राष्ट्रकुल देशांतील लोकसभांचे सभापती तसेच अध्यक्ष यांच्या 28 व्या परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 15th, 11:00 am
लोकसभेचे सभापती ओम बिर्लाजी, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंशजी, आंतर-संसदीय संघाच्या अध्यक्ष तुलिया अॅकसन, राष्ट्रकुल संसदीय संघटनेचे अध्यक्ष ख्रिस्तोफर कलीला, राष्ट्रकुल सदस्य देशांचे सभापती आणि अध्यक्ष, इतर प्रतिनिधी आणि सभ्य स्त्रीपुरुषहो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये राष्ट्रकुल देशांच्या सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या 28 व्या परिषदेचे केले उद्घाटन
January 15th, 10:32 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील संसद भवन परिसरातील संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये राष्ट्रकुल देशांचे सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या 28 व्या परिषदेचे (सीएसपीओसी) उद्घाटन केले. संसदीय लोकशाहीमध्ये सभापतींची भूमिका अद्वितीय असते, असे पंतप्रधान मोदी याप्रसंगी बोलताना म्हणाले. सभापतींना जास्त बोलण्याची संधी मिळत नाही, परंतु त्यांची जबाबदारी इतरांचे ऐकणे आणि प्रत्येकाला आपले मत मांडण्याची संधी मिळेल याची खात्री करणे ही असते, हे त्यांनी अधोरेखित केले. गोंगाट करणाऱ्या किंवा अतिउत्साही सदस्यांनाही हसतमुखाने हाताळणे हा सभापतींचा समान गुणधर्म आहे, हे त्यांनी अधोरेखित केले.Hosting a national volleyball competition is an important step in placing Kashi on India’s sporting map: PM Modi
January 04th, 01:00 pm
PM Modi inaugurated the 72nd National Volleyball Tournament in Varanasi via video conferencing, welcoming players from 28 states and showcasing the spirit of Ek Bharat, Shreshtha Bharat. He highlighted Varanasi’s deep-rooted sporting tradition and expressed confidence that players would feel the city’s enthusiasm, support, and renowned hospitality during the championship.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वाराणसी येथे 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे केले उद्घाटन
January 04th, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन केले. या प्रसंगी मोदी यांनी वाराणसीचे खासदार म्हणून सर्व खेळाडूंचे स्वागत करताना आणि त्यांचे अभिनंदन करताना होणारा विशेष आनंद व्यक्त केला. राष्ट्रीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धा आजपासून वाराणसीमध्ये सुरू होत असल्याचे त्यांनी घोषित केले. सर्व खेळाडू प्रचंड मेहनतीनंतर या राष्ट्रीय स्पर्धेत पोहोचले आहेत आणि येत्या काही दिवसांत वाराणसीच्या मैदानावर त्यांच्या प्रयत्नांची कसोटी लागणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले . देशातील 28 राज्यांचे संघ येथे एकत्र आले असून यामधून 'एक भारत, श्रेष्ठ भारत'चे सुंदर चित्र सादर होत आहे, असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी स्पर्धेमधील सर्व सहभागींचे स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.पारंपरिक औषधोपचारावरील जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक परिषदेतील पंतप्रधानांचे संबोधन
December 19th, 08:11 pm
पारंपरिक औषधोपचार यावरील जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक परिषदेचा आज समापन दिन आहे. गेले तीन दिवस इथे पारंपरिक औषधोपचार क्षेत्राशी संबंधित सांगोपांग आणि महत्वपूर्ण चर्चा झाली. यासंदर्भात एका मजबूत मंचासाठी भारत काम करत आहे याचा मला आनंद आहे आणि यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेचीही सक्रीय भूमिका राहिली आहे. या यशस्वी आयोजनासाठी मी जागतिक आरोग्य संघटनेचे, भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचे आणि इथे उपस्थित सर्व सहभागींचे मनःपूर्वक आभार मानतो.पारंपरिक औषधोपचारांवरील जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक शिखर परिषदेच्या समारोप समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
December 19th, 07:07 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे पारंपरिक औषधोपचारांवरील जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक शिखर परिषदेच्या समारोप समारंभाला संबोधित केले. या परिषदेत गेल्या तीन दिवसांत पारंपारिक औषध क्षेत्रातील जगभरातील तज्ज्ञांनी गंभीर आणि अर्थपूर्ण चर्चा केली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या कार्यात भारत एक मजबूत व्यासपीठ म्हणून काम करत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि या प्रक्रियेत जागतिक आरोग्य संघटनेच्या सक्रिय भूमिकेची दखलपूर्ण नोंदही त्यांनी घेतली. शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी जागतिक आरोग्य संघटना, केंद्र सरकारचे आयुष मंत्रालय आणि उपस्थित सर्व सहभागींचे मनापासून आभारही मानले.जोहान्सबर्ग येथील जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांनी घेतली जपानच्या पंतप्रधानांची भेट
