गरिमेल्ला बालकृष्ण प्रसाद गारू यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

March 10th, 07:56 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गरिमेल्ला बालकृष्ण प्रसाद गारू यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. गरिमेल्ला बालकृष्ण प्रसाद गारू यांच्या अंतःकरणाच्या तारा छेडणाऱ्या गायनाने आणि संगीताने असंख्य लोकांच्या हृदयाला स्पर्श केला, त्यांच्या गायनाने आपली समृद्ध आध्यात्मिक आणि संगीत परंपरा जतन करण्यासोबतच त्याचा सोहळाही साजरा केला आहे.