भारत छोडो आंदोलनात सहभागी शूर स्वातंत्र्यसैनिकांना पंतप्रधानांकडून आदरांजली
August 09th, 10:32 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक 'भारत छोडो' आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांचे स्मरण करत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या धैर्य आणि दृढ निश्चयाला आदरांजली वाहिली आहे. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या 'भारत छोडो' आंदोलनाच्या हाकेने स्वातंत्र्यलढ्यात नवचैतन्य फुंकले आणि ब्रिटिश राजवटीतून मुक्त होण्याच्या भारतातील जनतेच्या अढळ संकल्पाचे दर्शन घडवले, असे पंतप्रधान म्हणाले.Keep your curiosity alive in life: PM Modi at IIT Delhi Convocation Ceremony
August 08th, 11:15 am
PM Modi addressed the 57th Convocation Ceremony of IIT Delhi, congratulating the graduating students and urging them to embrace a rapidly changing world with curiosity, courage and a spirit of innovation. He called upon the youth to seize new opportunities, pursue research and contribute to India's journey towards Viksit Bharat.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयआयटी दिल्लीच्या 57 व्या पदवीदान समारंभाला केले संबोधीत
August 08th, 11:00 am
तप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) दिल्ली संकुलाच्या 57 व्या पदवीदान समारंभाला संबोधित केले. या समारंभाचे भावनिक महत्त्व त्यांनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केले. या संकुलातील प्रफुल्ल आणि स्वप्नांनी भारलेल्या वातावरणाचे स्मरणही त्यांनी करून देले. जगभरात आलेल्या कोविड साथरोगाच्या काळात आपण दूरस्थ पद्धतीने अशाच समारंभाला उपस्थित राहिल्याच्या आठवणींना त्यांनी यानिमित्ताने उजाळा दिला. आता पदवीधर होत असलेल्या विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष उपस्थित राहता आल्याबद्दल आपल्याला खूपच समाधान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आज या संकुलात या विद्यार्थ्यांसोबत आपला अनुभव सामायिक करायला मिळणे हा आपल्यासाठी खूप विशेष क्षण असल्याचेही त्यांनी सांगितले.स्वातंत्र्यसैनिक पिंगली वेंकय्या यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांची आदरांजली
August 02nd, 08:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यसैनिक पिंगली वेंकय्या यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.पंतप्रधानांनी चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिली आदरांजली
July 23rd, 08:22 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. चंद्रशेखर आझाद यांचे अदम्य साहस आणि अढळ देशभक्ती भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचा गौरव आहे असे मोदी यांनी नमूद केले.लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली
July 23rd, 08:12 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकमान्य टिळक यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महान व्यक्तिमत्व असलेल्या लोकमान्य टिळकांनी राष्ट्रवादाची भावना जागृत केली आणि अनेक पिढ्यांना लोकसेवेसाठी स्वतःला समर्पित करण्याची प्रेरणा दिली,असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.महान क्रांतिकारक मंगल पांडे यांना पंतप्रधानांकडून अभिवादन
July 19th, 10:55 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महान क्रांतिकारक मंगल पांडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. मोदी म्हणाले की, त्यांचे धैर्यपूर्ण जीवन आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमान जागवते. त्यांच्या शौर्यगाथेतून देशाच्या प्रत्येक पिढीला प्रेरणा मिळत राहील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली
June 26th, 12:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. त्यांच्या लेखणीने भारतीयांच्या अनेक पिढ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची जाज्वल्य भावना व सांस्कृतिक अभिमानाची अनुभूती जागृत केली, असे सांगत त्यांनी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे एक महान साहित्यिक म्हणून स्मरण केले.पंतप्रधानांनी वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त केले त्यांचे स्मरण
May 28th, 09:52 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वीर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले आणि त्यांचे धैर्य, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक सुधारणेसाठी त्यांना आदरांजली वाहिली.पंतप्रधानांनी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली
May 09th, 09:06 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान योद्धा महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त आज त्यांना आदरांजली अर्पण केली.श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली
