उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे विविध प्रकल्पांचा शिलान्यास आणि नवीन प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
April 11th, 11:00 am
व्यासपीठावर उपस्थित असलेल्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक, उपस्थित असलेले मंत्री, इतर लोकप्रतिनिधी, बनास दुग्धालयाचे अध्यक्ष शंकरभाई चौधरी आणि येथे इतक्या मोठ्या संख्येने आशीर्वाद देण्यासाठी आलेले माझे सर्व कुटुंबिय,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशात वाराणसी इथे 3,880 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन
April 11th, 10:49 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशात वाराणसी इथे 3,880 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. काशीसोबत आपले गहीरे नाते असल्याचे ते म्हणाले. इथले लोक आपल्या कुटुंबातील सदस्यांसारखेच आहेत आणि त्यांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल आपण त्यांचा अत्यंत आभारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. लोकांनी दिलेल्या याच प्रेम आणि पाठबळामुळे आपण धन्य झालो असल्याचेही त्यांनी नमूद केले. काशी आपली आहे आणि आपण काशीचे आहोत, असेही ते म्हणाले. उद्या हनुमान जन्मोत्सवाचा शुभ प्रसंग आहे, याचा उल्लेख करत काशीमध्ये संकट मोचन महाराजांच्या दर्शनाला जाण्याची संधी मिळणे, हे आपले भाग्य आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. हनुमान जन्मोत्सवापूर्वी, काशीतील नागरिक विकासाचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.बावलिया धाम येथील कार्यक्रमात पंतप्रधानांच्या संवादाचा मजकूर
March 20th, 04:35 pm
गेल्या आठवड्यात भावनगरची भूमी भगवान श्रीकृष्णाचे वृंदावन बनल्यासारखी वाटली आणि सोन्याहून पिवळे व्हावे तशी आमच्या भाईजींची भागवत कथा होती. ज्या प्रकारची भक्ती वाहत होती, वातावरण असे होते की लोक कृष्णामध्ये न्हाऊन गेले होते. माझ्या प्रिय नातेवाईकांनो, बावलिया धाम हे ठिकाण केवळ धार्मिक स्थळ नाही तर ते भरवाड समाजासह अनेकांसाठी श्रद्धा, संस्कृती आणि एकतेचे प्रतीक आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बावलियाली धामच्या कार्यक्रमाला केले संबोधित
March 20th, 04:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे गुजरातच्या भारवाड समाजाशी संबंधित बावलियाली धामच्या कार्यक्रमात आपले विचार मांडले. उपस्थितांना संबोधित करताना मोदी यांनी महंत श्री राम बापू जी, समुदायाचे नेते आणि उपस्थित हजारो भाविकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.