वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेतील विशेष चर्चेमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 08th, 12:30 pm
मी आपले आणि सदनातील सर्व माननीय सदस्यांचे हार्दिक आभार मानतो, आपण या महत्त्वाच्या क्षणानिमित्त एक सामूहिक चर्चेचा निर्णय घेतला. ज्या मंत्राने, ज्या जयघोषाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला ऊर्जा दिली होती, प्रेरणा दिली होती, त्याग आणि तपस्येचा मार्ग दाखवला होता, त्या वंदे मातरमचे पुण्यस्मरण करणे, हे या सदनातील आपल्या सर्वांचे खूप मोठे भाग्य आहे. आणि आपल्यासाठी ही अभिमानाची बाब आहे की वंदे मातरमच्या 150 वर्षांनिमित्त या ऐतिहासिक प्रसंगाचे आपण साक्षीदार ठरत आहोत. एक असा कालखंड जो आपल्या समोर इतिहासातल्या अगणित घटना समोर घेऊन येतो. ही चर्चा सदनाची वचनबद्धता तर प्रकट करेलच त्याचसोबत आगामी पिढ्यांसाठीही, प्रत्येक पिढीसाठी शिकवण ठरू शकेल, जर आपण सर्वांनी मिळून याचा सदुपयोग केला तर.वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत आयोजित विशेष चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
December 08th, 12:00 pm
वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत आयोजित विशेष चर्चेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. या अत्यंत विशेष प्रसंगी, सामुहिक चर्चेचा मार्ग निवडल्याबद्दल पंतप्रधानांनी सदनातील सर्व सन्माननीय सदस्यांप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले की, त्याग आणि तपश्चर्येचा मार्ग दाखवत देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला उर्जा आणि प्रेरणा देणारा वंदे मातरम हा मंत्र आणि हे आवाहन आपण स्मरतो आहोत ही सभागृहातील सर्वांसाठी अत्यंत विशेष बाब आहे.आपल्या देशाला वंदे मातरमची ऐतिहासिक अशी 150 वी वर्षपूर्ती पाहायला मिळते आहे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे हे त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधान म्हणाले की हा कालावधी आपल्यासमोर इतिहासातील असंख्य घटना उभ्या करतो.या चर्चेद्वारे सदनाची कटिबद्धता दर्शवण्यासोबतच जर सगळ्यांनी या चर्चेचा चांगला उपयोग करून घेतला तर ही चर्चा भविष्यातील पिढ्यांसाठी शिक्षणाचा स्त्रोत म्हणून देखील काम करू शकते यावर पंतप्रधानांनी अधिक भर दिला.हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 06th, 08:14 pm
येथे हिंदुस्तान टाइम्स शिखर परिषदेत देश-विदेशातील अनेक मान्यवर उपस्थित आहेत. आयोजकांचे आणि ज्यांनी आपले विचार मांडले त्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. थोड्याच वेळापूर्वी शोभना जींनी दोन मुद्दे मांडले, जे मी विशेष लक्षात घेतले आहेत. एक म्हणजे त्यांनी सांगितले की मागच्या वेळी मोदीजी आले होते, तेव्हा त्यांनी एक सूचना दिली होती. या देशात माध्यम संस्थांनी काय काम करावे, हे सांगण्याचे धैर्य कोणीही करू शकत नाही. पण मी ते केले होते, आणि मला आनंद आहे की शोभनाजी आणि त्यांच्या टीमने ते काम मोठ्या आवडीने केले. आणि देशाला – मी आत्ताच प्रदर्शन पाहून आलो – मी सर्वांना विनंती करतो की प्रदर्शन नक्की पाहा. या छायाचित्रकार सहकाऱ्यांनी त्या क्षणांना असे टिपले आहे की ते क्षण अमर झाले आहेत. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली आणि तीही मी ज्या शब्दांत समजलो, त्यांनी म्हटले की तुम्ही पुढेही… त्या असेही म्हणू शकल्या असत्या की तुम्ही पुढेही देशाची सेवा करत राहा, पण हिंदुस्तान टाइम्सने असे म्हटले की तुम्ही पुढेही अशीच सेवा करत राहा, यासाठी मी विशेष आभार व्यक्त करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत आयोजित हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप समिट 2025 या शिखर परिषदेला केले संबोधित