March 30th, 09:50 am
भारतमातेचे धाडसी सुपुत्र श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना श्रद्धांजली वाहिली. मोदी म्हणाले की त्यांच्या क्रांतिकारी संकल्पनांसह त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये एक नवी जागृती घडवून आणली. “त्यांचे जीवन आणि आदर्श देशातील प्रत्येक पिढीला देशसेवेसाठी प्रेरित करत राहतील,” मोदी पुढे म्हणालेPrime Minister pays tribute to Bhagat Singh, Rajguru, and Sukhdev on Shaheed Diwas
March 23rd, 08:29 am
On the occasion of Shaheed Diwas, PM Modi paid rich tributes to the great freedom fighters Bhagat Singh, Rajguru and Sukhdev. Lauding their bravery, he observed that the martyrdom of these iconic heroes for the nation remains deeply etched in India's collective memory. He highlighted that they chose the path of sacrifice with conviction, placing the nation above their own lives..पुद्दुचेरीमधील विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटनादरम्यान पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
March 01st, 12:00 pm
पुदुचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगासामी, माझे केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकारी मनसुख मांडवीय, पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल के. कैलाशनाथन, सभापती आर. सेल्वम, गृहमंत्री ए. नमस्सिवायम, इतर नेते, पुद्दुचेरीच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, वणक्कम्!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुद्दुचेरीमध्ये 2700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी केली
March 01st, 11:45 am
यावेळी आयोजित सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, पुद्दुचेरी ही सिद्ध, संत, कवी आणि स्वातंत्र्यसैनिकांची भूमी आहे, जिथे महाकवी सुब्रमण्य भारती यांनी राष्ट्रवादाची ज्योत पेटवली आणि श्री अरविंद व माताजींनी जगाला आध्यात्मिक दृष्टी प्रदान केली.पंतप्रधानांनी वीर सावरकरजींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त वाहिली आदरांजली
February 26th, 11:25 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महान क्रांतिकारक वीर सावरकरजींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन केले.वीर सावरकरांच्या जीवनातील शिकवण अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक
February 26th, 10:47 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीर सावरकरजींच्या जीवनातील शिकवणीवर प्रकाश टाकणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.राष्ट्रपतींच्या उपस्थितीत आयोजित ‘राजाजी उत्सवा’चे पंतप्रधानांकडून कौतुक ज्यात श्री चक्रवर्ती राजगोपालाचारी जी यांना सन्मानित करण्यात आले ; देशाच्या भाग्याला आकार देणाऱ्यांना गौरवण्याचा आणि वसाहतवादी मानसिकतेचे अवशेष दूर करण्याचा भारताचा संकल्प यातून प्रतिबिंबित होतो
February 23rd, 05:12 pm
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अशोक मंडपाजवळील ग्रँड ओपन स्टेअरकेस येथे चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले.पंतप्रधान गांधी स्मृती येथे प्रार्थना सभेमध्ये झाले सहभागी
January 30th, 07:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी, आज गांधी स्मृती येथे आयोजित प्रार्थना सभेत सहभागी झाले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, बापूंच्या प्रयत्नांनी आपल्या स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा दिली आणि भारताच्या वाटचालीवर एक अमिट ठसा उमटवला, त्याचा प्रभाव पिढ्यानपिढ्या प्रत्ययास येतो.अंदमान आणि निकोबार व्दीपसमूहावर पराक्रम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्य प्रणालीव्दारे केलेले भाषण
January 23rd, 05:15 pm
नमस्कार ! अंदमान-निकोबारचे नायब राज्यपाल अॅमिरल डी. के. जोशी, नेताजी सुभाषचंद्र बोस आयएनए न्यासाचे अध्यक्ष ब्रिगेडियर आर.एस. छिकारा, भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामधील सहभागी आणि आयएनएचे शाश्वत पुरूष लेफ्टनंट आर माधवन् !!अंदमान आणि निकोबार बेटांवरील पराक्रम दिन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले संबोधित
January 23rd, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अंदमान आणि निकोबार बेटांवरील पराक्रम दिन कार्यक्रमाला संबोधित केले. 23 जानेवारी हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचा दिन म्हणजे गौरवशाली तारीख असल्याचे त्यांनी नमूद केले. नेताजींचे शौर्य आणि धाडस आपल्याला प्रेरणा देते आणि आपले मन त्यांच्याबद्दलच्या आदराने भारून जाते असे ते म्हणाले. गेल्या काही वर्षांत पराक्रम दिन हा देशभावनेचा अविभाज्य सोहळा बनला आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.