गुजरातमधील नवसारी येथे विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर

March 08th, 11:50 am

काही दिवसांपूर्वी महाकुंभमेळ्यात गंगा मातेचा आशीर्वाद मिळाला. आणि आज, मला मातृशक्तीच्या या महान कुंभमेळ्यात आशीर्वाद मिळाला आहे. महाकुंभमेळ्यात गंगा मातेचा आशीर्वाद मिळाला आणि आजच्या या मातृशक्तीच्या महाकुंभात सर्व माता - भगिनींचा आशीर्वाद मिळाला. आजचा हा महिला दिन, गुजरातची माझी मातृभूमी आणि इतक्या मोठ्या संख्येने आपणा सर्व माता, भगिनी आणि मुलींची उपस्थिती, या खास दिवशी तुमचे प्रेम, आपुलकी आणि आशीर्वादाबद्दल मी मस्तक झुकवून मातृशक्तीला वंदन करतो. गुजरातच्या या भूमीवरून मी सर्व देशवासीयांना, देशातील सर्व माता आणि भगिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. आज येथे गुजरात सफल आणि गुजरात मैत्री या दोन योजनांचा शुभारंभ देखील झाला. अनेक योजनांचे पैसे देखील महिलांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केले गेले आहेत. याबद्दलही मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरात मधील नवसारी येथे विकासकामांचा प्रारंभ

March 08th, 11:45 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील नवसारी येथे विविध विकास कामांचा प्रारंभ केला. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी तेथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माता, भगिनी आणि मुलींच्या प्रेम, आपुलकी आणि आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, आणि या विशेष दिनानिमित्त देशातील सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. महाकुंभ मेळ्यात आपण माँ गंगेचा आशीर्वाद प्राप्त केला तर आज मातृशक्तीच्या महाकुंभात माता भगिनींचे आशीर्वाद मिळवल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी आज गुजरातमध्ये जी-सफल (G-SAFAL) (गुजरात स्कीम फॉर अंत्योदय फॅमिलीज फॉर ऑगमेंटिंग लाईव्हलीहूड्स) आणि जी-मैत्री (G-MAITRI) (गुजरात मेंटॉरशिप अँड एक्सेलरेशन ऑफ इंडिव्हिजुअल्स फॉर इंडिव्हिजुअल्स फॉर ट्रान्सफॉर्मिंग रुरल इन्कम) या दोन योजनांचा प्रारंभ झाल्याचे जाहीर केले. विविध योजनांचा निधी थेट महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले आणि या यशाबद्दल सर्व संबंधितांचे अभिनंदन केले.

पंतप्रधान 7 आणि 8 मार्च रोजी दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांना तसेच गुजरात राज्याला भेट देणार

March 07th, 07:10 am

पंतप्रधान 7 आणि 8 मार्च रोजी म्हणजेच आज आणि उद्या दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांना तसेच गुजरात राज्याला भेट देत आहेत. दिनांक 7 मार्च रोजी ते सिल्वासा येथे पोहोचतील आणि दुपारी 2 च्या सुमारास तेथे उभारण्यात येत असलेल्या नमो रुग्णालय प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करतील. दुपारी पावणेतीन वाजता सिल्वासा येथेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये 2,580 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन तसेच पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते केली जाईल. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरतला प्रयाण करतील आणि संध्याकाळी 5 वाजता ते सुरत अन्न सुरक्षा संपृक्तता अभियानाची सुरुवात करतील. उद्या दिनांक 8 मार्च रोजी पंतप्रधान नवसारी येथे पोहोचतील आणि तेथील लखपती दिदींशी संवाद साधतील. यानंतर होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते विविध योजनांचे उद्घाटन होईल.