PM Modi outlines the M.A.N.A.V. vision for AI at India AI Impact Summit 2026
February 19th, 10:00 am
PM Modi inaugurated the AI Impact Summit 2026 and remarked that the world’s largest AI Impact Summit is being held in India, a nation representing one-sixth of humanity. He highlighted that the core purpose of the summit is to deliberate on how AI can be made human-centric. He also presented India’s M.A.N.A.V. Vision for AI and extended an invitation to the world with the call: ‘Design and Develop in India. Deliver to the World. Deliver to Humanity’.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 चे उद्घाटन
February 19th, 09:40 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ चे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. जगभरातील एक षष्ठांश मानवजातीचे प्रतिनिधित्व करत असलेल्या भारातात, जगातील ही सर्वात मोठी आणि ऐतिहासिक एआय इम्पॅक्ट समिट परिषद होत असल्याची बाब त्यांनी नमूद केली. भारतामध्ये जगातील सर्वात मोठी युवा लोकसंख्या आहे, तंत्रज्ञान विषयक कौशल्यांच्या बाबतीत सर्वात मोठे मनुष्यबळ भारतात आहे, यासोबतच भरभराटीला आलेली तंत्रज्ञानाधारीत परिसंस्थाही भारतात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भारत केवळ नवीन तंत्रज्ञानाची निर्मिती करत नाही, तर अभूतपूर्व वेगाने तंत्रज्ञानाचा अवलंबही करत असल्याचे त्यांनी नमूद केले. 140 कोटी भारतीय नव्या तंत्रज्ञानांचा अंगिकार करण्यासाठी उत्सुक असल्याचेही त्यांनी सांगितले. या सगळ्यांच्या वतीने त्यांनी, या परिषदेसाठी आलेल्या विविध देशांचे प्रमुख, जागतिक एआय विषयक परिसंस्थेतील आघाडीची व्यक्तिमत्वे आणि या परिषदेत सहभागी झालेल्या संशोधकांचे स्वागतही केले. या सगळ्यांनी नोंदवलेल्या सहभागाबद्दल त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली. या परिषदेचे यजमानपद भूषवणे ही केवळ भारतासाठीच नव्हे, तर ग्लोबल साऊथ अंतर्गत असलेल्या प्रत्येक देशासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये आयोजित ‘भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025‘ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
January 17th, 11:00 am
मागच्यावेळी ज्यावेळी मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलो होतो, त्यावेळी लोकसभा निवडणुकांना काही फार अवधी राहिलेला नव्हता. त्यावेळी आपल्या सर्वांवर असलेल्या विश्वासामुळे मी म्हटले होते की, पुढच्यावेळीही भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये मी जरूर उपस्थित राहीन. देशाने तिस-यांदा आम्हाला आशीर्वाद दिला आहे. तुम्ही सर्वांनी पुन्हा एकदा मला इथे आमंत्रित केले आहे, त्यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 चे उद्घाटन
January 17th, 10:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 या भारतातील सर्वात मोठ्या मोबिलिटी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी सलग तिसऱ्यांदा आपल्या सरकारला निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले. ते पुढे म्हणाले की, या वर्षी या प्रदर्शनाची व्याप्ती खूप वाढली असून राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात इतर दोन ठिकाणी देखील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले गेल्या वर्षी 800 प्रदर्शक सहभागी झाले होते आणि 2.5 लाख लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली . मोदी यांनी नमूद केले की, पुढल्या 5 दिवसांमध्ये अनेक नवीन वाहने इथे प्रदर्शित केली जातील आणि अनेक प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यातून हे दिसून येते की भारतात मोबिलिटीच्या भविष्याशी संबंधित खूप सकारात्मकता आहे, असे ते म्हणाले. प्रदर्शनाच्या ठिकाणी भेट दिल्याचा उल्लेख करताना, मोदी म्हणाले , भारताचा वाहन निर्मिती उद्योग विलक्षण आहे आणि भविष्यासाठी सज्ज आहे .यावेळी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, येत्या 12 डिसेंबर रोजी कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी वार्षिक शिखर परिषदेचं उद्घाटन
December 11th, 04:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, येत्या 12 डिसेंबर रोजी, संध्याकाळी पाच वाजता, नवी दिल्लीत भारत मंडपम इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेकृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी शिखर परिषदेचे उद्घाटन होणार आहे.