पंतप्रधान मोदींचा मे महिना छायाचित्रांमधून

May 31st, 08:07 am

The month of May 2025 was marked by PM Modi’s dynamic leadership, from the success of Operation Sindoor and his visit to Adampur Airbase, to the inauguration of the WAVES Summit 2025. High-level meetings like the CCS and public interactions defined a month of national pride and developmental resolve.

पंतप्रधान मोदींचा मार्च महिना छायाचित्रांमधून

March 31st, 08:00 am

पंतप्रधान मोदींसाठी मार्च महिना महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत कार्यक्रमांमुळे अत्यंत व्यस्ततेचा ठरला. त्यांनी मॉरिशससोबतच्या संबंधांना बळकटी दिली तसेच त्यांना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. गुजरातच्या नवसारी येथे एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी लखपती दीदींची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला, गीरच्या जैवविविधतेचा शोध घेतला तसेच वनतारा येथे वन्यजीव संवर्धनासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची पाहणी केली. पंतप्रधान मोदींनी न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांचे यजमान म्हणून स्वागत केले तसेच त्यांच्यासमवेत त्यांनी गुरुद्वारा रकाब गंज साहिबला भेट दिली.

पंतप्रधान मोदींचा फेब्रुवारी महिना छायाचित्रांमधून

February 28th, 04:00 pm

पंतप्रधान मोदींनी फेब्रुवारीमध्ये फ्रान्स आणि अमेरिकेला दिलेल्या भेटीत पॅरिसमध्ये अध्यक्ष मॅक्रॉन यांची तर वॉशिंग्टनमध्ये अध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेतली. पॅरिसमध्ये त्यांनी एआय ऍक्शन समिटला संबोधित केले. भारतात, त्यांनी प्रयागराज येथील महाकुंभाला हजेरी लावली तसेच मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम येथे प्रार्थना केली. त्यांनी एनडीएच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, दिल्लीतील निवडणुकीत पक्षाच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले, भोपाळमधील ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमध्ये भाषण केले तसेच झुमोयर बिनंदिनी कार्यक्रमात आसामची समृद्ध संस्कृती साजरी केली.

पंतप्रधान मोदींचा जानेवारी महिना छायाचित्रांत

January 30th, 02:44 pm

पंतप्रधान मोदींचा पूर्ण जानेवारी महिना- नमो भारत ट्रेनमधील प्रवासापासून बर्फाच्छादित सोनमर्गला भेट, स्वाभिमान अपार्टमेंटमधील गृहनिर्माण योजनेच्या लाभार्थ्यांची भेट घेण्यापर्यंतच्या अनेकविध महत्त्वाच्या कार्यक्रमांनी भरलेला होता. ते प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात सहभागी झाले, नौदलाच्या नौकांचे त्यांनी राष्ट्रार्पण केले, तरुण नेत्यांशी संवाद साधला आणि इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांचीही भेट घेतली.