संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानाच्या शिल्पकारांना वाहिली आदरांजली
November 26th, 10:15 am
संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानाच्या शिल्पकारांना आदरांजली वाहिली आहे. विकसित भारताच्या निर्मितीमध्ये देशाच्या सामूहिक प्रयत्नांना प्रेरणा देणारी त्यांची दूरदृष्टी आणि काळाच्या पुढे पाहण्याचा दृष्टिकोन पंतप्रधानांनी अधोरेखित केला.पंतप्रधान 16 ऑक्टोबरला आंध्र प्रदेशला भेट देणार
October 14th, 05:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेशला भेट देणार आहेत. सकाळी 11:15 च्या सुमारास, ते नंद्याल जिल्ह्यातील श्रीशैलम स्थित श्री भ्रमरांबा मल्लिकार्जुन स्वामी वरला देवस्थानम येथे पूजा करून दर्शन घेतील. त्यानंतर, दुपारी 12:15 वाजता ते श्रीशैलम येथील श्री शिवाजी स्फूर्ती केंद्राला भेट देतील.मिझोराममध्ये विकासकार्यांची पायाभरणी आणि उदघाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 13th, 10:30 am
मिझोरामचे राज्यपाल व्ही. के. सिंह जी, मुख्यमंत्री श्री लालदुहोमा जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री अश्विनी वैष्णव जी, मिझोराम सरकारमधले मंत्रिगण, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधी, मिझोरामच्या शानदार जनतेला शुभेच्छा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोरममधील आयझॉल येथे 9,000 कोटी रुपयांहून जास्त खर्चांच्या विकासकामांचे केले भूमिपूजन आणि उद्घाटन
September 13th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मिझोरममधील आयझॉल येथे 9,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चांच्या विकासकामांचे भूमिपूजन केले. हे प्रकल्प रेल्वे, रस्ते, ऊर्जा, क्रीडा यासह अनेक क्षेत्रांना गती देतील. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी निळ्या पर्वतांच्या सुंदर भूमीचे रक्षण करणाऱ्या सर्वोच्च देव पाथियनला नमन केले. मिझोरमच्या लेंगपुई विमानतळावर उपस्थित असूनही खराब हवामानामुळे ते आयझॉल येथे पोहचू शकले नाहीत, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. तरीही या माध्यमातून लोकांचे प्रेम आणि आपुलकी अनुभवू शकत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.पंतप्रधान 22 ऑगस्ट रोजी बिहार आणि पश्चिम बंगालला भेट देणार
August 20th, 03:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 ऑगस्ट रोजी बिहार आणि पश्चिम बंगालला भेट देणार आहेत. ते सकाळी 11 च्या सुमारास बिहारमधील गया येथे सुमारे 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. तसेच ते दोन गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील आणि उपस्थितांना संबोधित करतील. त्यानंतर, ते गंगा नदीवरील औंटा-सिमरिया पूल प्रकल्पाला भेट देऊन त्याचे उद्घाटन करतील.पंतप्रधान 2 ऑगस्ट रोजी वाराणसीला भेट देणार
July 31st, 06:59 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 च्या सुमारास उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे सुमारे 2200 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.Prime Minister Narendra Modi to visit Jammu and Kashmir
June 04th, 12:37 pm
PM Modi will visit Jammu and Kashmir on 6th June to inaugurate the Chenab bridge and Anji bridge. He will also launch multiple development projects worth over Rs 46,000 crore at Katra and flag off two Vande Bharat Express trains. He will lay the foundation stone of Shri Mata Vaishno Devi Institute of Medical Excellence in Katra contributing to the healthcare infrastructure in the region.आंध्र प्रदेशातील अमरावती येथे विविध विकास कामांची पायाभरणी आणि प्रकल्पांचे लोकार्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
May 02nd, 03:45 pm
आंध्र प्रदेशचे राज्यपाल सैयद अब्दुल नजीर जी, मुख्यमंत्री आणि माझे मित्र चंद्राबाबू नायडू जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहयोगी मंत्री, उत्साही उप-मुख्यमंत्री पवन कल्याण जी, राज्य सरकारचे मंत्री, सर्व खासदार आणि आमदार आणि आंध्र प्रदेशातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशात अमरावती येथे, 58,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकासकामांची केली पायाभरणी आणि उद्घाटन
May 02nd, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशात अमरावती येथे 58,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण केले. अमरावतीच्या या पवित्र भूमीवर उभे राहून, आपल्याला केवळ एक शहर दिसत नाही, तर एक स्वप्न साकार होताना दिसत आहे—एक नवीन अमरावती, एक नवीन आंध्र, अशी भावना पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. अमरावती ही एक अशी भूमी आहे जिथे परंपरा आणि प्रगती या परस्परांसोबत वाटचाल करतात, बौद्ध वारशाची शांतता आणि एका विकसित भारताची ऊर्जा या दोहोंचा अंगिकार केला जातो, असे पंतप्रधानांनी नमूद केले. आज ज्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आले आहे, ते प्रकल्प केवळ काँक्रीटच्या संरचना नाहीत, तर आंध्र प्रदेशच्या आकांक्षा आणि भारताच्या विकासाच्या दृष्टीकोनाचा मजबूत पाया आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. भगवान वीरभद्र, भगवान अमरलिंगेश्वर आणि तिरुपती बालाजी यांना वंदन करून पंतप्रधान मोदी यांनी आंध्र प्रदेशच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. त्यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनाही शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान 11 एप्रिल रोजी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशला भेट देणार आहेत
April 09th, 09:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 एप्रिल रोजी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचा दौरा करतील. ते वाराणसीला जातील आणि सकाळी 11 वाजता 3,880 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. ते एका जाहीर सभेला देखील संबोधित करतील.The vision of Investment in People stands on three pillars – Education, Skill and Healthcare: PM Modi
March 05th, 01:35 pm
PM Modi participated in the Post-Budget Webinar on Employment and addressed the gathering on the theme Investing in People, Economy, and Innovation. PM remarked that India's education system is undergoing a significant transformation after several decades. He announced that over one crore manuscripts will be digitized under Gyan Bharatam Mission. He noted that India, now a $3.8 trillion economy will soon become a $5 trillion economy. PM highlighted the ‘Jan-Bhagidari’ model for better implementation of the schemes.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार निर्मितीला चालना - लोकांमध्ये गुंतवणूक, अर्थव्यवस्था आणि नवोन्मेष यावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला केले संबोधित
March 05th, 01:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रोजगारविषयक अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित केले. या वेबिनारमधील उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी “लोकांमध्ये गुंतवणूक, अर्थव्यवस्था आणि नवोन्मेष” या संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित केले ज्यामध्ये विकसित भारताच्या आराखड्याची व्याख्या करण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात या संकल्पनेचे प्रतिबिंब अतिशय व्यापक स्तरावर दिसत आहे आणि भारताच्या भवितव्याची ब्लूप्रिंट म्हणून ती काम करणार आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. पायाभूत सुविधा, उद्योग, अर्थव्यवस्था आणि नवोन्मेष यांना गुंतवणुकीसाठी समान प्राधान्य देण्यात आले असल्यावर त्यांनी भर दिला. क्षमता उभारणी आणि गुणवत्तेची जोपासना या देशाच्या प्रगतीचा पाया असल्याचे अधोरेखित करत मोदी यांनी सर्व हितधारकांना एक पाऊल पुढे येण्याचे आणि विकासाच्या पुढच्या टप्प्याची गरज म्हणून या क्षेत्रांमध्ये अधिकाधिक गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. देशाच्या आर्थिक यशस्वितेसाठी ही बाब अत्यावश्यक आहे आणि प्रत्येक संघटनेच्या यशाचा हा आधार आहे, यावर त्यांनी भर दिलापंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 3 मार्च रोजी गीर इथे राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची 7 वी बैठक संपन्न
