The greatest pride of my life is that I am a karyakarta of the Bharatiya Janata Party: PM Modi at BJP HQ
January 20th, 11:16 am
Prime Minister Narendra Modi today addressed party leaders and karyakartas during the felicitation ceremony of the newly elected BJP President, Nitin Nabin, at the party headquarters in New Delhi. Congratulating Nitin Nabin, the Prime Minister said, “The organisational election process reflects the BJP’s commitment to internal democracy, discipline and a karyakarta-centric culture. I congratulate karyakartas across the country for strengthening this democratic exercise.”PM Modi addresses BJP karyakartas at felicitation of New Party President
January 20th, 11:15 am
Prime Minister Narendra Modi today addressed party leaders and karyakartas during the felicitation ceremony of the newly elected BJP President, Nitin Nabin, at the party headquarters in New Delhi. Congratulating Nitin Nabin, the Prime Minister said, “The organisational election process reflects the BJP’s commitment to internal democracy, discipline and a karyakarta-centric culture. I congratulate karyakartas across the country for strengthening this democratic exercise.”समृद्ध भारतासाठीच्या व्यापक सुधारणा पंतप्रधानांनी केल्या अधोरेखीत
January 07th, 10:00 pm
सरकारच्या गुंतवणुकीला मोठी चालना देणाऱ्या तसेच मागणीवर आधारित व्यापक धोरणांमुळे भारताची रिफॉर्म एक्सप्रेस अर्थात सुधारणांची एक्सप्रेस वेग जारी राखत असल्याची बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा अधोरेखीत केली आहे.केरळमध्ये तिरुवनंतपुरम येथे विझिंजम आंतरराष्ट्रीय सागरी बंदराच्या लोकार्पण प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 02nd, 02:06 pm
आज भगवान आदि शंकराचार्य जी यांची जयंती आहे. तीन वर्षांपूर्वी सप्टेंबर महिन्यात आदि शंकराचार्य यांच्या जन्मभूमीला भेट देण्याचे सद्भाग्य मला लाभले होते. काशी या माझ्या लोकसभा मतदारसंघात विश्वनाथ धाम परिसरात आदि शंकराचार्य जी यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे याचा मला आनंद आहे. उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथे आदि शंकराचार्य यांच्या दिव्य पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य देखील मला लाभले आहे. आणि आजच देवभूमी उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराचे द्वार दर्शनासाठी उघडले आहे, केरळमधून बाहेर पडून देशाच्या विविध कानाकोपऱ्यात मठांची स्थापना करून आदि शंकराचार्य जी यांनी राष्ट्रीय चैतन्याची जाणीव जागृत केली. या पवित्र प्रसंगी मी त्यांना श्रद्धापूर्वक वंदन करतो.केरळमध्ये 8,800 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या विझिंजम आंतरराष्ट्रीय सागरी बंदराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
May 02nd, 01:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमध्ये तिरुवनंतपुरम येथे 8,800 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या विझिंजम खोल पाण्यातील आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय सागरी बंदराचे लोकार्पण केले. भगवान आदि शंकराचार्य यांच्या जयंतीदिनाच्या मंगल प्रसंगी कार्यक्रमासाठी जमलेल्या उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी तीन वर्षांपूर्वी सप्टेंबर महिन्यात आदि शंकराचार्य यांच्या वंदनीय जन्मस्थानाला भेट देण्याचा सन्मान प्राप्त झाल्याची आठवण सांगितली. काशी या पंतप्रधानांच्या लोकसभा मतदारसंघात आदि शंकराचार्य यांचा भव्य पुतळा उभारण्यात आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. हा पुतळा म्हणजे आदि शंकराचार्य यांची प्रचंड अध्यात्मिक विद्वत्ता आणि शिकवण यांच्याप्रती आदरांजली प्रतीक आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आपल्याला उत्तराखंडातील पवित्र केदारनाथ धाम येथे आदि शंकराचार्य यांच्या दिव्य पुतळ्याचे अनावरण करण्याचा सन्मान देखील प्राप्त झाला आहे. केदारनाथ मंदिराची कवाडे आज भाविकांसाठी खुली झाल्यामुळे, आजच्या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. मुळचे केरळचे असलेल्या आदि शंकराचार्य यांनी देशाच्या विविध कानाकोपऱ्यात मठांची स्थापना करून राष्ट्रीय चैतन्याची जाणीव जागृत केली, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. आदि शंकराचार्य यांच्या प्रयत्नांनी एकसंघ आणि अध्यात्मिकदृष्ट्या जागृत भारताच्या उभारणीचा पाया रचला यावर पंतप्रधानांनी अधिक भर दिला.वक्फ विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर होणे हा ऐतिहासिक निर्णय असल्याचं सांगत पंतप्रधानांनी केली प्रशंसा
