गोव्यामधील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्धापनदिन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

November 28th, 03:35 pm

आज या पवित्र प्रसंगी मनामध्ये खोलवर शांतता भरली आहे. साधू-संतांच्या सानिध्यामध्ये बसल्यानंतर आपोआपच आध्यात्मिक अनुभव येत असतो. इथे विशाल संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांमुळे लक्षात येते की, या मठाची शतकांपासूनच प्राचीन जीवंत शक्ती आजही वृद्धिंगत होत आहे. आज या समारंभाला मला उपस्थित राहता आले, याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान मानतो. इथे येण्यापूर्वी मला राम मंदिर आणि वीर विठ्ठल मंदिराचे दर्शन करण्याचे भाग्य लाभले. त्या शांत वातावरणाने या कार्यक्रमाच्या आध्यात्मिकतेला आणखी सखोलता प्राप्त झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्षपूर्ती समारंभाला केले संबोधित

November 28th, 03:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्षपूर्ती समारंभाला संबोधित केले. या पवित्र प्रसंगी आपले मन गहन शांतीने भरले आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. संतांच्या उपस्थितीत, त्यांच्या सोबत बसणे हा स्वतःच एक आध्यात्मिक अनुभव आहे, यावर त्यांनी भर दिला. येथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भक्तांमुळे या मठाची शतकानुशतके जुनी जिवंत शक्ती आणखी वाढली आहे, असे नमूद करून मोदी म्हणाले की, आज या समारंभात लोकांमध्ये उपस्थित राहणे हे आपले भाग्य आहे. येथे येण्यापूर्वी आपल्याला राम मंदिर आणि वीर विठ्ठल मंदिराला भेट देण्याचा सौभाग्य लाभले, असे त्यांनी सांगितले. तेथील शांतता आणि तिथल्या वातावरणामुळे या समारंभाची आध्यात्मिकता अधिक सखोल झाली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

उडुपी येथील श्रीकृष्ण मठातील लक्षकंठ गीता पारायण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

November 28th, 11:45 am

मी माझे भाषण सुरु करण्यापूर्वी — इथे काही मुलं चित्र काढून घेऊन आली आहेत. SPG चे लोक आणि स्थानिक पोलिस थोडी मदत करतील का, ती चित्रं गोळा करण्यासाठी? जर तुम्ही त्याच्या मागे तुमचा पत्ता लिहिला असेल, तर मी नक्कीच तुम्हाला आभारपत्र पाठवेन. ज्यांनी जे काही आणले असेल, ते देऊन टाका, ते गोळा करतील आणि मग तुम्ही निवांत बसू शकता. ही मुले इतकी मेहनत करतात, आणि कधी कधी, मीच त्यांच्या बाबतीत अन्याय करतो असं वाटतं, तेव्हा मला खूप वाईट वाटतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील उडुपी येथील श्री कृष्ण मठातील 'लक्ष कंठ गीता पारायण' कार्यक्रमाला केले संबोधित

November 28th, 11:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातील उडुपी येथील श्री कृष्ण मठातील 'लक्ष कंठ गीता पारायण' कार्यक्रमाला संबोधित केले. भगवान श्रीकृष्णाचे दिव्य दर्शनाचे समाधान, श्रीमद् भगवद्गीतेच्या मंत्रांचा आध्यात्मिक अनुभव आणि इतक्या पूज्य संत आणि गुरूंची उपस्थिती, हे आपल्यासाठी एक परम भाग्य आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. हे असंख्य आशीर्वादांची प्राप्ती करण्यासारखे आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

पंतप्रधानांनी गोव्यात झालेल्या आयर्नमॅन 70.3 सारख्या स्पर्धांमधील युवकांच्या वाढत्या सहभागाचे स्वागत केले

November 09th, 10:00 pm

मोदी म्हणाले, “या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांचे अभिनंदन. विशेष आनंद आहे की आपले दोन तरुण सहकारी, अनामलाई आणि तेजस्वी सूर्या यांनी आयर्नमॅन ट्रायथलॉन यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.”

आयसीसी महिला विश्वचषक विजेत्या संघांशी पंतप्रधानांनी साधलेल्‍या संवादाचा मजकूर

November 06th, 10:15 am

माननीय पंतप्रधान महोदय, खूप खूप धन्यवाद. आम्हाला येथे येणे हा मोठा सन्मान आणि अभिमानाचा क्षण वाटतो. फक्त या मोहिमेबद्दल एक सांगू इच्छितो, या मुलींनी कमाल केली आहे, देशाच्या मुलींनी कमाल केली आहे. दोन वर्षांपासून मेहनत करत होत्या, सर, इतकी मेहनत की काय सांगू, प्रत्येक सराव सत्रामध्ये जोमाने खेळल्या, प्रत्येक सरावात तेवढ्याच ऊर्जेने मैदानात उतरल्या. इतकी मेहनत घेतली की आज त्या मेहनतीचं फळ मिळाले आहे.

