचे प्रतीक म्हणून समर्पित तिकिटाचे अनावरणदेखील केले. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील अमरावती येथे पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपरेल (पीएम मित्र) पार्कची पायाभरणी केली.यावेळी आयोजित प्रदर्शनालाही पंतप्रधानांनी भेट दिली.

विकसित भारत संकल्प यात्रेत पंतप्रधानांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून केलेल्या भाषणाचा मजकूर

January 18th, 12:47 pm

विकासित भारत संकल्प यात्रेला 2 महिने पूर्ण झाले आहेत. या प्रवासात धावणारा विकासाचा रथ हा श्रद्धेचा रथ असून आता लोक त्याला हमीचा रथ देखील म्हणू लागले आहेत. योजनांच्या लाभापासून कुणीही वंचित राहणार नाही, कुणीही लाभ मिळाल्या वाचून राहणार नाही, असा विश्वास आता निर्माण होत आहे. त्यामुळे ज्या गावांमध्ये मोदींच्या हमीची गाडी अद्याप पोहोचलेली नाही, तिथे तिची आता अगदी आतुरतेने प्रतिक्षा होत आहे. आणि म्हणूनच आम्ही यापूर्वी 26 जानेवारीपर्यंत ही यात्रा सुरु ठेवण्याचा विचार केला होता, परंतु आम्हाला एवढा पाठिंबा मिळाला, एवढी मागणी वाढली, प्रत्येक गावातील लोक सांगत आहेत की मोदींची हमी असलेले वाहन आमच्या ठिकाणी यावे. तेव्हा मला हे कळल्यावर मी आमच्या सरकारी अधिकाऱ्यांना सांगितले की 26 जानेवारीपर्यंतच नाही तर आणखी थोडी मुदतवाढ द्या. लोकांना गरज आहे, लोकांची मागणी आहे तर ती आपल्याला पूर्ण करावी लागेल. आणि त्यामुळे कदाचित काही दिवसांनी हे ही निश्चित होईल की मोदींची हमीची गाडी कदाचित फेब्रुवारी महिन्यातही चालवली जाईल.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद

January 18th, 12:46 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात देशभरातून विकसित भारत संकल्प यात्रेचे हजारो लाभार्थी सामील झाले. कार्यक्रमात केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधीही सहभागी झाले होते.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

December 09th, 12:35 pm

मोदींची हमी देणाऱ्या वाहनांसाठी प्रत्येक गावात जो उत्साह दिसतो आहे तो भारताच्या कानाकोपऱ्यात दिसतो आहे. मग ते उत्तर असो, दक्षिण असो, पूर्व असो, पश्चिम असो किंवा अगदी लहान गाव किंवा मोठे गाव असो आणि काही गोष्टी समजल्यानंतर मी पाहिले आहे की, या वाहनाचा मार्ग जरी नसला तरीही लोक येऊन गावाच्या रस्त्यावर वाहन उभे करतात आणि सर्व माहिती घेतात, हे विलक्षण आहे. आणि मी काही लाभार्थींशी संवाद साधला आहे मला सांगण्यात आले की, या यात्रे दरम्यान 1.5 लाखाहून अधिक लाभार्थींना त्यांचे अनुभव कथन करण्याची संधी मिळाली आणि हे अनुभव नोंदवलेही गेले आहेत. आणि गेल्या 10-15 दिवसात गावातील लोकांच्या भावना काय आहेत, योजनांचे लाभ मिळाले आहेत का, त्यांची पूर्ण अंमलबजावणी झाली आहे की नाही हे मी वेळोवेळी पाहिले आहे. त्यांना सर्व तपशील माहीत आहेत. जेव्हा मी तुमच्या चित्रफिती पाहतो, तेव्हा माझ्या गावातील लोक त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या सरकारी योजनांचा योग्य प्रकारे उपयोग कसा करतात हे पाहून मला खूप आनंद होतो.आता बघा कुणाला कायमस्वरूपी घर मिळाले तर त्याला असे वाटते की आयुष्याची एक नवीन सुरुवात झाली आहे. एखाद्याला नळाद्वारे पाणी मिळाले तर त्याला वाटते की आजपर्यंत आपण पाण्यासाठी त्रासात जगत होतो, आज आपल्या घरात पाणी पोहोचले आहे.एखाद्याला शौचालय मिळाले तर त्याला इज्जत घर मिळाले असे वाटते.आणि जुन्या काळी केवळ प्रथितयश लोकांच्या घरात शौचालय असायचे, आता आमच्या घरात शौचालय आहे. त्यामुळे तो सामाजिक प्रतिष्ठेचाही विषय बनला आहे.आता तर आपल्या घरात शौचालये असतात. त्यामुळे तो सामाजिक प्रतिष्ठेचाही विषय बनला आहे.कुणाला मोफत उपचार मिळाले आहेत, कुणाला मोफत रेशन मिळाले आहे, कुणाला गॅस जोडणी मिळाली आहे, कुणाला वीज जोडणी मिळाली आहे, कुणी बँक खाते उघडले आहे, कुणाला पीएम किसान सन्मान निधी,कुणाला पीएम पीक विम्याचा लाभ मिळाला आहे, काहींना पीएम स्वानिधी योजनेद्वारे मदत मिळाली आहे, काहींना पीएम स्वामित्व योजनेद्वारे मालमत्ता कार्ड मिळाले आहेत, म्हणजे मी योजनांची नावे सांगितली तर, मी पाहत होतो, भारताच्या कानाकोपऱ्यात गोष्टी पोहोचल्या आहेत. देशभरातील खेड्यापाड्यातील कोट्यवधी कुटुंबांना आपल्या सरकारच्या कोणत्या ना कोणत्या योजनेचा नक्कीच फायदा झाला आहे. आणि जेव्हा हा लाभ मिळतो तेव्हा एखाद्याचा विश्वास वाढतो. आणि जेव्हा या विश्वासाने जेव्हा छोटासा लाभ जरी मिमिळाला तरी जीवन जगण्यासाठी एक नवे बळ मिळते. आणि त्यासाठी त्यांना वारंवार कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज पडली नाही. भीक मागण्याची जी मनःस्थिती असायची ती आता गेली आहे. सरकारने लाभार्थ्यांची ओळख निश्चित केली आणि नंतर त्यांना लाभ देण्यासाठी पावले उचलली. म्हणूनच आज लोक म्हणतात मोदींची हमी म्हणजे हमी, पूर्णत्वाची हमी.

पंतप्रधानांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थींशी साधला संवाद

December 09th, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. या योजनांचा लाभ सर्व लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत कालबद्ध रीतीने पोहचेल हे सुनिश्चित करून सरकारच्या प्रमुख योजना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा देशभरात सुरु करण्यात आली आहे.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

November 30th, 12:00 pm

या कार्यक्रमाशी जोडल्या गेलेल्या विविध राज्यांचे राज्यपाल, या राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्र आणि राज्य सरकारांतील मंत्री, संसद सदस्य तसेच आमदार आणि गावागावांतून या कार्यक्रमात सहभागी झालेले माझे प्रिय बंधू-भगिनींनो, मातांनो, माझ्या शेतकरी बंधू-भगिनींनो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या तरुण सहकाऱ्यांनो,

विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद

November 30th, 11:27 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. प्रधानमंत्री महिला किसान ड्रोन केंद्राचाही त्यांनी प्रारंभ केला. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी एम्स, देवघर येथे ऐतिहासिक 10,000 व्या जन औषधी केंद्राचे लोकार्पण केले.देशातील जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवण्याचा कार्यक्रमही मोदी यांनी यावेळी सुरू केला. यापूर्वी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान, महिला बचत गटांना ड्रोन पुरवणे आणि जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवणे या या दोन्ही उपक्रमांची घोषणा पंतप्रधानांनी केली होती. या आश्‍वासनांची पूर्तता झाल्याची साक्ष आजचा हा कार्यक्रम आहे. . झारखंडमधील देवघर, ओदीशातील रायगढ़, आंध्र प्रदेशातील प्रकाशम, अरुणाचल प्रदेशातील नामसाई आणि जम्मू-काश्मीरमधील अरनिया येथील लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला.

