India and Indonesia are connected not only by our history but also by a shared future: PM Modi at community programme in Jakarta
July 07th, 11:47 pm
Addressing the Indian community in Jakarta, PM Modi thanked the diaspora for their warm welcome and praised their contribution to Indonesia's progress and their role as a living bridge between the two nations. He spoke about India's rapid transformation and called upon the community to contribute towards the shared aspirations of Viksit Bharat 2047 and Indonesia Emas 2045.पंतप्रधानांनी जकार्ता येथे भारतीय समुदायाला केले संबोधित
July 07th, 05:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जकार्ता येथे भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या स्वागत समारंभात सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होताच, भारतीय समुदायाच्या मोठ्या समूहाने आणि भारतीयांच्या इंडोनेशियन मित्रांनी त्यांचे अत्यंत उत्साहात आणि जिव्हाळ्याने स्वागत केले. विशेष आदर व्यक्त करण्याचे प्रतीक म्हणून, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे देखील या कार्यक्रमात पंतप्रधानांसोबत सहभागी झाले.'मन की बात'च्या 135 व्या भागात पंतप्रधानांच्या संबोधनाचे मराठी भाषांतर (28.06.2026)
June 28th, 11:30 am
'मन की बात' मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसोबत सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे. 2026 चं अर्धं वर्ष आता संपत आलं आहे. या सहा महिन्यांत आपण 'मन की बात' मध्ये आपल्या देशबांधवांच्या अनेक कामगिरींवर चर्चा केली आहे. जून महिन्यातही देशानं असे काही मैलाचे दगड गाठले आहेत, ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल. हे यश राष्ट्राची सुरक्षा आणि आत्मनिर्भरता यांच्याशी जोडलेलं आहे. अलीकडेच मला कोलकाता इथे एका नौदल कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. तिथे आयएनएस दूनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रय ही जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आली. या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी आहे.India-France partnership is emerging as a strong pillar of trust, stability and cooperation: PM Modi in Paris
June 18th, 11:41 pm
Addressing the Indian community in Paris, PM Modi highlighted India’s transformative growth over the past 12 years across infrastructure, digital technology, manufacturing, defence, space, innovation, healthcare and social development. He underscored the growing strength of the India-France Strategic Partnership, praised the Indian diaspora for serving as a vital bridge between the two nations and highlighted yoga and football as bonds connecting India and France.पॅरीसमधील भारतीय समुदायाला पंतप्रधानांचे संबोधन
June 18th, 09:30 pm
पंतप्रधानांनी 18 June 2026 रोजी पॅरीस इथे जमलेल्या भारतीय समुदायाला संबोधित केले. पंतप्रधानांचे कार्यक्रम स्थळी आगमन होताच उत्साहाने आणि रंगतदार स्वागत करण्यात आले. हे स्वागत मातृभूमीप्रती भारतीय समुदायाच्या मनातील आत्मीयतेचे प्रतिबिंब होते.पंतप्रधानांकडून भारतीय महिला फुटबॉल संघाचे सॅफ महिला अजिंक्यपद स्पर्धा 2026 विजेतेपदाबद्दल अभिनंदन
June 07th, 01:58 pm
सॅफ महिला अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये विजेतेपद मिळविल्याबद्दल भारतीय महिला फुटबॉल संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मध्ये उन्हाळ्याच्या उष्णतेपासून बचावासाठी उपाय सांगितले आणि नागरिकांना पुरेसे पाणी पिऊन शरीरात पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्याचा सल्ला दिला.