November 23rd, 09:46 pm
दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेल्या जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जपानचे पंतप्रधान साने ताकाची यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. 29 ऑक्टोबर 2025 रोजी पंतप्रधान ताकाची यांच्यासोबत झालेल्या दूरध्वनी संभाषणानंतर झालेली पंतप्रधानांची ही पहिलीच भेट होती.जी 20 शिखर परिषद 2025 च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधानांची घेतली भेट
November 23rd, 09:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेल्या जी 20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर इटालियन प्रजासत्ताकच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. याआधी जून मध्ये कॅनडा मध्ये काननास्किस येथे झालेल्या जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांनी संवाद साधला होता.जोहनिबर्ग येथे जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांनी घेतली कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट
November 23rd, 09:41 pm
दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथे सुरु असलेल्या जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि कॅनडामधील भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेतला.जी-20 परिषदेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन: सत्र 3
November 23rd, 04:05 pm
तंत्रज्ञान जसे पुढे जात आहे, तसे संधी आणि संसाधने काही मोजक्या हातांत केंद्रित होत आहेत. जगात महत्वपूर्ण तंत्रज्ञानावरुन संघर्ष वाढत आहे. हे मानवतेसाठी चिंतेचे कारण तर आहेच, पण नवोन्मेषाच्या मार्गातही अडथळा आहे. यावर उपाय शोधण्यासाठी आपली विचारसरणीत मूलभूत बदल करावे लागतील."सर्वांसाठी न्याय्य आणि योग्य भविष्य" या विषयावरील जी20 सत्रात पंतप्रधानांचे संबोधन
November 23rd, 04:02 pm
पंतप्रधानांनी आज सर्वांसाठी न्याय्य आणि योग्य भविष्य - महत्त्वपूर्ण खनिजे; सन्मानजनक रोजगार; कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरील जी20 शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्राला संबोधित केले. महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाचा ज्या प्रकारे प्रसार केला जातो, त्यामध्ये मूलभूत बदल करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. त्यांनी नमूद केले की, असे तंत्रज्ञान 'वित्त-केंद्रित' ऐवजी 'मानव-केंद्रित', 'राष्ट्रीय' ऐवजी 'जागतिक' आणि 'बंदिस्त प्रारुपां' ऐवजी 'मुक्त स्त्रोत' प्रणालीवर आधारित असले पाहिजे. हा दृष्टिकोन भारताच्या तंत्रज्ञान परिसंस्थेत समाविष्ट केला गेला आहे आणि त्याचे महत्त्वपूर्ण फायदे झाले आहेत, मग ते अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर असो, कृत्रिम बुद्धिमत्ता असो किंवा डिजिटल व्यवहार असो, जिथे भारत जागतिक नेता आहे, असे त्यांनी सांगितले.जोहान्सबर्गमध्ये जी 20 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांची दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांशी भेट
November 23rd, 02:18 pm
भारत आणि दक्षिण आफ्रिका संबंधांचा आधार असलेल्या ऐतिहासिक संबंधांना उजाळा देत, दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला आणि व्यापार व गुंतवणूक, अन्न सुरक्षा, कौशल्य विकास, खाणकाम, युवा आदानप्रदान आणि लोकांमधील परस्पर संबंध यांसारख्या सहकार्याच्या विविध क्षेत्रांमध्ये झालेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी एआय, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि महत्त्वपूर्ण खनिजे या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या संभाव्य मार्गांवर चर्चा केली. दक्षिण आफ्रिकेत भारतीय कंपन्यांच्या वाढत्या उपस्थितीचे नेत्यांनी स्वागत केले, विशेषतः पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, नवनिर्मिती, खाणकाम आणि स्टार्टअप क्षेत्रात परस्पर गुंतवणुकीला चालना देण्याचे मान्य केले. दक्षिण आफ्रिकेतून भारतात चित्ते आणण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी अध्यक्ष रामाफोसा यांचे आभार मानले आणि त्यांना भारताच्या नेतृत्वाखालील इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्समध्ये सामील होण्याचे आमंत्रण दिले.आयबीएसए नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधानांचे निवेदन
