आसाममधील गुवाहाटी येथील लोकप्रिय गोपीनाथ बारदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

December 20th, 03:20 pm

आपले भाषण सुरू करण्यापूर्वी, मी आपल्या सर्वाना एक विनंती करीत आहे, आजचा हा 'विजय दिन' केवळ आसामसाठीच नाही तर संपूर्ण ईशान्येसाठी विकासाचा उत्सव आहे. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही आपले मोबाईल फोन काढावेत, फोनचा टॉर्च, फ्लॅश लाईट सुरू करावा आणि विकासाच्या या उत्सवात सहभागी व्हावे. प्रत्येकाने आपल्या मोबाईल फोनचा टॉर्च-फ्लॅश सुरू करावा आणि प्रचंड टाळ्यांचा गजरही करावा. संपूर्ण देशाला ऐकू आले पाहिजे आणि दिसले पाहिजे की, आसाम आता विकासाचा उत्सव साजरा करत आहे. ज्यावेळी विकासाचा प्रकाश पोहोचतो, त्यावेळी जीवनाचा प्रत्येक मार्ग नवीन उंची गाठू लागतो. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आसाममधील गुवाहाटी इथे लोकप्रिय गोपीनाथ बर्दोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन

December 20th, 03:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुवाहाटी इथे लोकप्रिय गोपीनाथ बर्दोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन झाले. या उद्घाटनामुळे आसामधील दळणवळणीय जोडणी, अर्थव्यवस्थेचा विस्तार आणि जागतिक सहभागातील परिवर्तनाच्या दिशेने एक मोठा टप्पा गाठला गेला. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधितही केले. आजचा दिवस आसाम आणि ईशान्य भारताच्या विकास आणि प्रगतीचा सोहळा आहे असे ते म्हणाले. जेव्हा प्रगतीची किरणे लोकांपर्यंत पोहोचतात, त्यावेळी जीवनातील प्रत्येक मार्ग नव्या उंचीला स्पर्श करू लागतो, असे त्यांनी अधोरेखित केले. आसामच्या भूमीशी आपली नाळ घट्टपणे जोडलेली असून, इथल्या लोकांचे प्रेम आणि स्नेह, तसेच विशेषतः आसाम आणि ईशान्य भारतातील माता-भगिनींमधला जिव्हाळा आपल्याला सातत्याने प्रेरणा देत आला आहे, त्यातूनच या क्षेत्राच्या विकासाचा सामूहिक संकल्पही मजबूत झाला आहे असे त्यांनी सांगितले. आज आसामच्या विकासात पुन्हा एकदा नवी अध्याय जोडला गेला आहे ही बाब त्यांनी नमूद केली. भारतरत्न भूपेन हजारिका यांच्या गीतातील ओळींचा संदर्भही त्यांनी दिला. विशाल ब्रह्मपुत्रा नदीचा काठ उजळून निघेल, अंधाराची प्रत्येक भिंत तुटून पडेल आणि हाच राष्ट्राचा संकल्प आणि पवित्र प्रतिज्ञा आहे, त्यामुळे हे निश्चितपणे घडून येईल असाच त्याचा अर्थ असल्याचे त्यांनी सांगितले.

भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या ' मैत्री सेतू ' चे पंतप्रधानांच्या हस्ते 9 मार्च रोजी उद्घाटन

March 07th, 08:50 pm

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 9 मार्च 2021 रोजी दुपारी 12 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून भारत आणि बांगलादेश यांच्यातील ‘मैत्री सेतु’ चे उद्घाटन करतील. या कार्यक्रमादरम्यान त्रिपुरामध्ये अनेक पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत.