पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (125 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
August 31st, 11:30 am
यंदाच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती, देशाची परीक्षा पाहत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून आपण पूर आणि दरडी कोसळल्यामुळे घडलेला हाहाःकार पाहिला आहे. अनेक घरांचे नुकसान झाले, शेतं पाण्याखाली गेली, कुटूंबच्या कुटुंबे उध्वस्त झाली, पाण्याच्या वेगवान प्रवाहात अनेक पूल वाहून गेले, रस्ते वाहून गेले , लोकांवर संकट कोसळलं. या घटनांमुळे प्रत्येक भारतीयाला दुःख झालं आहे. ज्या कुटुंबांनी प्रियजनांना गमावले, त्यांचं दुःख आपणा सर्वांचं दुःख आहे. जिथे कुठे आपत्ती आली, तिथल्या लोकांना वाचवण्यासाठी आपले एनडीआरएफ-एसडीआरएफ चे जवान , अन्य सुरक्षा दले प्रत्येकजण रात्रंदिवस बचावकार्यात सहभागी झाले होते. जवानांनी तंत्रज्ञानाची देखील मदत घेतली आहे. थर्मल कॅमेरे , लाईव्ह डिटेक्टर , स्निफर डॉग्स आणि ड्रोन द्वारे देखरेख अशा अनेक आधुनिक संसाधनांच्या सहाय्यानं मदतकार्याला गती देण्याचे पुरेपूर प्रयत्न केले गेले . या दरम्यानच्या काळात हेलिकॉप्टरद्वारे मदतसामग्री पोहचवण्यात आली, जखमींना हेलिकॉप्टरमधून उपचारांसाठी हलवण्यात आलं. या संकटसमयी सैन्यदलाची मोठी मदत झाली. स्थानिक लोक, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स, प्रशासन या सर्वांनी या संकटाच्या काळात शक्य ते सर्व प्रयत्न केले. या कठीण काळात मानवता धर्म सर्वोपरी मानून मदत करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे मी मनापासून आभार मानतो.गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सर्वांना शुभेच्छा
August 27th, 07:35 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. एक्स या सामाजिक माध्यमावरील संदेशात पंतप्रधान म्हणाले की,गुजरातमधील अहमदाबाद येथे विविध विकास योजनांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
August 25th, 06:42 pm
तुम्ही सर्वांनी आज छान वातावरण निर्मिती केली आहे. अनेक वेळा माझ्या मनात विचार येतो की मी किती नशीबवान आहे, ज्यामुळे मला लाखो लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद लाभत आहेत. मी तुम्हा सर्वांचे कितीही आभार मानले तरीही ते कमीच आहेत. पहा तिकडे कोणी छोटा नरेंद्र उभा आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबाद, गुजरात येथे 5,400 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण
August 25th, 06:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील अहमदाबाद येथे 5,400 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, संपूर्ण देश सध्या गणेशोत्सवाच्या उत्साहाने भरलेला आहे. गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आज गुजरातच्या प्रगतीशी जोडलेल्या अनेक विकास प्रकल्पांचा शुभारंभ होत आहे. त्यांनी सांगितले की, अनेक प्रकल्प जनतेच्या चरणी समर्पित करण्याचा मान त्यांना मिळाला आहे आणि या विकास उपक्रमांसाठी त्यांनी सर्व नागरिकांचे मनापासून अभिनंदन केले.गुजरातमधील दाहोद येथे विविध विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 26th, 11:45 am
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, गुजरात सरकारच्या मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, खासदार, आमदार आणि इतर सर्व मान्यवर आणि दाहोदचे माझे प्रिय बंधू आणि भगिनी, कसे आहात आपण? जरा मोठय़ा आवाजात उत्तर द्या, आता दाहोदचा प्रभाव वाढला आहे. आज 26 मे आहे. 2014 मध्ये आजच्याच दिवशी मी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. तिरंगा झेंडा हवा आहे, तुम्ही गुजरातच्या जनतेने मला भरभरून आशीर्वाद दिला आणि नंतर देशातील कोट्यवधी जनतेनेही मला आशीर्वाद देण्यात कोणतीही कसर सोडली नाही. तुमच्या आशीर्वादाच्या बळावर मी दिवसरात्र देशवासीयांच्या सेवेत आहे. या वर्षांमध्ये देशाने असे निर्णय घेतले, जे अकल्पनीय होते, ते अभूतपूर्व आहेत. या वर्षांमध्ये देशाने अनेक दशकांच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या, देश प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे. आज देश निराशेच्या अंधारातून बाहेर येऊन श्रद्धेच्या प्रकाशात तिरंगा झेंडा फडकवत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील दाहोद येथे 24,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण
May 26th, 11:40 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील दाहोद येथे 24,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केले. उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, 26 मे या दिवसाला विशेष महत्व आहे कारण 2014 मध्ये आजच्याच दिवशी त्यांनी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. देशाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवणाऱ्या गुजरातच्या जनतेच्या अढळ पाठिंब्याचा आणि आशीर्वादाचा त्यांनी उल्लेख केला. या विश्वासाने आणि प्रोत्साहनाने देशाची दिवसरात्र सेवा करण्याप्रति त्यांच्या समर्पणाला बळ दिले आहे असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. गेल्या काही वर्षांमध्ये भारताने असे काही निर्णय घेतले आहेत जे अभूतपूर्व आणि अकल्पनीय होते, दशकांच्या जुन्या बंधनांमधून मुक्त होत आज देश प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. आज, देश निराशेच्या आणि अंधाराच्या युगातून आत्मविश्वास आणि आशावादाच्या नवीन युगात उदयाला आला आहे, असे ते म्हणाले.मुंबईतल्या 'अभिजात मराठी भाषा' कार्यक्रमात पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
October 05th, 07:05 pm
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन जी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, अजित पवार जी, माझे केंद्रातील सर्व सहकारी, अनेक पिढ्यांवर आपल्या गायकीचा ठसा उमटवणाऱ्या आशाताई जी. अभिनेते बंधू सचिन जी, नामदेव कांबळे जी, सदानंद मोरे जी, महाराष्ट्र सरकारचे मंत्री बंधू दीपक जी, मंगलप्रभात लोढा जी, भाजपा मुंबई अध्यक्ष बंधू आशिष जी, इतर मान्यवर बंधू आणि भगिनी!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रात मुंबई येथे अभिजात मराठी भाषा कार्यक्रमात सहभाग
October 05th, 07:00 pm
मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, केंद्र सरकारने मराठी भाषेला अधिकृतपणे अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. हा क्षण महत्वाचा असून, हे मराठी भाषेच्या इतिहासातील सोन्याचे पान असल्याचे ते म्हणाले. मराठी भाषिकांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित आकांक्षा पूर्ण झाल्या असून, महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यात योगदान देण्याची आपल्याला संधी मिळाली, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन केले आणि या ऐतिहासिक कामगिरीचा भाग असल्याचा अभिमान व्यक्त केला. बंगाली, पाली, प्राकृत आणि आसामी या भाषांना देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आल्याचे सांगून, पंतप्रधानांनी या भाषांशी संबंधित जनतेचे अभिनंदन केले. मराठी भाषेचा इतिहास खूप समृद्ध आहे आणि या भाषेतून निर्माण झालेल्या ज्ञानाच्या प्रवाहांनी अनेक पिढ्यांना मार्गदर्शन केले आहे आणि आजही ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत, असे पंतप्रधानांनी विशेष नमूद केले. ते पुढे म्हणाले की, मराठी भाषेच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांनी लोकांना वेदांमधील ज्ञानाशी जोडले आणि ज्ञानेश्वरीने गीतेचा बोध लोकांपर्यंत पोहोचवून भारताचे आध्यात्मिक ज्ञान पुन्हा जागे केले.ओदिशामध्ये भुवनेश्वर येथे विविध विकास कामांच्या पायाभरणी/उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
September 17th, 12:26 pm
ओदिशाचे राज्यपाल रघुबर दास जी, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री मोहन मांझी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी जुआल ओराम जी, धर्मेंद्र प्रधान जी, अन्नपूर्णा देवी जी, ओदिशाचे उपमुख्यमंत्री के. व्ही. सिंहदेव जी, श्रीमती प्रभाती परिडा जी, खासदार, आमदार, देशाच्या कानाकोपऱ्यातून आज आमच्यासोबत उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि ओदिशामधील माझ्या बंधू-भगिनींनो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओदिशामध्ये भुवनेश्वर येथे ‘सुभद्रा’ या सर्वात मोठ्या महिला-केंद्रित योजनेचा केला शुभारंभ