May 31st, 11:30 am
‘मन की बात’ मध्ये पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागांत आपल्या देशातले लोक देशहितासाठी, समाजहितासाठी अशा काही अद्भूत गोष्टी करत आहेत की, जेव्हा त्यांच्याबद्दल आपण ऐकतो तेव्हा आपल्याला एक नवीन प्रेरणा मिळते. आज कार्यक्रमाची सुरुवात मी ऍथलेटिक्समधील देशाच्या अशाच एका कामगिरीने करणार आहे. काही दिवसांपूर्वीच झारखंडच्या रांची येथे नॅशनल सिनियर ऍथलेटिक्स फेडरेशन स्पर्धा झाली. यामध्ये देशभरातून आलेल्या जवळजवळ 800 खेळाडूंनी भाग घेतला होता. यादरम्यान चार वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांमध्ये चार राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले. गुरिंदरवीर सिंह, विशाल टीके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार. या खेळाडूंनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केले. मी सर्वात आधी या सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.Sikkim has beautifully showcased the spirit of “Ek Bharat, Shreshtha Bharat”: PM Modi in Gangtok
April 28th, 10:25 am
Addressing the closing ceremony of Sikkim’s 50th Year of Statehood celebrations in Gangtok, Sikkim, PM Modi said the state exemplifies the spirit of ‘Ek Bharat, Shreshtha Bharat’. Highlighting tourism, sporting talent and the role of self-help groups in Sikkim, he termed the Northeast as India’s ‘Asht Lakshmi’ and called for collective efforts to accelerate Sikkim’s development and realise Viksit Bharat.गंगटोक येथे सिक्कीमच्या 50 व्या राज्यस्थापना दिन सोहळ्याच्या समारोप समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी
April 28th, 10:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिक्कीमच्या गंगटोक येथे सिक्कीमच्या राज्यस्थापनेच्या 50व्या वर्षाच्या समारोप सोहळ्याला उपस्थित राहून हजारो कोटी रुपयांच्या 30 हून अधिक विकास प्रकल्पांचा प्रारंभ आणि उद्घाटन केले.पंतप्रधानांनी सिक्कीममध्ये गंगटोक येथे युवकांसोबत फुटबॉलच्या उत्साही सत्रात भाग घेतला
April 28th, 09:46 am
सिक्कीममध्ये गंगटोक येथील प्रसन्न सकाळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी युवकांसोबत उत्साहपूर्ण वातावरणात फुटबॉलच्या खेळात सहभागी झाले.TMC came to power by lying in the name of “Maa, Maati, Manush”: PM Modi in Dakshin Dinajpur, West Bengal
April 11th, 11:40 am
PM Modi addressed a massive rally Dakshin Dinajpur, West Bengal. In his speech, he prioritised women’s safety, justice, and empowerment, outlining measures like fast-tracking cases, increasing women police recruitment, and financial support initiatives. He remarked that while the BJP believes in Sabka Saath, Sabka Vikas, it will also ensure that ‘hisaab’ is fulfilled in West Bengal.Massive public meetings in Purba Bardhaman, Jangipur & Dakshin Dinajpur, West Bengal
April 11th, 11:30 am
Tapping into the growing momentum in West Bengal, PM Modi addressed a massive public gathering in Purba Bardhaman, highlighting BJP’s vision for a fear-free, Viksit Bengal while launching a sharp attack on the TMC government over corruption, lawlessness and appeasement politics.पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' मध्ये पश्चिम आशियातील संकटावर मात करण्यासाठी 140 कोटी भारतीयांच्या एकजुटीवर विश्वास व्यक्त केला.
