पंतप्रधानांनी एक्रा येथील नक्रुम्हा मेमोरियल पार्कमध्ये केले अभिवादन
July 03rd, 03:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घाना येथील एक्रा शहरातील नक्रुम्हा मेमोरियल पार्कला भेट दिली आणि घानाचे पहिले राष्ट्राध्यक्ष आणि आफ्रिकन स्वातंत्र्य चळवळीचे अग्रणी डॉ. क्वामे नक्रुम्हा यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्यासोबत घानाच्या उपराष्ट्राध्यक्ष महामहीम प्रा. नाना जेन ओपोकू-अजेमांग उपस्थित होत्या. पंतप्रधानांनी डॉ. नक्रुम्हा यांच्या स्मृतीस्थळी पुष्पचक्र अर्पण केले आणि स्वातंत्र्य, एकता आणि सामाजिक न्यायाप्रति त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल एक मिनिट मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली.घाना प्रजासत्ताकाच्या संसदेला पंतप्रधानांनी केलेले संबोधन
July 03rd, 03:45 pm
भूमीवर येणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाचा प्रतिनिधी म्हणून मी माझ्या समवेत 140 कोटी भारतीयांच्या सद्भावना आणि शुभेच्छा घेऊन आलो आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घानाच्या संसदेला केले संबोधित
July 03rd, 03:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घानाच्या संसदेत आयोजित विशेष अधिवेशनाला संबोधित केले आणि असे करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. घानाच्या संसदेचे अध्यक्ष अल्बन किंग्सफर्ड सुमाना बॅगबिन यांच्या अध्यक्षतेखाली हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. या अधिवेशनाला, घाना आणि भारताचे संसद सदस्य, शासकीय अधिकारी यांच्यासह निमंत्रित मान्यवर पाहुणे उपस्थित होते.पंतप्रधानांच्या घाना दौऱ्यात विविध क्षेत्रात झालेले सामंजस्य करार
July 03rd, 04:01 am
• द्विपक्षीय संबंधांचे व्यापक भागीदारीमध्ये रूपांतर करणे‘द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना' हा पुरस्कार स्वीकारताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
July 03rd, 02:15 am
घानाच्या राष्ट्रपतींकडून 'द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना', या घानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित होणे, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे.पंतप्रधानांना घानाचा राष्ट्रीय सन्मान प्रदान
July 03rd, 02:12 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निपुण राजकारणपटुत्व आणि प्रभावी जागतिक नेतृत्व यांची दखल घेत आज घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन ड्रामानी महामा यांनी घानाचा राष्ट्रीय सन्मान पुरस्कार - ‘ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ - पंतप्रधान मोदी यांना प्रदान केला. 140 कोटी भारतीयांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारत असल्याचे सांगत, पंतप्रधानांनी हा सन्मान भारतीय तरुणांच्या आकांक्षा, त्याच्या सांस्कृतिक परंपरा आणि विविधता आणि घाना व भारत यांच्यातील ऐतिहासिक संबंधांना समर्पित केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली घानाच्या राष्ट्राध्यक्षांची भेट
July 03rd, 01:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घानाचे अध्यक्ष जॉन ड्रामानी महामा यांची भेट घेतली. ज्युबिली हाऊस येथे पंतप्रधानांचे आगमन होताच अध्यक्ष महामा यांनी त्यांचे स्वागत केले. भारतीय पंतप्रधानांची घानाला, गेल्या तीन दशकातील ही पहिलीच भेट आहे.घानाच्या राष्ट्रपतींसोबत संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले निवेदन
July 03rd, 12:32 am
तीन दशकांच्या मोठ्या खंडानंतर भारतीय पंतप्रधान घानाला भेट देत आहेत.अधिकृत दौऱ्यासाठी पंतप्रधानांचे घानामध्ये आगमन
July 02nd, 09:20 pm
घाना देशाच्या अधिकृत दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अक्रा येथे पोहोचले. विमानतळावर घानाचे अध्यक्ष एच ए जॉन ड्रामानी महामा यांनी पंतप्रधानांचे सन्मानपूर्वक स्वागत केले. यामधून दोन्ही देशांमधील मजबूत आणि ऐतिहासिक मैत्रीच्या बंधांना उजाळा मिळाला.घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझिल आणि नामिबिया या देशांच्या दौऱ्यावर रवाना होण्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
July 02nd, 07:34 am
घानाचे राष्ट्रपती जॉन द्रामनी महामा यांच्या आमंत्रणाचा मान राखत मी 2 आणि 3 जुलै रोजी घाना देशाला भेट देईन. जगाच्या दक्षिणेकडील देशांपैकी घाना हा आपला महत्त्वाचा भागीदार देश आहे आणि हा देश आफ्रिकन महासंघ तसेच पश्चिम आफ्रिकी राष्ट्रांचा आर्थिक समुदाय यामध्ये महत्वाची भूमिका निभावतो.उभय देशांमधील ऐतिहासिक बंध आणखी दृढ करण्यासाठी आणि गुंतवणूक, उर्जा, आरोग्य, सुरक्षा, क्षमता निर्मिती तसेच विकासविषयक भागीदारी या क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दालने खुली करण्यासाठी मी उत्सुक आहे. सहकारी लोकशाही देश असलेल्या घानाच्या संसदेत भाषण करणे हा माझा सन्मान असेल असे मी समजतो.पंतप्रधानांचा घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबिया दौरा (02 - 09 जुलै )
June 27th, 10:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 02-03 जुलै 2025 दरम्यान घानाला भेट देतील. पंतप्रधानांचा घानाचा हा पहिलाच द्विपक्षीय दौरा असेल. तीन दशकांनंतर भारताचे पंतप्रधान घानाला भेट देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान घानाच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करून मजबूत द्विपक्षीय भागीदारीचा आढावा घेतील आणि आर्थिक, ऊर्जा आणि संरक्षण सहकार्य आणि विकास सहकार्य भागीदारीद्वारे ती वाढवण्यासाठी अन्य मार्गांवर चर्चा करतील. हा दौरा दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि ECOWAS [पश्चिम आफ्रिकन देशांचा आर्थिक समुदाय] आणि आफ्रिकन संघासोबत भारताचे संबंध मजबूत करण्याप्रति सामायिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार करेल.पंतप्रधान मोदींनी आफ्रिकन देशांतील नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली
March 10th, 04:59 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आफ्रिकन देशांच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली आणि त्यांच्यासोबत सहकार्य वाढविण्याबाबत चर्चा केली. पंतप्रधान घाना, कोटे डि आयव्हर, इक्वेटोरियल गिनी, नायजर, चाड आणि नाऊरु यांच्या नेत्यांना भेटलेIndia-Africa Summit: PM meets African leaders
October 28th, 11:24 am