पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 जानेवारी रोजी ओडिशा आणि उत्तराखंडला देणार भेट
January 27th, 06:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या – 28 जानेवारी रोजी ओडिशा आणि उत्तराखंडला भेट देणार आहेत. सकाळी 11 वाजता ते भुवनेश्वरमधील जनता मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘उत्कर्ष ओडिशा - मेक इन ओडिशा कॉन्क्लेव्ह 2025’ चे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर ते उत्तराखंडमधील डेहराडूनला जातील आणि संध्याकाळी 6 .00 वाजता ते 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करतील.