December 06th, 08:13 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत आयोजित हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप समिट 2025 या शिखर परिषदेला संबोधित केले. त्यांनी संमेलनात उपस्थित असलेल्या देशातील आणि परदेशातील अनेक मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीची दखलपूर्ण नोंद घेतली. त्यांनी आयोजकांना तसेच या परिषदेत आपले विचार मांडलेल्या सर्वांना अभिनंदनपर शुभेच्छाही दिल्या. शोभना यांनी उल्लेख केलेल्या दोन मुद्द्यांची आपण काळजीपूर्वक नोंद घेतली असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. त्यांनी आपल्या मागील भेटीचा संदर्भ दिला, त्यावेळी आपण त्यांना माध्यम समुहांतर्फे क्वचितच हाती घेतल्या जाणार्या गोष्टीबद्दल सुचवले होते याची आठवण त्यांनी करून दिली, आणि या समुहाने ते केले, असेही त्यांनी नमूद केले. शोभना आणि त्यांच्या चमूने उत्साहाने आपली सूचना पूर्ण केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. जेव्हा आपण प्रदर्शनाला भेट दिली, तेव्हा छायाचित्रकारांनी क्षण अशा पद्धतीने टिपले की ते अमर झाल्यासारखे वाटले असे ते म्हणाले. आपण ते प्रदर्शन पाहिले असून, सर्वांनी ते पाहावे, असे आवाहन त्यांनी केले. शोभना यांनी उल्लेख केलेल्या दुसर्या मुद्याच्या संदर्भानेही त्यांनी भाष्य केले. त्यांचे म्हणणे म्हणजे केवळ आपण देशाची सेवा करत राहावी अशी इच्छा नाही, तर हिंदुस्तान टाईम्सनेच आपण त्याच पद्धतीने सेवा करत राहावे, असे म्हटले आहे, असे म्हणत याबद्दल त्यांनी विशेष कृतज्ञताही व्यक्त केली.India and Russia are embarking on a new journey of co-innovation, co-production, & co-creation: PM Modi says during the India–Russia Business Forum
December 05th, 03:45 pm
In his address at the India–Russia Business Forum, PM Modi conveyed deep gratitude to his friend President Putin for joining the forum. He noted that discussions have commenced on a Free Trade Agreement between India and the Eurasian Economic Union. He remarked that meaningful discussions have taken place over the past two days and expressed his happiness that all areas of India–Russia cooperation were represented.रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासमवेत झालेल्या भारत-रशिया व्यवसाय मंचाच्या संयुक्त बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण
December 05th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे अध्यक्ष माननीय व्लादिमीर पुतिन यांच्यासमवेत नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे पार पडलेल्या भारत-रशिया व्यवसाय मंचाच्या बैठकीला संबोधित केले. पंतप्रधानांनी माननीय राष्ट्राध्यक्ष पुतीन, भारत आणि परदेशातील नेते आणि सर्व मान्यवर पाहुण्यांना अभिवादन करून आपल्या भाषणाची सुरुवात केली. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राष्ट्राध्यक्ष पुतीन आपल्यासोबत मोठे शिष्टमंडळ घेऊन आले असल्याने भारत-रशिया व्यवसाय मंच हा त्यांच्या महत्त्वपूर्ण पुढाकाराचे द्योतक असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी बैठकीत सहभागी होत असलेल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत त्यांच्यामध्ये उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी आपले मित्र राष्ट्रपती पुतीन यांचे या मंचाच्या बैठकीत सहभागी झाल्याबद्दल आणि त्यांचे मोलाचे विचार मांडल्याबद्दल मनापासून आभार मानले. व्यवसायासाठी सुलभ आणि खात्रीलायक अशी यंत्रणा तयार केली जात असल्याचे स्पष्ट करत त्यांनी भारत आणि युरेशियन आर्थिक संघ यांच्यात मुक्त व्यापार करारावर चर्चा सुरू झाल्याचे नमूद केले.संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधानांनी माध्यमांना दिलेल्या निवेदनाचा मजकूर
