ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
October 21st, 09:16 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी या दिग्गज कलाकाराला श्रद्धांजली वाहिली असून, भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानाचे आणि प्रेक्षकांच्या अनेक पिढ्यांना आनंद देण्याच्या त्यांच्या क्षमतेचे स्मरण केले.