ओदिशामध्ये गंजम जिल्ह्यातील बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
June 26th, 12:12 pm
ओदिशामधील गंजम जिल्ह्यातील बस अपघातात जीवितहानी झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पीएमएनआरएफ अर्थात पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून या अपघातात जीव गमावलेल्यांच्या जवळच्या नातेवाईकाला 2 लाख रुपयांचे तर अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला 50,000 रुपयांचे सहाय्य करण्याची घोषणा देखील पंतप्रधानांनी केली आहे.