युनेस्कोच्या जागतिक स्मरण पुस्तिकेत गीता आणि नाट्यशास्त्राच्या समावेशाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

April 18th, 10:43 am

युनेस्कोच्या जागतिक स्मरण पुस्तिकेत गीता आणि नाट्यशास्त्राचा समावेश होणे म्हणजे आपल्या कालातीत विद्वत्तेला आणि समृद्ध संस्कृतीला मिळालेली जगन्मान्यता आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समावेशाची प्रशंसा केली आहे.

पर्यटनामध्ये अनेकांच्या जीवनात समृद्धी आणण्याची क्षमता : पंतप्रधान नरेंद्र मोदी

November 29th, 11:45 am

पर्यटनामध्ये अनेकांच्या जीवनात समृद्धी आणण्याची क्षमता असल्याची बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे. अतुल्य भारतामुळे घडून येणारे चमत्कार अधिकाधिक लोकांना अनुभवता यावेत, यासाठी भारतातील पर्यटन विषयक पायाभूत सेवा-सुविधा वाढवण्यावर आपल्या नेतृत्वातील सरकार लक्ष केंद्रित करेल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.