November 23rd, 12:45 pm
जोहानस-बर्ग” सारख्या जिवंत आणि सुंदर शहरात आयबीएसए नेत्यांच्या बैठकीत सहभागी होणे माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा विषय आहे. या बैठकीसाठी मी आयबीएसए चे अध्यक्ष राष्ट्रपति लुला यांचे मनापासून आभार मानतो. आणि राष्ट्रपति रामाफोसा यांना आदरातिथ्याबद्दल धन्यवाद देतो.जोहान्सबर्ग येथे आयबीएसए नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग
November 23rd, 12:30 pm
ही बैठक अत्यंत योग्य वेळी होत असल्याचे सांगून पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले की ही बैठक आफ्रिकेच्या भूमीवर झालेल्या पहिल्या जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने झाली असून ग्लोबल साउथ देशांच्या सलग चार जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळाचा समारोप करते. या चारपैकी शेवटची तीन अध्यक्षपदे भारत - ब्राझील - दक्षिण आफ्रिका संवाद मंच (आयबीएसए) सदस्य राष्ट्रांकडे होती. या दरम्यान मानव-केंद्रित विकास, बहुपक्षीय सुधारणा आणि शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित करणारे अनेक महत्त्वाचे उपक्रम राबवण्यात आले आहेत, असे त्यांनी नमूद केले.जी-20 शिखर परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन: सत्र 2
November 22nd, 09:57 pm
नैसर्गिक आपत्ती या मानवतेसाठी खूप मोठे आव्हान बनल्या आहेत. या वर्षीही नैसर्गिक आपत्तींमुळे जगातील लोकसंख्येच्या एका मोठ्या भागावर परिणाम झाला आहे. नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी जागतिक सहकार्य अधिक बळकट करण्याची गरज यावरून स्पष्ट होते.जी 20 शिखर परिषदेतील पंतप्रधानांचे निवेदन – सत्र 1
November 22nd, 09:36 pm
सर्वप्रथम जी 20 शिखर परिषदेच्या दिमाखदार आयोजनासाठी आणि यशस्वी अध्यक्षतेसाठी राष्ट्रपती रामाफोसा यांचे अभिनंदन!जोहान्सबर्ग येथे आयोजित जी20 शिखर परिषदेत पंतप्रधान झाले सहभागी
November 22nd, 09:35 pm
दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरील रामाफोसा यांच्या अध्यक्षतेखाली जोहान्सबर्ग येथे आयोजित जी20 नेत्यांच्या शिखर परिषदेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. जी20 शिखर परिषदांमधील पंतप्रधानांचा हा बारावा सहभाग होता. पंतप्रधानांनी शिखर संमेलनाच्या उद्घाटनाच्या दिवशी झालेल्या दोन्ही सत्रांना संबोधित केले. त्यांनी राष्ट्राध्यक्ष रामाफोसा यांचे अतिथ्य आणि शिखर संमेलनाचे यशस्वी आयोजन, यासाठी आभार मानले.Joint statement by the Government of India, the Government of Australia and the Government of Canada
November 22nd, 09:21 pm
India, Australia, and Canada have agreed to enter into a new trilateral partnership: the Australia-Canada-India Technology and Innovation (ACITI) Partnership. The three sides agreed to strengthen their ambition in cooperation on critical and emerging technologies. The Partnership will also examine the development and mass adoption of artificial intelligence to improve citizens' lives.जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची भेट
November 21st, 10:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांची आज दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट घेतली. 2020 मध्ये व्यापक धोरणात्मक भागीदारीपर्यंत संबंध वाढल्यानंतर गेल्या पाच वर्षांत भारत आणि ऑस्ट्रेलियामधील सहकार्य वाढत असल्याबद्दल तसेच सहकार्यात येणाऱ्या विविधतेबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. भारतातील अलिकडच्या दहशतवादी हल्ल्याबद्दल बोलताना ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांनी भारतासोबत एकजुटता व्यक्त केली. दहशतवादाविरुद्धच्या जागतिक लढाईला बळकटी देण्यासाठी दोन्ही नेत्यांनी वचनबद्धता व्यक्त केली.PM Modi arrives in Johannesburg, South Africa to participate in G20 Summit
November 21st, 06:25 pm
PM Modi arrived in Johannesburg, South Africa, a short while ago. The PM will attend the 20th G20 Leaders’ Summit. On the margins of the Summit, he will also hold bilateral meetings with world leaders and will also participate in the India-Brazil-South Africa (IBSA) Leaders’ Meeting.