भूपृष्ठीय कोळसा /लिग्नाइट गॅसिफिकेशन प्रकल्पांच्या प्रोत्साहन योजनेला 37,500 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीसह केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
May 13th, 03:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 37,500 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीसह भू-पृष्ठावरील कोळसा/लिग्नाइट गॅसिफिकेशन प्रकल्पांच्या प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली आहे.महत्वाच्या संरचना क्षेत्रातल्या कामगिरीचा पंतप्रधानांकडून आढावा
April 26th, 12:25 pm
पंतप्रधान मोदी ह्यांनी रस्ते, रेल्वे, विमानतळे, बंदरे, डिजिटल आणि कोळशासाहित महत्वाच्या संरचना क्षेत्रातल्या कामगिरीचा आढावा घेतला. बऱ्याच प्रकल्पांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली. पंतप्रधानांनी ग्रामीण रस्तेबांधणी आणि त्यांच्या दर्जावर बारकाईने देखरेख ठेवण्यास सांगितले. रस्ते बांधणीमध्ये नवीन तंत्रज्ञान वापरण्याची सूचना देखील पंतप्रधानांनी केली.