एलव्हीएम3-एम6 आणि ब्लूबर्ड ब्लॉक-2 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांनी अवकाश शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे केले अभिनंदन
December 24th, 10:04 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय भूमीवरून प्रक्षेपित केलेल्या सर्वात वजनदार उपग्रह एलव्हीएम3-एम6 आणि अमेरिकेच्या ब्लूबर्ड ब्लॉक-2 या अंतराळयानाचे त्यांच्या इच्छित कक्षेत यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल अंतराळ शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन केले आहे. भारताच्या अंतराळ प्रवासातील हा एक अभिमानास्पद टप्पा आहे आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे, असे मोदी यांनी सांगितले.भारत आणि जपान यांच्यामधला सुरक्षा सहकार्याविषयक संयुक्त जाहीरनामा
August 29th, 07:43 pm
भारत आणि जपान सरकार (यानंतर यांचा उल्लेख ‘दोन/दोन्ही पक्ष’ असा केला जाईल )आगामी दशकासाठी भारत-जपान संयुक्त दृष्टिकोन: विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीसाठी आठ दिशानिर्देश
August 29th, 07:11 pm
भारत आणि जपान; मुक्त, खुला, शांत, समृद्ध आणि दडपशाहीमुक्त हिंद-प्रशांत प्रदेशाचा कायद्याच्या नियमांवर आधारित समान दृष्टिकोन असलेले दोन देश, पूरक संसाधन देणग्या, तांत्रिक क्षमता आणि किफायतशीर स्पर्धात्मकता असलेल्या दोन अर्थव्यवस्था तसेच मैत्री आणि परस्पर सद्भावनेची दीर्घ परंपरा असलेली दोन राष्ट्रे म्हणून पुढील दशकात आपल्या देशांमध्ये आणि जगात मोठ्या प्रमाणात बदल आणि संधी एकत्रितपणे वहन करण्याचा, आपली संबंधित देशांतर्गत उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करण्याचा तसेच आपल्या देशांना आणि पुढच्या पिढीतील लोकांना पूर्वीपेक्षा जास्त जवळ आणण्याचा आपला हेतू याद्वारे व्यक्त करीत आहेत.15व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेतील संयुक्त निवेदन: आपल्या भावी पिढीच्या सुरक्षिततेसाठी आणि समृद्धीसाठी भागीदारी
August 29th, 07:06 pm
जपानचे पंतप्रधान महामहीम इशिबा शिगेरू यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेसाठी 29-30 ऑगस्ट 2025 रोजी जपानला अधिकृत कार्य भेट दिली. 29 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी पंतप्रधान मोदींचे स्वागत पंतप्रधान इशिबा यांनी पंतप्रधान कार्यालयात (कांटेई) केले, जिथे त्यांना औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. दोन्ही पंतप्रधानांनी शिष्टमंडळ-स्तरीय चर्चा केली. यावेळी त्यांनी भारत आणि जपानमधील दीर्घकाळापासून कायम राहिलेल्या मैत्रीची आठवण केली, जी ऐतिहासिक संबंध, सामायिक मूल्ये आणि हितसंबंध, समान धोरणात्मक दृष्टिकोन आणि परस्परांबद्दलचा आदर यामध्ये रुजलेली आहे. दोन्ही पंतप्रधानांनी गेल्या दशकात भारत-जपान भागीदारीने केलेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीचे कौतुक केले आणि आगामी दशकात परस्पर सुरक्षितता आणि समृद्धी साधण्यासाठी धोरणात्मक आणि दूरगामी भागीदारी मजबूत करण्याच्या मार्गांवर रचनात्मक चर्चा केली.पंतप्रधानांचा जपान आणि चीन दौरा
August 22nd, 06:15 pm
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी अनुक्रमे 29-30 ऑगस्ट 2025 रोजी जपानला आणि 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 दरम्यान चीनला भेट देणार आहेत. जपानमध्ये, पंतप्रधान 15 व्या वार्षिक भारत-जपान शिखर परिषदेत सहभागी होणार असून जपानचे पंतप्रधान इशिबा यांच्याशी चर्चा करतील. चीनमध्ये पंतप्रधान तियानजिनमध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत.