Today's projects will boost energy access, connectivity and create jobs for the youth of Tamil Nadu: PM Modi in Tiruchirappalli
March 11th, 05:45 pm
PM Modi launched several developmental projects worth around ₹5,650 crore in Tiruchirappalli, aimed at bolstering the infrastructure and economy of Tamil Nadu. These initiatives span clean energy, petroleum-related manufacturing and enhanced multi-modal connectivity through highways, railways and rural roads. He dedicated the Indian Oil Corporation’s Lube Blending Plant in Chennai, strengthening the ‘Make in India’ initiative.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे सुमारे 5,650 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण, पायाभरणी आणि सुरुवात
March 11th, 05:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऐतिहासिक त्रिची शहराला भेट दिली. यावेळी त्यांनी तामिळनाडूच्या पायाभूत सुविधा आणि अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी परिवर्तनकारी विकास प्रकल्पांच्या मालिकेचा शुभारंभ केला. एकूण पाच हजार सहाशे कोटी रुपये गुंतवणुकीच्या या उपक्रमांमध्ये स्वच्छ ऊर्जा, पेट्रोलियमशी संबंधित उत्पादन आणि महामार्ग, रेल्वे आणि ग्रामीण भागातील रस्त्यांद्वारे विस्तारीत मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटी, याचा समावेश आहे.नवी दिल्ली येथे पोंगल सणानिमित्त पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 14th, 11:00 am
आज, पोंगल हा एक जागतिक सण झाला आहे. जगभरातील तमिळ समुदाय आणि तमिळ संस्कृतीवर प्रेम करणारे लोक तो उत्साहाने साजरा करतात आणि त्यापैकी मीदेखील एक आहे. हा विशेष सण तुम्हा सर्वांसोबत साजरा करणे, माझ्यासाठी भाग्याचे आहे. आपल्याकडे तमिळ जीवनात पोंगल हा एक आनंददायी अनुभव आहे. हा सण आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीप्रती, पृथ्वी आणि सूर्याप्रती कृतज्ञतेचे प्रतीक आहे.त्याचसोबत हा सण आपल्याला निसर्ग, कुटुंब आणि समाज यांच्यात संतुलन साधण्याचा मार्गदेखील दर्शवतो. देशाच्या विविध भागात लोहडी, मकर संक्रांती, माघ बिहू आणि इतर सणांचा देखील उत्साह आहे. मी भारतातील आणि जगभरातील माझ्या सर्व तमिळ बंधू आणि भगिनींना पोंगल आणि सर्व सणांच्या हार्दिक शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे पोंगल सोहळ्याला केले संबोधित
January 14th, 10:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित पोंगल सोहळ्याला संबोधित केले. तमिळ भाषेत शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले की, “आज पोंगल हा एक जागतिक सण बनला आहे”, जो जगभरातील तमिळ समुदायांद्वारे आणि तमिळ संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या लोकांद्वारे उत्साहाने साजरा केला जातो, आणि आपण देखील त्यापैकीच एक आहेत. हा विशेष सण सर्वांसोबत साजरा करणे हे आपले भाग्य आहे, असे त्यांनी सांगितले. तमिळ जीवनात पोंगल हा एक सुखद अनुभव आहे, जो शेतकऱ्यांच्या कष्टाबद्दल, पृथ्वीबद्दल आणि सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, तसेच निसर्ग, कुटुंब आणि समाजात संतुलन राखण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतो, असे पंतप्रधानांनी नमूद केले. या काळात देशाच्या विविध भागांमध्ये लोहरी, मकर संक्रांती, माघ बिहू आणि इतर सणांच्या उत्साहात लोक रमले आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी भारतातील आणि जगभरातील सर्व तमिळ बंधू-भगिनींना पोंगलच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच इतर सर्व सणांसाठी शुभेच्छा दिल्या.भारतीय परराष्ट्र सेवेतील 2024 तुकडीच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
August 19th, 08:34 pm
आयएफएस म्हणजेच भारतीय परराष्ट्र सेवेतील 2024 च्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या 7, लोक कल्याण मार्ग येथील निवासस्थानी भेट घेतली. 2024 च्या तुकडीमध्ये विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून 33 आयएफएस अधिकारी प्रशिक्षणार्थी आहेत.Our government is working with full strength to transform the lives of farmers: PM Modi in Varanasi
August 02nd, 11:30 am
In his address while launching multiple development works in Varanasi, PM Modi said that this was his first visit to the holy city following Operation Sindoor. He asserted that during Operation Sindoor, the world witnessed the Rudra form of India. The PM announced that ₹21,000 crore had been transferred to the bank accounts of 10 crore farmers across the country under the PM-Kisan Samman Nidhi scheme.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे सुमारे 2,200 कोटी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन
August 02nd, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे सुमारे 2,200 कोटी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रावण महिन्याच्या शुभ मुहूर्तावर वाराणसीतील कुटुंबांना भेटल्याबद्दल मनस्वी भावना व्यक्त केल्या. वाराणसीतील लोकांशी असलेल्या त्यांच्या घट्ट भावनिक संबंधावर भर देत, मोदींनी शहरातील आपल्या प्रत्येक कौटुंबिक सदस्याविषयी आदरपूर्वक सद्भावना व्यक्त केली. मोदींनी श्रावण महिन्याच्या शुभ मुहूर्तावर देशभरातील शेतकऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधल्याबद्दल समाधानही व्यक्त केले.तामिळनाडूतील गंगईकोंडा चोलपुरम मंदिरात आदि तिरुवथिराई महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
July 27th, 12:30 pm
परम आदरणीय अधिनस्थ मठाधीशगण, चिन्मया मिशनचे स्वामीगण, तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवि जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी डॉ. एल मुरुगन जी, स्थानिक खासदार थिरुमा-वलवन जी, मंचावर उपस्थित तामिळनाडूचे मंत्री, संसदेतील माझे सहकारी आदरणीय इलैयाराजा जी, सर्व ओदुवार, भक्त, विद्यार्थी, सांस्कृतिक इतिहासकार आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो ! नमः शिवायपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील गंगैकोंड चोळपुरम येथे आदि थिरुवादिरई महोत्सवाला केले संबोधित
July 27th, 12:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील गंगैकोंड चोळपुरम मंदिरात झालेल्या आदि थिरुवादिरई महोत्सवाला संबोधित केले. सर्वशक्तिमान भगवान शिव यांना त्यांनी वंदन केले. इलायराजा यांच्या संगीताच्या आणि ओदुवार यांच्या पवित्र मंत्रोच्चाराच्या साथीने, राजराजा चोल यांच्या पवित्र भूमीत दिव्य शिवदर्शनातून अनुभवायला मिळालेल्या गहन आध्यात्मिक ऊर्जेचे त्यांनी स्मरण केले. या आध्यात्मिक वातावरणामुळे आपले मन भारले गेल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.पंतप्रधान 26-27 जुलै रोजी तामिळनाडूला भेट देणार
July 25th, 10:09 am
यूके आणि मालदीव दौऱ्यावरून परतल्यानंतर लगेचच, पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 जुलै रोजी रात्री 8 च्या सुमारास तामिळनाडूतील तुतिकोरिन येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात 4800 कोटी रूपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण करतील.