March 29th, 11:30 am
या महिन्याच्या 'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी पश्चिम आशियातील संघर्षावर भाष्य केले आणि या संकटावर मात करण्यासाठी एकजूट राहण्याच्या गरजेवर भर दिला. त्यांनी नागरिकांना अफवांना बळी न पडण्याचे आणि केवळ सरकारने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी ज्ञान भारतम सर्वेक्षण, खेळ आणि तंदुरुस्ती, जलसंधारण, मत्स्यपालन आणि सौर ऊर्जा अशा प्रमुख विषयांचाही उल्लेख केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (125 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
August 31st, 11:30 am
यंदाच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती, देशाची परीक्षा पाहत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून आपण पूर आणि दरडी कोसळल्यामुळे घडलेला हाहाःकार पाहिला आहे. अनेक घरांचे नुकसान झाले, शेतं पाण्याखाली गेली, कुटूंबच्या कुटुंबे उध्वस्त झाली, पाण्याच्या वेगवान प्रवाहात अनेक पूल वाहून गेले, रस्ते वाहून गेले , लोकांवर संकट कोसळलं. या घटनांमुळे प्रत्येक भारतीयाला दुःख झालं आहे. ज्या कुटुंबांनी प्रियजनांना गमावले, त्यांचं दुःख आपणा सर्वांचं दुःख आहे. जिथे कुठे आपत्ती आली, तिथल्या लोकांना वाचवण्यासाठी आपले एनडीआरएफ-एसडीआरएफ चे जवान , अन्य सुरक्षा दले प्रत्येकजण रात्रंदिवस बचावकार्यात सहभागी झाले होते. जवानांनी तंत्रज्ञानाची देखील मदत घेतली आहे. थर्मल कॅमेरे , लाईव्ह डिटेक्टर , स्निफर डॉग्स आणि ड्रोन द्वारे देखरेख अशा अनेक आधुनिक संसाधनांच्या सहाय्यानं मदतकार्याला गती देण्याचे पुरेपूर प्रयत्न केले गेले . या दरम्यानच्या काळात हेलिकॉप्टरद्वारे मदतसामग्री पोहचवण्यात आली, जखमींना हेलिकॉप्टरमधून उपचारांसाठी हलवण्यात आलं. या संकटसमयी सैन्यदलाची मोठी मदत झाली. स्थानिक लोक, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स, प्रशासन या सर्वांनी या संकटाच्या काळात शक्य ते सर्व प्रयत्न केले. या कठीण काळात मानवता धर्म सर्वोपरी मानून मदत करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे मी मनापासून आभार मानतो.ब्राझीलच्या राष्ट्रपतींसोबत संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी पत्रकारांना दिलेल्या निवेदनाचा मराठी मजकूर
July 08th, 08:30 pm
रिओ आणि ब्राझिलियामध्ये अतिशय जिव्हाळ्याने केलेल्या माझ्या स्वागताबद्दल मी माझे मित्र, राष्ट्राध्यक्ष लुला यांचे मनापासून आभार मानतो. अमेझॉनच्या सौंदर्याने आणि तुमच्या सह्रदयतेने आम्ही खरोखरच प्रभावित झालो आहोत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (123 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
June 29th, 11:30 am
माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार! 'मन की बात’ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन! तुम्ही सर्वजण यावेळी योगाची ऊर्जा आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या स्मृतींमध्ये रमून गेले असाल. यावर्षीही 21 जून रोजी देश-विदेशातील कोट्यवधी लोक आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तुम्हाला आठवतंय, 10 वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली. या 10 वर्षांमध्ये हा दिवस दरवर्षी आधीच्यापेक्षा अधिक उत्साहात, भव्य स्वरूपात होत आहे.For me, the nation itself is divine and mankind is a reflection of the divine: PM Modi in Lex Fridman Podcast
March 16th, 11:47 pm
PM Modi interacted with Lex Fridman in a podcast about various topics ranging from fasting to his humble beginnings to AI and more. He stressed on the unifying power of sports and said that they connect people on a deeper level and energize the world. He remarked that the management of Indian elections should be studied worldwide.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टमध्ये लेक्स फ्रिडमन यांच्याशी साधला संवाद
March 16th, 05:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टच्या माध्यमातून आज अमेरिकी संगणक शास्त्रज्ञ लेक्स फ्रिडमन यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. या मनमोकळ्या संभाषणादरम्यान जेव्हा पंतप्रधानांना विचारण्यात आले की ते उपवास का करतात आणि कशा पद्धतीने करतात तेव्हा मोदी यांनी पंतप्रधानांप्रती आदराचे प्रतीक म्हणून स्वतः उपवास धरण्याच्या लेक्स फ्रिडमन यांच्या कृतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “भारतात धार्मिक परंपरा दैनंदिन जीवनासोबत खोलवर रुजलेल्या आहेत ,” असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या अर्थानुसार, हिंदुत्व हे केवळ धार्मिक रीतीभातीविषयीचे तत्व नसून जीवनाला मार्गदर्शन करणारे तत्वज्ञान आहे असे त्यांनी सांगितले. उपवास हे शिस्त अंगी बाणवण्यासाठीचे तसेच आंतरिक आणि बाह्य आत्म्याचा समतोल साधण्यासाठीचे साधन आहे यावर मोदी यांनी अधिक भर दिला. उपवास केल्यामुळे आपल्या जाणीवा अधिक संवेदनशील तसेच जागरूक होऊन अधिक प्रखर बनतात असे त्यांनी नमूद केले. उपवासाच्या काळात कोणाकोणाला सूक्ष्म सुगंध आणि तपशील अधिक स्पष्टपणे जाणवतात असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. उपवासामुळे विचार प्रक्रियेला वेग येऊन नवीन दृष्टीकोन सापडत जातात आणि चौकटीबाहेरच्या विचारांना प्रोत्साहन मिळते असे देखील पंतप्रधानांनी अधोरेखित केले. उपवास म्हणजे केवळ अन्न वर्ज्य करणे नव्हे तर त्यामध्ये मनाची तसेच शरीराची तयारी आणि विषारी तत्वांचे निःसारण करण्याची शास्त्रीय प्रक्रिया समाविष्ट आहे असे त्यांनी स्पष्ट केले. कितीतरी दिवस आधीच ते आयुर्वेदिक आणि योग प्रक्रियांचे अनुसरण करून ते उपवासासाठी त्यांच्या शरीराला सज्ज करतात यावर अधिक भर देऊन पंतप्रधान मोदी यांनी या काळात पाणी पीत राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की एकदा उपवास सुरु झाला की त्यानंतर ते त्याला भक्ती आणि स्वयंशिस्तीची कृती मानतात आणि त्या काळात सखोल आत्मचिंतन आणि लक्ष एकाग्र करण्यावर भर देतात. पंतप्रधान म्हणाले की त्यांच्या उपवासाचे मूळ वैयक्तिक अनुभवामध्ये असून त्यांच्या शालेय जीवनादरम्यान महात्मा गांधी यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या चळवळीदरम्यान उपवास धरण्याची सुरुवात त्यांनी केली. त्यांच्या पहिल्याच उपवासादरम्यान त्यांना उर्जा आणि जागरुकता यामध्ये मोठी वाढ होत असल्याची अनुभूती आली आणि त्यातून उपवासाच्या परिवर्तनशील सामर्थ्याबद्दल त्यांची खात्री झाली असा अनुभव पंतप्रधानांनी सर्वांना सांगितला. उपवासामुळे त्यांच्या क्रिया मंद होत नाहीत तर उलट बहुतेकदा त्यांची उत्पादकता वाढते असे त्यांनी आवर्जून नमूद केले. ते म्हणाले की उपवासादरम्यान त्यांच्या विचारांचा ओघ अधिक मुक्तपणे आणि सर्जकतेसह वाहतो आणि त्यांच्यासाठी तो स्वतःला व्यक्त करण्याचा एक अतुलनीय अनुभव होऊन जातो.Prime Minister attends Arabian Gulf Cup as Guest of Honour of His Highness the Amir of Kuwait
December 21st, 10:24 pm
On the invitation of His Highness Sheikh Meshal Al-Ahmad Al-Jaber Al-Sabah, the Amir of Kuwait, Prime Minister Shri Narendra Modi attended the opening ceremony of the 26th Arabian Gulf Cup in Kuwait as his ‘Guest of Honour’.The entire North East is the Ashtalakshmi of India: PM at Bodoland Mohotsov
November 15th, 06:32 pm
Prime Minister Shri Narendra Modi today inaugurated the 1st Bodoland Mohotsav, a two day mega event on language, literature, and culture to sustain peace and build a Vibrant Bodo Society. Addressing the gathering, Shri Modi greeted the citizens of India on the auspicious occasion of Kartik Purnima and Dev Deepavali. He greeted all the Sikh brothers and sisters from across the globe on the 555th Prakash Parva of Sri Gurunanak Dev ji being celebrated today. He also added that the citizens of India were celebrating the Janjatiya Gaurav Divas, marking the 150th birth anniversary of Bhagwan Birsa Munda. He was pleased to inaugurate the 1st Bodoland Mohotsav and congratulated the Bodo people from across the country who had come to celebrate a new future of prosperity, culture and peace.