September 17th, 12:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशामध्ये भुवनेश्वर येथे ‘सुभद्रा’ या ओदिशा सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ केला. केवळ महिलांसाठीची ही सर्वात मोठी योजना असून, 1 कोटीहून अधिक महिलांना त्याचा लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे. पंतप्रधानांनी 10 लाखांहून अधिक महिलांच्या बँक खात्यात निधी हस्तांतरित करण्याची सुरुवातही केली. पंतप्रधान मोदी यांनी रु. 2800 कोटीहून अधिक खर्चाच्या रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी केली आणि त्याचे लोकार्पण केले, तसेच रु.1000 कोटींहून अधिक खर्चाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी केली. पंतप्रधानांनी पीएमएवाय-जी, अर्थात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत, सुमारे 14 राज्यांमधील जवळजवळ 10 लाख लाभार्थ्यांना मदतीचा पहिला हप्ता जारी केला, देशभरातील पीएमएवाय, अर्थात प्रधानमंत्री आवास योजनेच्या (ग्रामीण आणि शहरी) 26 लाख लाभार्थ्यांच्या गृहप्रवेश सोहळ्यात ते सहभागी झाले, आणि पीएमएवाय (ग्रामीण आणि शहरी) योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या घराच्या चाव्या सुपूर्द केल्या. त्यानंतर त्यांनी पीएमएवाय –जी साठी अतिरिक्त घरांच्या सर्वेक्षणासाठी Awaas+ 2024 ॲप चे उद्घाटन केले आणि प्रधानमंत्री आवास योजना - शहरी (पीएमएवाय – यु ) 2.0 च्या कार्यान्वयनाबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीनिमित्त देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
September 07th, 09:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गणेश चतुर्थीच्या निमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.अंतराळ क्षेत्रातील सुधारणांचा देशातील तरुणांना फायदा: मन की बात दरम्यान पंतप्रधान मोदी
August 25th, 11:30 am
मित्रांनो, देशातील युवावर्गाला अंतराळ क्षेत्रातील सुधारणांमुळे देखील खूप फायदा झाला आहे, त्यामुळे मी असा विचार केला की आज 'मन की बात' मध्ये अंतराळ क्षेत्राशी संबंधित माझ्या काही तरुण मित्रांशी का बोलू नये! माझ्यासोबत बोलण्यासाठी स्पेस टेक स्टार्ट अप- गॅलेक्स आय चा चमू सहभागी होत आहे. हा स्टार्ट-अप- नवं उद्योग, आयआयटी-मद्रासच्या माजी विद्यार्थ्यांनी सुरू केला होता. ही सर्व तरुण मंडळी- सुयश, डेनिल, रक्षित, किशन आणि प्रणित, आज दूरध्वनीवरून आपल्यासोबत आहेत. चला, या तरुणांचे अनुभव जाणून घेऊया.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याला केलेले संबोधन
September 26th, 11:04 am
आजच्या रोजगार मेळाव्यात ज्या उमेदवारांना सरकारी सेवेची नियुक्तीपत्र मिळाली आहेत, त्या सर्वांचे खूप - खूप अभिनंदन.कठोर मेहनती नंतर आपणाला हे यश प्राप्त झाले आहे.लाखो उमेदवारांमधुन आपली निवड झाली आहे म्हणूनच या यशाचे आपल्या जीवनात मोठे महत्व आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळ्याला केले संबोधित
September 26th, 10:38 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीमार्फत रोजगार मेळ्यांतर्गत नवनियुक्त उमेदवारांना सुमारे 51,000 नियुक्ती पत्रांचे वितरण केले आणि उमेदवारांना संबोधितही केले. देशभरातून निवडले गेलेले कर्मचारी टपाल विभाग, भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग, अणुऊर्जा विभाग, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यासह विविध मंत्रालये/विभागांमध्ये सरकारी सेवेत रुजू होणार आहेत. देशभरात 46 ठिकाणी रोजगार मेळे आयोजित करण्यात आले आहेत.The egoistic Congress-led Alliance intends to destroy the composite culture of Santana Dharma in both Rajasthan & India: PM Modi
September 25th, 04:03 pm
PM Modi addressed the Parivartan Sankalp Mahasabha in Jaipur, Rajasthan. While addressing the event PM Modi recalled Pt. Deendayal Upadhyaya on his birth anniversary. He said, “It is his thoughts and principles that have served as an inspiration to put an end to the Congress-led misrule in Rajasthan.PM Modi addresses the Parivartan Sankalp Mahasabha in Jaipur, Rajasthan
