पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारी रोजी इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 चे करणार उद्घाटन
February 18th, 03:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारीला नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 ला भेट देतील आणि या परिषदेचे उद्घाटन करतील. यापूर्वी, 18 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता, पंतप्रधान भारत मंडपम येथे शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या विविध देशांच्या नेत्यांचे स्वागत करतील. यावेळी पंतप्रधान शिखर परिषदेला उपस्थित राहणाऱ्या अनेक जागतिक नेत्यांबरोबर द्विपक्षीय बैठकाही घेतील.