December 01st, 10:15 am
हे हिवाळी अधिवेशन केवळ एक नित्यनेमाने होणारी घटना नाही. हे अधिवेशन देशाच्या प्रगतीला गती देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना ऊर्जा देईल, असा विश्वास मला वाटतो. भारत हा लोकशाही जगणारा देश आहे आणि आपण लोकशाहीवरील विश्वास दृढ करणाऱ्या मार्गांनी लोकशाहीबद्दल वाटणारा उत्साह वारंवार दाखवला आहे. बिहारमध्ये अलिकडेच झालेल्या निवडणुकीत जे विक्रमी मतदान झाले, ती लोकशाहीची खरी ताकद आहे. माता आणि भगिनींचा वाढता सहभाग ही नवीन आशा आणि आत्मविश्वास निर्माण करणारी महत्वाची बाब आहे. एकीकडे लोकशाहीची ताकद आणि या लोकशाही व्यवस्थेतील अर्थव्यवस्थेची ताकद यावर जग बारकाईने लक्ष ठेवून आहे. भारताने सिद्ध केले आहे, की लोकशाही चांगले परिणाम करू शकते. आज भारताची आर्थिक परिस्थिती ज्या वेगाने नवीन उंची गाठत आहे. हे केवळ आपल्यामध्ये नवीन आत्मविश्वास निर्माण करत नाही तर विकसित भारताच्या ध्येयाकडे वाटचाल करताना आपल्याला नवीन बळ देखील देते आहे.2025 च्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ होण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
December 01st, 10:00 am
संसदेच्या 2025 च्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेच्या आवारात प्रसारमाध्यमांसमोर निवेदन केले. हे अधिवेशन केवळ एक औपचारिकता नसून, देशाच्या सध्याच्या वेगवाग प्रगतीच्या वाटचालीकरता ऊर्जेचा एक महत्त्वाचा स्रोत आहे, असे ते म्हणाले. हे अधिवेशन देशाच्या प्रगतीला अधिक गती देण्यासाठी सध्या सुरू असलेल्या प्रयत्नांना नवी ऊर्जा देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.गोव्यामधील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्धापनदिन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
November 28th, 03:35 pm
आज या पवित्र प्रसंगी मनामध्ये खोलवर शांतता भरली आहे. साधू-संतांच्या सानिध्यामध्ये बसल्यानंतर आपोआपच आध्यात्मिक अनुभव येत असतो. इथे विशाल संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांमुळे लक्षात येते की, या मठाची शतकांपासूनच प्राचीन जीवंत शक्ती आजही वृद्धिंगत होत आहे. आज या समारंभाला मला उपस्थित राहता आले, याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान मानतो. इथे येण्यापूर्वी मला राम मंदिर आणि वीर विठ्ठल मंदिराचे दर्शन करण्याचे भाग्य लाभले. त्या शांत वातावरणाने या कार्यक्रमाच्या आध्यात्मिकतेला आणखी सखोलता प्राप्त झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्षपूर्ती समारंभाला केले संबोधित
November 28th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्षपूर्ती समारंभाला संबोधित केले. या पवित्र प्रसंगी आपले मन गहन शांतीने भरले आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. संतांच्या उपस्थितीत, त्यांच्या सोबत बसणे हा स्वतःच एक आध्यात्मिक अनुभव आहे, यावर त्यांनी भर दिला. येथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भक्तांमुळे या मठाची शतकानुशतके जुनी जिवंत शक्ती आणखी वाढली आहे, असे नमूद करून मोदी म्हणाले की, आज या समारंभात लोकांमध्ये उपस्थित राहणे हे आपले भाग्य आहे. येथे येण्यापूर्वी आपल्याला राम मंदिर आणि वीर विठ्ठल मंदिराला भेट देण्याचा सौभाग्य लाभले, असे त्यांनी सांगितले. तेथील शांतता आणि तिथल्या वातावरणामुळे या समारंभाची आध्यात्मिकता अधिक सखोल झाली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.हैदराबादमधील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया सुविधेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मराठी अनुवाद
November 26th, 10:10 am