September 25th, 04:02 pm
PM Modi addressed the Parivartan Sankalp Mahasabha in Jaipur, Rajasthan. While addressing the event PM Modi recalled Pt. Deendayal Upadhyaya on his birth anniversary. He said, “It is his thoughts and principles that have served as an inspiration to put an end to the Congress-led misrule in Rajasthan.नवीन संसद भवनात लोकसभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 19th, 01:50 pm
आज नवीन सभागृहातील पहिल्या अधिवेशनात मला प्रथम बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. या नवीन संसद भवनात मी सर्व खासदारांचे मनापासून स्वागत करतो. हा प्रसंग अनेक अर्थांनी अभूतपूर्व आहे. स्वातंत्र्याच्या ‘अमृत काळ ’ ची ही पहाट आहे आणि या नव्या वास्तूत भारत नव्या संकल्पांसह आपले भविष्य घडवण्यासाठी पुढील वाटचाल करत आहे. विज्ञान जगतात चंद्रयान-3 च्या अतुलनीय यशाचा प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली जी 20 चे उत्तम आयोजन ही एक संधी आहे जी जागतिक स्तरावर इच्छित प्रभाव पाडेल. या अनुषंगाने , आजचा दिवस नवीन संसद भवनात आधुनिक भारत आणि आपल्या प्राचीन लोकशाहीची शुभ सुरुवात आहे. गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी हा योग जुळून आला हा सुखद योगायोग आहे. श्रीगणेश ही शुभ आणि यशाची देवता आहे. गणेश ही बुद्धी आणि ज्ञानाची देवता देखील आहे. या पवित्र दिवशी, हे होत असलेले उद्घाटन म्हणजे संकल्पापासून सिद्धीकडे दृढ निश्चयाने आणि नव्या आत्मविश्वासाने प्रवासाची सुरुवात आहे.नव्या संसद भवनात पंतप्रधानांचे लोकसभेत संबोधन
September 19th, 01:18 pm
नव्या संसद भवनातील आजचे पहिले सत्र ऐतिहासिक असल्याचे सांगून पंतप्रधानांनी त्याबद्दल शुभेच्छा दिल्या. लोकसभा अध्यक्षांनी या पहिल्या सत्रात सभागृहाला संबोधित करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी अध्यक्षांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आणि सर्व सदस्यांचे स्वागत केले. अमृत काळाच्या सुरुवातीला भविष्यकाळातील वाटचालीसाठी नव्या संसद भवनात आपण प्रवेश केला असून हा महत्त्वपूर्ण प्रसंग असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. देशाने अलिकडे मिळवलेले यश अधोरेखित करताना पंतप्रधानांनी चांद्रयान 3 आणि जी20 चे आयोजन व त्याचा जगावर पडलेला प्रभाव याचा उल्लेख केला. गणेश चतुर्थीच्या मंगल दिवशी संसद भवनाच्या नव्या वास्तूत कामकाजाला सुरुवात झाल्याचे सांगून पंतप्रधानांनी गणपती हे संपन्नतेचे, मांगल्याचे, कार्यकारण आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. अशा मंगल समयी संकल्प सिद्धीस नेण्याचा आणि नव्या प्रवासाची सुरुवात नव्या उत्साहात आणि ऊर्जेसह करण्याचा हा काळ सुरू झाल्याचे ते म्हणाले. गणेश चतुर्थीच्या दिवशी लोकमान्य टिळक आणि नव्या आरंभाचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की स्वातंत्र्य लढ्यात लोकमान्य टिळकांनी गणेश चतुर्थीच्या माध्यमातून देशभरात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित केली, त्याच प्रेरणेतून आज आपण पुढे जात आहोत.पंतप्रधानांनी गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या
September 19th, 08:50 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधानांचे संसदेच्या विशेष अधिवेशनात केलेले भाषण
September 18th, 11:52 am
देशाच्या संसदेचा 75 वर्षांचा प्रवास, त्याचे पुन्हा एकदा स्मरण करण्यासाठी आणि नव्या सदनात जाण्यापूर्वी इतिहासातील त्या प्रेरणादायी क्षणांचे स्मरण करत अग्रेसर होण्याची ही वेळ आहे. आपण सर्वजण या ऐतिहासिक भवनातून निरोप घेत आहोत. स्वातंत्र्यापूर्वी हे सदन इंपिरियल लेजिस्लेटीव्ह कौन्सिलचे ठिकाण होते. स्वातंत्र्यानंतर या वास्तूला संसद भवन म्हणून नवीन ओळख मिळाली. हे खरे आहे की, या इमारतीच्या निर्मितीचा निर्णय विदेशी संसदेने घेतला होता, मात्र या भवनाच्या निर्मितीत माझ्याच देशवासियांनी घाम गाळला होता, परिश्रम केले होते आणि धन देखील माझ्याच देशाचे होते.