मन की बात (मराठी अनुवाद) 105वा भाग

September 24th, 11:30 am

‘मन की बात’च्या आणखी एका भागात मला तुमच्यासोबत देशाचे यश, देशवासियांचे यश, त्यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास याबाबत बोलण्याची संधी मिळाली आहे. सध्या मला आलेली बहुतेक पत्रं आणि संदेश, मुख्यत्वेकरुन याच दोन विषयांवर आहेत. पहिला विषय म्हणजे चंद्रयान-3चे यशस्वी अवतरण आणि दुसरा विषय जी-20चे दिल्लीतील यशस्वी आयोजन. मला देशाच्या प्रत्येक भागातून, समाजातील प्रत्येक घटकाकडून, सर्व वयोगटातील लोकांकडून असंख्य पत्रे मिळाली आहेत. चंद्रयान-3चे लँडर चंद्रावर उतरत असताना कोट्यवधी लोक एकाच वेळी वेगवेगळ्या माध्यमातून या घटनेच्या क्षणाक्षणाचे साक्षीदार होत होते. इस्रोच्या यू-ट्यूब लाईव्ह वाहिनीवर 80 लाखांहून अधिक लोकांनी ही घटना थेट पाहिली, हा एक विक्रमच आहे. यावरून हे लक्षात येते की, कोट्यवधी भारतीयांचं चंद्रयान-3 सोबत किती गहिरं नातं आहे. चांद्रयानाच्या या यशावर आधारीत, देशात सध्या एक अतिशय सुंदर अशी प्रश्नमंजुषा स्पर्धा सुरू आहे, प्रश्नांची उत्तरे देण्याची स्पर्धा आणि तिचं नाव आहे - 'चंद्रयान-3 महाक्विझ'. MyGov पोर्टलवर होत असलेल्या या स्पर्धेत आतापर्यंत 15 लाखांहून अधिक लोकांनी भाग घेतला आहे. MyGov सुरु झाल्यानंतर कोणत्याही प्रश्नमंजुषा स्पर्धेमधला हा सर्वात मोठा सहभाग आहे. मी तुम्हालाही विनंती करेन की तुम्ही अद्याप यात सहभागी झाला नसाल तर उशीर करू नका, अजून सहा दिवस शिल्लक आहेत. या प्रश्नमंजुषेमध्ये जरूर भाग घ्या.

During Congress rule, nothing was done to empower Panchayati Raj institutions: PM Modi

August 07th, 10:37 pm

Today, PM Modi addressed the Kshetriya Panchayati Raj Parishad in Haryana via video conferencing. Addressing the gathering, the PM said, “Today, the country is moving forward with full enthusiasm to fulfill the resolutions of Amrit Kaal and to build a developed India. The PM said, District Panchayats hold tremendous potential to drive significant transformations in various sectors. In this context, your role as representatives of the BJP becomes exceptionally vital.

PM Modi addresses at Kshetriya Panchayati Raj Parishad in Haryana

August 07th, 10:30 am

Today, PM Modi addressed the Kshetriya Panchayati Raj Parishad in Haryana via video conferencing. Addressing the gathering, the PM said, “Today, the country is moving forward with full enthusiasm to fulfill the resolutions of Amrit Kaal and to build a developed India. The PM said, District Panchayats hold tremendous potential to drive significant transformations in various sectors. In this context, your role as representatives of the BJP becomes exceptionally vital.