April 04th, 08:19 am
वक्फ (सुधारणा) विधेयक व मुसलमान वक्फ (निरसन) विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर होणे हा ऐतिहासिक निर्णय असून हे सामाजिक आर्थिक न्याय , पारदर्शिता व सर्वसमावेशक प्रगतीसाठी चाललेल्या आपल्या सामूहिक प्रयत्नांना मिळालेले यश असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे स्वागत केले आहे.केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाई दिलासा निधीचा अतिरिक्त हप्ता 01.01.2025 पासून जारी करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
March 28th, 04:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (डीए) आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाई दिलासा (डीआर) निधीचा अतिरिक्त हप्ता 01.01.2025 पासून जारी करायला मंजुरी दिली. महागाईची भरपाई करण्यासाठी मूळ वेतन /निवृत्तीवेतनच्या सध्याच्या 53% दरात ही 2% वाढ करण्यात आली आहे.2025 खरीप हंगामासाठी (01.04.2025 ते 30.09. 2025 पर्यंत) फॉस्फेटिक आणि पोटॅशिक (पी अँड के) खतांवर पोषक तत्वांवर आधारित अनुदान (एनबीएस) दरांना मंत्रिमंडळाची मान्यता
March 28th, 04:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 2025 च्या खरीप हंगामासाठी (01.04.2025 ते 30.09.2025 पर्यंत) फॉस्फेटिक आणि पोटॅशिक (पीआणि के) खतांवर, पोषक तत्वांवर आधारित अनुदान (एनबीएस) दर निश्चित करण्याच्या खत विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली.Union Budget 2024-25: How It Will Transform the Lives of India’s Middle Class
February 04th, 06:24 pm
Finance Minister Nirmala Sitharaman’s Union Budget 2024-25 is a game-changer for India’s middle class, offering a mix of tax relief, job creation, affordable housing, and better access to healthcare and education. This budget is not just about numbers; it’s about empowering millions of middle-class families to achieve financial stability, improve their quality of life, and secure a brighter future.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत प्रमुख सचिवांची चौथी राष्ट्रीय परिषद संपन्न
December 15th, 10:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत मुख्य सचिवांच्या चौथ्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित केले. ही तीन दिवसीय परिषद 13 ते 15 डिसेंबर 2024 या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.Today, India is the world’s fastest-growing large economy, attracting global partnerships: PM
November 22nd, 10:50 pm
PM Modi addressed the News9 Global Summit in Stuttgart, highlighting a new chapter in the Indo-German partnership. He praised India's TV9 for connecting with Germany through this summit and launching the News9 English channel to foster mutual understanding.Prime Minister Narendra Modi addresses the News9 Global Summit
November 22nd, 09:00 pm
PM Modi addressed the News 9 Global Summit in Stuttgart, Germany, via video conference. Organized by TV9 India in collaboration with F.A.U. Stuttgart, the summit focused on India-Germany: A Roadmap for Sustainable Growth, emphasizing partnerships in economy, sports, and entertainment.Success of Humanity lies in our collective strength, not in the battlefield: PM Modi at UN Summit
September 23rd, 09:32 pm
Prime Minister Narendra Modi addressed the 'Summit of the Future' at the United Nations in New York, advocating for a human-centric approach to global peace, development, and prosperity. He highlighted India's success in lifting 250 million people out of poverty, expressed solidarity with the Global South, and called for balanced tech regulations. He also emphasized the need for UN Security Council reforms to meet global ambitions.Prime Minister’s Address at the ‘Summit of the Future’
