
पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथे सिटी गॅस वितरण प्रकल्पाच्या पायाभरणी कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
May 29th, 01:30 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी सुकांत मजूमदार, पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी, अलीपुरद्वारचे लोकप्रिय खासदार भाई मनोज तिग्गा, इतर खासदार, आमदार आणि पश्चिम बंगालच्या माझ्या आणि भगिनींनो!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील अलीपूरद्वार येथे 1010 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या शहर गॅस वितरण प्रकल्पाची पायाभरणी
May 29th, 01:20 pm
भारतात शहर गॅस वितरण (सीजीडी) जाळे विस्तारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथे सीजीडी प्रकल्पाची पायाभरणी केली. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी पश्चिम बंगालच्या लोकांचे अलीपुरद्वारच्या ऐतिहासिक भूमीवरून अभिनंदन केले. या प्रदेशाचे समृद्ध सांस्कृतिक महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. हे केवळ त्याच्या सीमांनीच नव्हे तर खोलवर रुजलेल्या परंपरा आणि संबंधांनी देखील ते परिभाषित केले आहे, यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधानांनी नमूद केले की,अलीपुरद्वारच्या सीमेपलिकडे एका बाजूला भूतान आहे, तर दुसऱ्या बाजूला आसाम आहे, जलपायगुडीच्या नैसर्गिक सौंदर्याने आणि कूचबिहारच्या अभिमानाने या प्रदेशाचा अविभाज्य भाग जोडलेला आहे. बंगालच्या वारसा आणि एकतेमध्ये त्याची भूमिका अधोरेखित करून त्यांनी या समृद्ध भूमीला भेट देताना विशेष आनंद झाल्याची भावना व्यक्त केली. विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने भारत वाटचाल करत असताना, बंगालचा सहभाग अपेक्षित आणि आवश्यक आहे, यावर भर देत मोदी यांनी या प्रदेशात पायाभूत सुविधा, नवोन्मेष आणि गुंतवणूकीला गती देण्यासाठी केंद्र सरकार करत असलेले निरंतर प्रयत्न अधोरेखित केले.बंगालचा विकास भारताच्या भविष्याचा आधारस्तंभ आहे,असे मोदी म्हणाले. आज या प्रवासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा जोडला आहे असे त्यांनी नमूद केले. त्यांनी अलीपुरद्वार आणि कूचबिहारमध्ये शहर गॅस वितरण प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली, ज्यामुळे 2.5 लाखांहून अधिक कुटुंबांना वाहिनीद्वारे स्वच्छ, सुरक्षित आणि किफायतशीर गॅस उपलब्ध होईल. मोदींनी नमूद केले की या उपक्रमामुळे एलपीजी सिलिंडर खरेदी करण्याची चिंता दूर होईल आणि कुटुंबांना सुरक्षित गॅस पुरवठा सुनिश्चित होईल.
रायझिंग ईशान्य गुंतवणूकदार परिषदेत पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
May 23rd, 11:00 am
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी ज्योतिरादित्य सिंधिया जी, सुकांता मजुमदार जी, मणिपूरचे राज्यपाल अजय भल्ला जी, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा जी, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू जी, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा जी, मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा जी, सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग जी, नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो जी, मिझोरमचे मुख्यमंत्री लालदुहोमा जी, सर्व उद्योगपती, गुंतवणूकदार, बंधु आणि भगिनींनो…पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रायझिंग नॉर्थ ईस्ट गुंतवणूकदार शिखर परिषद 2025 चे उद्घाटन
May 23rd, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे रायझिंग ईशान्य गुंतवणूकदार शिखर परिषद 2025 चे उद्घाटन केले. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत करताना, पंतप्रधानांनी ईशान्य प्रदेशाच्या भविष्याप्रति अभिमान, कळकळ आणि प्रचंड विश्वास व्यक्त केला. भारत मंडपम येथे अलिकडेच झालेल्या अष्टलक्ष्मी महोत्सवाची त्यांनी आठवण करून दिली आणि आजचा कार्यक्रम ईशान्य प्रदेशातील गुंतवणुकीचा उत्सव आहे यावर भर दिला. शिखर परिषदेला उपस्थित असलेल्या उद्योग धुरिणांचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. यातून या प्रदेशातील संधींबाबतचा उत्साह अधोरेखित झाला आहे असे ते म्हणाले. त्यांनी सर्व मंत्रालये आणि राज्य सरकारांचे अभिनंदन केले तसेच गुंतवणूक-पूरक वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. शुभेच्छा देत, पंतप्रधानांनी नॉर्थ ईस्ट रायझिंग शिखर परिषदेचे कौतुक केले आणि या प्रदेशाच्या निरंतर विकास आणि समृद्धीप्रति आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.तमिळनाडूमध्ये रामेश्वरम इथे विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि भूमीपूजन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 06th, 02:00 pm
तमिळनाडूचे राज्यपाल एन. रवि, केंद्रिय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव, डॉ. एल. मुरुगन, तमिळनाडू सरकारचे मंत्री, खासदार, अन्य मान्यवर आणि बंधु भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडूतील रामेश्वरम येथे 8,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन
April 06th, 01:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील रामेश्वरम येथे 8,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांची पायाभरणी केली, तसेच ते राष्ट्राला समर्पित केले. त्याआधी त्यांनी नवीन पंबन या रेल्वे पूलाचे उद्घाटन केले. हा भारतातील पहिला उभा उघडता येणारा सागरी पूल (vertical lift sea bridge) आहे. यावेळी पंतप्रधानांनी रस्ता पुलावरून एक रेल्वे गाडी आणि एका जहाजालाही हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी त्यांनी या सागरी पुलाच्या कार्यान्वयाचीही पाहणी केली. त्यांनी रामेश्वरम इथल्या रामनाथस्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजाही केली.छत्तीसगडमधील बिलासपूर येथे विविध विकास कामांचा प्रारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 30th, 06:12 pm
छत्तीसगडचे राज्यपाल रमेन डेका, इथले लोकप्रिय आणि उत्साही मुख्यमंत्री विष्णुदेव साय, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी मनोहर लाल, या मतदारसंघाचे खासदार आणि केंद्रातील मंत्री तोखन साहू, छत्तीसगड विधानसभेचे सभापती आणि माझे परम मित्र रमण सिंह, उपमुख्यमंत्री विजय शर्मा, अरूण साहू, छत्तीसगड सरकारमधील सर्व मंत्री, इथले सर्व खासदार आणि आमदार तसेच दूर -दूरवरून इथे आलेल्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो !पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील बिलासपूर येथे 33,700 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकासकामांची केली पायाभरणी आणि उद्घाटन
March 30th, 03:30 pm
पायाभूत सुविधांचा विकास आणि शाश्वत उपजीविका वाढवण्याच्या आपल्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्तीसगडमधील बिलासपूर येथे 33,700 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी केली, सोबतच अनेक प्रकल्पांच्या कामांचा प्रारंभ केला तर काही उपक्रम राष्ट्राला समर्पित केले. आजपासून सुरू होणारे नवीन वर्ष आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पंतप्रधानांनी माता महामायेची भूमी आणि माता कौशल्येचे माहेर असलेल्या छत्तीसगडचे महत्त्व अधोरेखित केले. स्त्री देवततांना समर्पित या नऊ दिवसांचे छत्तीसगडसाठी विशेष महत्त्व पंतप्रधानांनी सांगितले. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी छत्तीसगडमध्ये येण्याचा आपल्याला अभिमान आहे असे ते म्हणाले. भक्त शिरोमणी माता कर्मा यांच्या सन्मानार्थ अलिकडेच जारी करण्यात आलेल्या टपाल तिकिटाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. नवरात्रोत्सवाची सांगता रामनवमी साजरी करून होईल असे ते म्हणाले. रामनवमीचे पर्व छत्तीसगडमधील लोकांची भगवान रामावरील अद्वितीय भक्ती, विशेषतः ज्यांनी आपले संपूर्ण अस्तित्व भगवान रामाच्या नावाला समर्पित केले आहे अशा रामनामी समाजाच्या असाधारण समर्पणावर प्रकाश टाकणारे आहे असे ते म्हणाले. त्यांनी छत्तीसगडच्या लोकांना भगवान रामांच्या आजोळचा परिवार म्हणून संबोधित केले आणि त्यांना हार्दिक शुभेच्छाही दिल्या.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीदरम्यान जाहीर झालेले भारत-अमेरिका संयुक्त निवेदन
February 14th, 09:07 am
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष माननीय डोनाल्ड जे. ट्रम्प यांनी 13 फेब्रुवारी 2026 रोजी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचे वॉशिंग्टन डीसी येथे कामकाजा निमित्त अधिकृत भेटीसाठी स्वागत केले.भारत ऊर्जा सप्ताहातील पंतप्रधानांचे भाषण
February 11th, 11:37 am
भारतीय ऊर्जा सप्ताहासाठी (India Energy Week) जगभरातून इथे यशोभूमीवर एकत्र आलेल्या सर्व सहकाऱ्यांना नमस्कार! आपण सगळेजण केवळ ऊर्जा सप्ताहाचा भाग नाही आहात, आपण भारताच्या ऊर्जा महत्त्वाकांक्षांचाच एक महत्त्वाचा भाग आहात.भारत ऊर्जा सप्ताह 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन
February 11th, 09:55 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे भारत ऊर्जा सप्ताह 2025 मध्ये आपले विचार मांडले. यशोभूमी येथे उपस्थितांना संबोधित करताना, त्यांनी अधोरेखित केले की इथे उपस्थित असलेले सर्वजण केवळ ऊर्जा सप्ताहाचा भाग नाहीत तर भारताच्या ऊर्जा महत्त्वाकांक्षेचे अविभाज्य घटक आहेत. त्यांनी सर्व सहभागींचे तसेच परदेशातील मान्यवर पाहुण्यांचे हार्दिक स्वागत केले आणि या कार्यक्रमातील त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली.नवी दिल्ली येथे अष्टलक्ष्मी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 06th, 02:10 pm
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा जी, मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा जी, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा जी, सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी ज्योतिरादित्य सिंधिया जी, सुकांता मुजूमदार जी, अरुणाचल प्रदेशचे उप-मुख्यमंत्री, मिजोरम आणि नागालँडच्या सरकारचे मंत्रीगण, अन्य लोकप्रतिनिधी, ईशान्य प्रदेशातून आलेले सर्व बंधू आणि भगिनी, स्त्री आणि पुरुषगण,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन
December 06th, 02:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात सर्व मान्यवरांचे स्वागत करताना मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस असल्याचे नमूद केले. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाली असून ती सर्व नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे असे ते म्हणाले.Ensuring a better life for Jharkhand’s sisters and daughters is my foremost priority: PM Modi in Bokaro
November 10th, 01:18 pm
Jharkhand’s campaign heats up as PM Modi’s back-to-back rallies boost enthusiasm across the state. Ahead of the first phase of Jharkhand’s assembly elections, PM Modi today addressed a mega rally in Bokaro. He said that there is only one echo among the people of the state that: ‘Roti, Beti, Maati ki pukar, Jharkhand mein BJP-NDA Sarkar,’ and people want BJP-led NDA to come to power in the assembly polls.”PM Modi captivates crowds with impactful speeches in Jharkhand’s Bokaro & Gumla
November 10th, 01:00 pm
Jharkhand’s campaign heats up as PM Modi’s back-to-back rallies boost enthusiasm across the state. Ahead of the first phase of Jharkhand’s assembly elections, PM Modi today addressed two mega rallies in Bokaro and Gumla. He said that there is only one echo among the people of the state that: ‘Roti, Beti, Maati ki pukar, Jharkhand mein BJP-NDA Sarkar,’ and people want BJP-led NDA to come to power in the assembly polls.”The BJP has entered the electoral field in Jharkhand with the promise of Suvidha, Suraksha, Sthirta, Samriddhi: PM Modi in Garhwa
November 04th, 12:21 pm
Prime Minister Narendra Modi today addressed a massive election rally in Garhwa, Jharkhand. Addressing the gathering, the PM said, This election in Jharkhand is taking place at a time when the entire country is moving forward with a resolution to become developed by 2047. The coming 25 years are very important for both the nation and Jharkhand. Today, there is a resounding call across Jharkhand... ‘Roti, Beti, Maati Ki Pukar, Jharkhand Mein…Bhajpa, NDA Sarkar’.”PM Modi campaigns in Jharkhand’s Garhwa and Chaibasa
November 04th, 11:30 am
Prime Minister Narendra Modi today addressed massive election rallies in Garhwa and Chaibasa, Jharkhand. Addressing the gathering, the PM said, This election in Jharkhand is taking place at a time when the entire country is moving forward with a resolution to become developed by 2047. The coming 25 years are very important for both the nation and Jharkhand. Today, there is a resounding call across Jharkhand... ‘Roti, Beti, Maati Ki Pukar, Jharkhand Mein…Bhajpa, NDA Sarkar’.”बिहारमधील बेगुसराय येथे विविध प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
March 02nd, 08:06 pm
बिहारचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकरजी, मुख्यमंत्री नितीश कुमारजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी गिरीराज सिंहजी, हरदीप सिंह पुरीजी, उपमुख्यमंत्री विजय सिन्हाजी, सम्राट चौधरीजी, व्यासपीठावर उपस्थित इतर सर्व मान्यवर आणि बेगूसराय मधून आलेल्या उत्साही माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील बेगुसराय येथे अनेक विकास प्रकल्पांचे केले लोकार्पण आणि पायाभरणी
March 02nd, 04:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील बेगुसराय येथे आज देशभरातील सुमारे 1.48 लाख कोटी रुपयांच्या तेल आणि वायू क्षेत्रातील प्रकल्पांची तसेच बिहारमधील 13,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले.पंतप्रधान 5 ऑक्टोबर रोजी राजस्थान आणि मध्य प्रदेशला देणार भेट
October 04th, 09:14 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर रोजी राजस्थान आणि मध्यप्रदेशला भेट देणार आहेत. सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास राजस्थान मध्ये जोधपूर येथे पंतप्रधान 5000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे रस्ते, रेल्वे, हवाई वाहतूक, आरोग्य आणि उच्च शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करणार आहेत. साडेतीन वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान मध्य प्रदेशात जबलपूर येथे पोहोचतील. या ठिकाणी ते 12,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे रेल्वे, रस्ते, गॅस पाईपलाईन, गृहनिर्माण आणि स्वच्छ पेयजल या क्षेत्राशी संबंधित विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण करतील.