“भारताचे नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी जी, सफ्रान समूहाशी संबंधित सर्व मान्यवर, आणि उपस्थित बंधू-भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया सुविधेचे दूरदृश्य प्रणालीद्वारे केले उद्घाटन
November 26th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील, जीएमआर एरोस्पेस अँड इंडस्ट्रियल पार्क - सेझ, येथील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया (एसएईएसआय) सुविधेचे उद्घाटन केले. आजपासून भारताचे हवाई वाहतूक क्षेत्र नवीन भरारी घेण्यासाठी सज्ज झाले आहे, सफ्रानच्या या नव्या सुविधेमुळे भारत जागतिक एमआरओ अर्थात देखभाल, दुरुस्ती आणि संधारण केंद्र म्हणून उदयाला येईल, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. हे देखभाल, दुरुस्ती आणि संधारण सुविधा केंद्र युवकांसाठी उच्च तंत्रज्ञानाधारित हवाई वाहतूक क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करेल, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आपण 24 नोव्हेंबर रोजी सफ्रानच्या संचालक मंडळ आणि व्यवस्थापनाशी संवाद साधला होता आणि त्यांच्याबरोबर याआधीही झालेल्या चर्चेत भारताबद्दलचा त्यांचा विश्वास आणि आशा दिसून आली होती, असे पंतप्रधान म्हणाले. सफ्रानची भारतातील गुंतवणूक देखील त्याच गतीने कायम राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधानांची सफ्रानच्या टीमचे नवीन सुविधेबद्दल अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.मुंबईत मेरीटाईम लीडर्स परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 29th, 04:09 pm
महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी सर्बानंद सोनोवाल जी, शांतनु ठाकूर जी, कीर्तिवर्धन सिंह जी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, अजित पवार जी, नौवहन आणि इतर उद्योगांशी संबंधित नेते, इतर मान्यवर, स्त्री-पुरुष हो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई येथे ‘इंडिया मेरीटाईम वीक’ 2025 मध्ये मेरीटाईम लीडर्स परिषदेला केले संबोधित
October 29th, 04:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत इंडिया मेरीटाईम वीक 2025 मध्ये मेरीटाईम लीडर्स परिषदेला संबोधित केले तसेच सागरी क्षेत्रातील मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाचे (ग्लोबल मेरीटाईम सीईओ फोरम) अध्यक्षपद भूषवले. या प्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी ग्लोबल मेरीटाईम लीडर्स परिषदेला उपस्थित सर्व सहभागींचे स्वागत केले. हा कार्यक्रम 2016 मध्ये मुंबईत सुरू झाला आणि आता तो जागतिक शिखर परिषद म्हणून विकसित झाला आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. 85 हून अधिक देशांचा सहभाग असणे, ही गोष्ट एक मजबूत संदेश देत आहे , यावर मोदी यांनी भर दिला. या कार्यक्रमात आघाडीच्या प्रमुख नौवहन कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी , स्टार्टअप्स, धोरणकर्ते आणि नवोन्मेषकांच्या उपस्थितीची त्यांनी दखल घेतली. छोटी बेटे असलेल्या राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याचे नमूद करत ते म्हणाले की, अशा सर्वांच्या सामूहिक दृष्टिकोनामुळे शिखर परिषदेची ऊर्जा आणि समन्वय लक्षणीयरीत्या वाढला आहे.महाराष्ट्रातील मुंबई येथे अनेक विकास प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 08th, 03:44 pm
महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी रामदास आठवले जी, के.आर. नायडू जी, मुरलीधर मोहोळ जी, महाराष्ट्र सरकारचे उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे जी, अजित पवार जी, अन्य मंत्रीगण, जपानचे भारतातील राजदूत केइची ओनो आणि इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन, मुंबईतल्या विविध विकास प्रकल्पांचे देखील केले उद्घाटन आणि लोकार्पण
October 08th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले तसेच मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले. सर्व मान्यवरांचे स्वागत करत, मोदी यांनी उपस्थितांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.अलिकडेच पार पडलेल्या विजयादशमी आणि कोजागरी पौर्णिमेच्या उत्सवाचा उल्लेख करत त्यांनी आगामी दिवाळी सणासाठी शुभेच्छा दिल्या.नवी दिल्लीत, भारत मंडपम येथे, वर्ल्ड फूड इंडिया 2025 कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
September 25th, 06:16 pm
‘वर्ल्ड फूड इंडिया’ या कार्यक्रमामध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आणि अभिनंदन! आजच्या या आयोजनात आपले शेतकरी, उद्योजक, गुंतवणूकदार आणि ग्राहक, हे सर्व एकाच व्यासपीठावर एकत्र आलेले आहेत. ‘वर्ल्ड फूड इंडिया’ हा नव्या संपर्कांचा, नव्या संवादांचा आणि सर्जनशीलतेची एक पर्वणी ठरला आहे. मी थोड्याच वेळापूर्वी येथे भरवण्यात आलेल्या प्रदर्शनांना भेट देऊन आलो आहे. आनंदाची गोष्ट अशी की या प्रदर्शनात पोषणावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे, तेलाच्या वापरात बचत करण्यावर भर दिला आहे आणि पॅकबंद उत्पादनांची गुणवत्ता आणि पोषकता वाढवण्यावरही विशेष लक्ष देण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण आयोजनासाठी मी आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि मनःपूर्वक शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ल्ड फूड इंडिया 2025 कार्यक्रमाला केले संबोधित
September 25th, 06:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे आयोजित वर्ल्ड फूड इंडिया 2025 निमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. शेतकरी, उद्योजक, गुंतवणूकदार, नवोन्मेषक आणि ग्राहक हे सर्वजण या कार्यक्रमात एकाचवेळी उपस्थित असून , त्यामुळे वर्ल्ड फूड इंडिया नवीन संपर्क, नवीन जोडणी आणि सर्जनशीलतेचे व्यासपीठ बनले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आपण नुकतीच प्रदर्शनांना भेट दिली आहे असे सांगून पोषण, तेलाचा कमीत कमी वापर आणि पॅकेज केलेल्या उत्पादनांचा आरोग्यदायीपणा वाढवणे यावर प्राथमिक लक्ष केंद्रित केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी कार्यक्रमातील सर्व सहभागींचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.जीवनमानातील सुलभता वाढवण्यात आणि विकसित भारताची उभारणी करण्यात नेक्स्टजेन जीएसटी सुधारणांच्या योगदानाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
September 04th, 09:15 pm
भारताची वित्तीय बांधणी आणि जागतिक स्थान यांना नवा आकार देणाऱ्या धाडसी आर्थिक सुधारणा करण्याप्रती केंद्र सरकारची दशकभराची कटिबद्धता आज पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केली.गुंतवणुकीला अधिक चालना देणाऱ्या कॉर्पोरेट कर कपातीपासून, राष्ट्रीय बाजारपेठेचे एकीकरण करणाऱ्या जीएसटी अंमलबजावणीपर्यंत तसेच जीवनमानातील सुलभता वाढवणाऱ्या वैयक्तिक आयकर सुधारणांपर्यंत, सुधारणांची ही उड्डाणे सातत्यपूर्ण आणि नागरिक-केंद्री राहिली आहेत.भारताच्या सार्वजनिक आरोग्य आणि पोषण परिसंस्थेला बळकटी देण्यामध्ये नेक्स्टजेन जीएसटी सुधारणांचा परिवर्तनकारी परिणाम पंतप्रधानांनी केला अधोरेखित
September 04th, 09:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज #NextGenGST सुधारणांचा भारतातील सार्वजनिक आरोग्य आणि पोषण परिसंस्था मजबूत करण्यातील परिवर्तनकारी परिणाम अधोरेखित केला. आवश्यक अन्नपदार्थ, स्वयंपाकाच्या आवश्यक वस्तू आणि प्रथिनेयुक्त उत्पादनांवरील कर दर कमी करून, या सुधारणा देशभरातील कुटुंबांसाठी अधिक किफायतशीर आणि आहारातील उपलब्धतेत थेट योगदान देतात.