जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ यांची भेट

June 17th, 11:58 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॅनडातील कनानास्किस येथे जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ यांची भेट घेतली. मे 2025 मध्ये चॅन्सलर मर्झ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दोन्ही नेत्यांमधे झालेली ही पहिलीच भेट होती.निवडणुकीत विजय मिळविल्याबद्दल आणि पदभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधानांनी चॅन्सलर मर्झ यांचे अभिनंदन केले.अहमदाबादमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या दुर्दैवी विमान अपघाताबद्दल जर्मन सरकारने व्यक्त केलेल्या शोकसंवेदनांबद्दल पंतप्रधानांनी मनापासून आभार व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चॅन्सेलर फ्रेडरिक मर्झ यांचे पदभार स्वीकारल्याबद्दल केले अभिनंदन

May 20th, 06:25 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रेडरिक मर्झ यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि जर्मनीच्या संघराज्याच्या चॅन्सेलरपदाची सूत्रे स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

जर्मन चॅन्सलर म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल फ्रेडरिक मर्झ यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

May 06th, 09:53 pm

जर्मनीचे चॅन्सलर म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल फ्रेडरिक मर्झ यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.