September 23rd, 09:12 pm
Prime Minister Narendra Modi addressed the 'Summit of the Future' at the United Nations in New York, advocating for a human-centric approach to global peace, development, and prosperity. He highlighted India's success in lifting 250 million people out of poverty, expressed solidarity with the Global South, and called for balanced tech regulations. He also emphasized the need for UN Security Council reforms to meet global ambitions.प्रधान मंत्री ई-ड्राईव्ह अर्थात ‘प्रधान मंत्री इलेक्ट्रिक ड्राईव्ह रीवोल्युशन इन इनोवेटिव्ह व्हेईकल एनहान्समेंट’ योजनेला दोन वर्षांसाठी 10,900 कोटी रुपये निधीच्या तरतुदीसह केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
September 11th, 08:59 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने अवजड उद्योग मंत्रालयाचा प्रस्ताव स्वीकारून पीएम ई-ड्राईव्ह अर्थात ‘प्रधान मंत्री इलेक्ट्रिक ड्राईव्ह रीवोल्युशन इन इनोवेटिव्ह वेहिकल एनहान्समेंट योजने’ला मंजुरी दिली आहे. यामुळे देशात विजेवर चालणाऱ्या वाहनांचा वाहतुकीसाठी वापर वाढण्याला प्रोत्साहन मिळणार आहे. योजनेत दोन वर्षांसाठी 10,900 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 44 वी ‘प्रगती’ बैठक संपन्न
August 28th, 06:58 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज आयसीटी आधारित प्रगती या मल्टी मोडल मंचाची 44 वी बैठक झाली. केंद्र आणि राज्य सरकारांचा यात समावेश असून सक्रीय प्रशासन आणि प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी हा यामागचा उद्देश आहे. तिसऱ्या कार्यकाळातील ही पहिलीच बैठक होती.प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
August 09th, 10:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना शहरी(पीएमएवाय -यू ) 2.0 ला मंजुरी देण्यात आली. योजनेअंतर्गत 1 कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना 5 वर्षात शहरी भागात परवडणाऱ्या किमतीत घर बांधणे, खरेदी करणे किंवा भाडेतत्त्वावर देणे यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेश/पीएलआय यांच्यामार्फत आर्थिक सहाय्य प्रदान केले जाईल. योजनेअंतर्गत 2.30 लाख कोटी रुपयांचे सरकारी साहाय्य पुरवले जाईल.लिग्नोसेल्युलोसिक बायोमास आणि इतर नवीकरणीय फीडस्टॉक वापरून प्रगत जैवइंधन प्रकल्पांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी ‘प्रधानमंत्री जी-वन योजने’मधील सुधारणेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
August 09th, 10:21 pm
लिग्नोसेल्युलोसिक बायोमास आणि इतर नवीकरणीय फीडस्टॉक वापरून प्रगत जैवइंधन प्रकल्पांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी ‘प्रधानमंत्री जी-वन योजने’ मधील सुधारणेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.एकात्मिक फलोत्पादन विकासासाठी मिशन अंतर्गत स्वच्छ रोप कार्यक्रमाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
August 09th, 10:17 pm
1765.67 कोटी रुपयांच्या भरीव तरतुदीने राबवण्यात येणाऱा हा अग्रणी उपक्रम, भारतातील फलोत्पादन क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी सज्ज आहे आणि उत्कृष्टता आणि शाश्वततेचे नवे मापदंड प्रस्थापित करण्याची अपेक्षा आहे.मंत्रिमंडळाने मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक केंद्रांमध्ये सर्वात कमी अंतराची रेल्वे संपर्क सुविधा प्रदान करण्यासाठी 309 किमी लांबीच्या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला दिली मंजुरी
August 09th, 09:58 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने (CCEA) रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत एकूण 18,036 कोटी रुपये (अंदाजे) खर्चाच्या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. इंदूर आणि मनमाड दरम्यान प्रस्तावित नवीन रेल्वे मार्ग थेट संपर्क सुविधा प्रदान करेल आणि प्रवासाची गतिशीलता सुधारेल तसेच या प्रकल्पामुळे भारतीय रेल्वेला वर्धित कार्यक्षमता आणि सेवा विश्वासार्हता प्राप्त होईल. हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नवीन भारताच्या दृष्टिकोनाला अनुसरून आखण्यात आला आहे, जो या भागातील लोकांना “आत्मनिर्भर” बनवेल आणि त्या क्षेत्रामध्ये सर्वसमावेशक विकास करेल ज्यामुळे या भागातील लोकांच्या रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील.