उदयोन्मुख विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष परिषदेत पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
November 03rd, 11:00 am
आजचा कार्यक्रम विज्ञानाशी संबंधित आहे, मात्र मी आधी भारताच्या क्रिकेटमधील दिमाखदार विजयाबद्दल बोलेन. आपल्या क्रिकेट संघाच्या यशाने संपूर्ण भारत आनंदित आहे. हा भारताचा पहिला महिला विश्वचषक आहे. मी आपल्या महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन करतो. आम्हाला तुमचा अभिमान आहे. तुमच्या यशामुळे देशभरातील लाखो तरुणांना प्रेरणा मिळेल.पंतप्रधानांनी उदयोन्मुख विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष 2025 बैठकीला केले संबोधित
November 03rd, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे आयोजित उदयोन्मुख विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष 2025 (ईएसटीआयसी) बैठकीला संबोधित केले.याप्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी देश-परदेशातील विज्ञानिक, नवोन्मेषकर्ते, शिक्षण क्षेत्राचे सदस्य तसेच इतर सन्माननीय पाहुण्यांचे स्वागत केले. आयसीसी महिला विश्वचषक 2025 स्पर्धेत भारतीय संघाने मिळवलेल्या उल्लेखनीय विजयाबद्दल बोलताना, भारतीय क्रिकेट संघाच्या या यशामुळे संपूर्ण देश आनंदित झाला आहे हे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. भारताने मिळवलेला हा पहिलाच महिला क्रिकेट विश्वचषक होता यावर अधिक भर देत त्यांनी महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन केले. देशाला या क्रिकेटपटूंचा अभिमान आहे असे सांगत या खेळाडूंचे यश देशभरातील लाखो तरुणांना प्रेरणा देईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (119 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
February 23rd, 11:30 am
काही वर्षांपूर्वी कुणी विचार केला असेल की या क्षेत्रात स्टार्ट-अप आणि खासगी क्षेत्रातील अंतराळ कंपन्यांची संख्या शेकडोच्या घरात जाईल ? जीवनात काहीतरी रोमांचक आणि थरारक गोष्टी करू इच्छिणाऱ्या आपल्या युवकांसाठी अंतराळ क्षेत्र हा एक उत्तम पर्याय बनत आहे.आभासी G-20 परिषदेच्या समारोप प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले निवेदन (22 नोव्हेंबर 2023)
November 22nd, 09:39 pm
आपण मांडलेल्या मौल्यवान विचारांची मी पुन्हा एकदा प्रशंसा करतो. तुम्ही ज्या मोकळ्या मनाने आपले मत व्यक्त केले त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो.जी 20 आभासी शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन
November 22nd, 06:37 pm
मला आठवते, माझे मित्र आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी गेल्या वर्षी 16 नोव्हेंबरला माझ्याकडे औपचारिक अध्यक्षपद सोपवले होते , तेव्हा मी सांगितले होते की, आपण सर्वजण मिळून जी -20 ला सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, कृती-केंद्रित आणि निर्णायक बनवू. आपण एकत्रितपणे एका वर्षात हे साध्य केले आहे. आपण एकत्रितपणे जी -20 ला नवीन उंचीवर नेले आहे.