अंतराळ संशोधनावरील (स्पेस एक्सप्लोरेशन) जागतिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे केलेले संबोधन
May 07th, 12:00 pm
ग्लोबल स्पेस एक्सप्लोरेशन कॉन्फरन्स (अंतराळ संशोधन परिषद) 2025 मध्ये आपल्या सर्वांबरोबर सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे. अंतराळ हा केवळ एक टप्पा नसून, जिज्ञासा, साहस आणि सामूहिक प्रगतीची घोषणा आहे. भारताचा अंतराळ प्रवास याच भावनेचे प्रतिबिंब आहे. 1963 मध्ये एक छोटे रॉकेट प्रक्षेपित करण्यापासून ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा पहिला देश ठरण्यापर्यंतचा आमचा प्रवास उल्लेखनीय आहे. आमची रॉकेट केवळ पेलोडच नव्हे तर एक अब्ज चाळीस कोटी भारतीयांची स्वप्ने सोबत घेऊन जातात. भारताची कामगिरी हे एक महत्वाचे वैज्ञानिक यश आहे. शिवाय मानवी आकांक्षा गुरुत्वाकर्षणाचा प्रतिरोध करू शकते, याचा हा पुरावा आहे. भारताने 2014 मध्ये पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचून इतिहास रचला होता. चांद्रयान-1 ने चंद्रावर पाण्याचा शोध घेण्यासाठी सहाय्य केले. चांद्रयान-2 ने आपल्याला चंद्राची सर्वाधिक रिझोल्यूशनची (स्पष्ट) छायाचित्र पाठवली. चांद्रयान -3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाबाबत आपल्याला अधिक माहिती पुरवली. आम्ही विक्रमी वेळेत क्रायोजेनिक इंजिन तयार केले. आम्ही एकाच मोहिमेत 100 उपग्रह प्रक्षेपित केले. आम्ही आमच्या प्रक्षेपण वाहनां द्वारे 34 देशांचे 400 हून अधिक उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. यावर्षी आम्ही दोन उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केले, जे एक मोठे पाऊल आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक अंतराळ संशोधन परिषद (GLEX) 2025 ला केले संबोधित
May 07th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जागतिक अंतराळ संशोधन परिषद (GLEX) 2025 ला संबोधित केले. जगभरातील प्रतिष्ठित प्रतिनिधी, वैज्ञानिक आणि अंतराळवीरांचे त्यांनी स्वागत केले. GLEX 2025 मध्ये त्यांनी भारताचा उल्लेखनीय अंतराळ प्रवास अधोरेखित केला. ते म्हणाले की, अंतराळ हे केवळ एक गंतव्यस्थान नाही तर कुतूहल, धैर्य आणि सामूहिक प्रगतीची घोषणा आहे.