March 03rd, 04:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी गुजरातमधील गीर राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची 7वी बैठकही झाली.बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेच्या पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
February 23rd, 06:11 pm
भैया हरौ बोलो मतंगेश्वर भगवान की जै, बागेश्वर धाम की जै, जय जटाशंकर धाम की जै, अपुन ओंरण खाँ मोरी तरफ सें दोई हाँथ, जोर के राम-राम जू।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेची केली पायाभरणी
February 23rd, 04:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेची पायाभरणी झाली. अगदी काही दिवसातच बुंदेलखंडमध्ये दुसऱ्यांदा उपस्थित राहण्याचे भाग्य लाभल्याचे सांगत पंतप्रधान म्हणाले की, आध्यात्मिक केंद्र असलेले बागेश्वर धाम आता आरोग्य केंद्र देखील होणार आहे. त्यांनी सांगितले की, 10 एकर क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेमध्ये पहिल्या टप्प्यात 100 खाटांचे रुग्णालय उभारले जाईल.Serving the people of Andhra Pradesh is our commitment: PM Modi in Visakhapatnam
January 08th, 05:45 pm
PM Modi laid foundation stone, inaugurated development works worth over Rs. 2 lakh crore in Visakhapatnam, Andhra Pradesh. The Prime Minister emphasized that the development of Andhra Pradesh was the NDA Government's vision and serving the people of Andhra Pradesh was the Government's commitment.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे 2 लाख कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटन
January 08th, 05:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये 2 लाख कोटी रुपयांच्या विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. भगवान सिंहचलम वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी यांना अभिवादन करून मोदी म्हणाले की, जनतेच्या आशीर्वादाने 60 वर्षांनंतर देशात सलग तिसऱ्यांदा आपले सरकार निवडून आले आहे.ते पुढे म्हणाले की, सरकार स्थापनेनंतर आंध्र प्रदेशात हा त्यांचा पहिला सरकारी कार्यक्रम होता. कार्यक्रमापूर्वी रोड शो दरम्यान भव्य स्वागत केल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले. आपल्या भाषणात ते म्हणाले की चंद्राबाबू नायडू यांच्या प्रत्येक शब्दाचा आणि भावनेचा मी आदर करतो . नायडू यांनी आपल्या भाषणात नमूद केलेली सर्व उद्दिष्टे आंध्र प्रदेश आणि भारतातील जनतेच्या पाठिंब्याने साध्य करू असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जानेवारी रोजी विविध रेल्वे प्रकल्पांचे करणार उद्घाटन आणि पायाभरणी
January 05th, 06:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजता दूरदृश्य प्रणालीमार्फत विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 आणि 21 जूनला जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर
June 19th, 04:26 pm
20 जूनला संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधान श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात (एसकेआयसीसी) येथे ‘युवा सक्षमीकरण, जम्मू-काश्मीरमध्ये परिवर्तन’ कार्यक्रमात सहभागी होतील. त्यांच्या हस्ते जम्मू-काश्मीरमधील अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी होणार आहे. ते कृषी आणि संलग्न क्षेत्रातील स्पर्धात्मकता सुधारणा प्रकल्पाचे (जेकेसीआयपी) उद्घाटन करतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मार्च रोजी दिल्लीमध्ये पीएम-स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांना करणार संबोधित
March 13th, 07:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मार्च रोजी दिल्लीमधील जेएलएन स्टेडियम येथे संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान स्वनिधी (PM SVANidhi) योजनेच्या लाभार्थ्यांना संबोधित करतील. यावेळी ते दिल्लीमधील रस्त्यावरील 5,000 विक्रेत्यांसह (एसव्ही) 1 लाख एसव्हींना योजनेंतर्गत कर्जाचे वितरण देखील करतील.