पंतप्रधानांनी आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या विजेत्या संघासोबत साधला संवाद

November 06th, 10:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत 7, लोक कल्याण मार्ग येथे आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या विजेत्या संघासोबत संवाद साधला. भारतीय संघाने रविवारी 2 नोव्हेंबर 2025 रोजी अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या संघावर मात केली होती. पंतप्रधानांनी काल देव दिवाळी आणि गुरुपूरब असल्याने हा दिवस विशेष असल्याचे सांगून सर्व उपस्थितांना या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

नवा रायपुर येथील सत्य साई संजीवनी बाल हृदय रुग्णालयात हृदयरोगावर यशस्वी शस्त्रक्रिया झालेल्या लहान मुलांशी पंतप्रधान मोदींनी साधलेला संवाद

November 01st, 05:30 pm

मी हॉकीची चँपियन आहे, मी हॉकीमध्ये 5 पदके मिळवली आहेत, माझ्या शाळेत तपासणी झाली होती तेव्हा मला कळलं की माझ्या हृदयाला छिद्र आहे, त्यानंतर मी इथे आले, मग माझ्यावर शस्त्रक्रिया झाली , आता मी इथे हॉकी खेळू शकते आहे.

जन्मापासून जडलेल्या हृदयविकारांवर मात केलेल्या मुलांशी पंतप्रधानांनी साधला संवाद

November 01st, 05:15 pm

दिल की बात या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्तीसगडमधील नवा रायपूर इथल्या श्री सत्य साई संजीवनी रुग्णालयात आयोजित केलेल्या गिफ्ट ऑफ लाईफ या उपक्रमाच्या निमित्ताने जन्मापासून जडलेल्या हृदयविकारांवर यशस्वी उपचार घेतलेल्या 2,500 मुलांशी संवाद साधला.

नवी दिल्ली 7 लोक कल्याण मार्ग इथे राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांच्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन

September 04th, 05:35 pm

आपल्याकडे शिक्षकांप्रति नैसर्गिक आदर, सन्मानाची भावना असते आणि ते समाजाची मोठी ताकद असतात. शिक्षकांना आशीर्वाद देणे, हे अयोग्य/पाप आहे. त्यामुळे मी हे पाप करू इच्छित नाही. मी आपल्याशी जरूर संवाद साधू इच्छितो. माझ्यासाठी हा एक खूपच छान अनुभव होता की तुम्हा सगळ्यांना... खरं तर तुम्हा सगळ्यांना नाही तर तुम्हांला मला भेटणे, कारण आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनात स्वतःची एक कहाणी असेल, त्याशिवाय इथपर्यंत पोहोचू शकला नसतात. पण इतका वेळ काढणे कठीण असते. तरीही मला तुमच्या सर्वांकडून तुमच्याबद्दल थोडंफार जाणून घेण्याची संधी मिळाली, ती नक्कीच प्रेरणादायी आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणे हा शेवट असू शकत नाही. आपल्या सर्वांवर सगळ्यांचे लक्ष असेल, या पुरस्कारानंतर सर्वांचे लक्ष असेल. याचा अर्थ आपल्या सर्वांची पोहोच वाढली आहे. यापुर्वी तुमचे प्रभाव क्षेत्र किंवा कार्यक्षेत्र असेल ते या पुरस्कारानंतर वृद्धिंगत होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या शिक्षकांना संबोधित केले

September 04th, 05:33 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या शिक्षकांना संबोधित केले. शिक्षक वर्गाला राष्ट्र-उभारणीतील मजबूत शक्ती संबोधत पंतप्रधान मोदी यांनी शिक्षकांना भारतीय समाजात दिल्या जात असलेल्या नैसर्गिक सन्मानाचे कौतुक केले. शिक्षकांचा गौरव करणे ही केवळ एक रीत किंवा पद्धत नसून त्यांच्या आयुष्यभराच्या समर्पणाला आणि प्रभावाला दिलेली मान्यता असते यावर त्यांनी अधिक भर दिला.

स्वावलंबन हा 2047 पर्यंत विकसित भारताकडे नेणारा मार्ग: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

July 27th, 11:30 am

‘मन की बात’मध्ये पुन्हा एकदा चर्चा होईल ती देशाला मिळालेल्या यशाची, देशवासियांनी केलेल्या कामगिरीची! गेल्या काही आठवड्यामध्ये क्रीडा क्षेत्र असो, विज्ञान असो अथवा संस्कृतीचे क्षेत्र असो, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, अशी कामगिरी अनेकांनी केली आहे. अलिकडेच शुभांशू शुक्ला हे अवकाशातून परतले, याविषयी संपूर्ण देशामध्ये खूप चर्चा झाली. शुभांशू सुरक्षित भूमीवर परतताच लोकांच्या हृदयामध्ये जणू एक आनंदाची लाट उसळली. संपूर्ण देशाला शुभांशू यांच्या कामगिरीविषयी अभिमान वाटला. अशावेळी मला एका घटनेचं स्मरण होत आहे. ज्यावेळी ऑगस्त 2023 मध्ये चंद्रयान-3 यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले, त्यावेळीही देशामध्ये अशाच प्रकारचे अनोखे वातावरण तयार झाले होते. विज्ञानापासून ते अंतराळापर्यंतच्या विषयांमध्‍ये अगदी लहान-लहान मुलांमध्येही एक नवीन जिज्ञासा, उत्सुकता जागृत झाली होती. आता लहान-लहान मुलेही म्हणताहेत की, आम्हीही अंतराळामध्ये जाणार! आम्हीही चंद्रावर जाणार, अंतराळ संशोधक बनणार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (123 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

June 29th, 11:30 am

माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार! 'मन की बात’ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन! तुम्ही सर्वजण यावेळी योगाची ऊर्जा आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या स्मृतींमध्ये रमून गेले असाल. यावर्षीही 21 जून रोजी देश-विदेशातील कोट्यवधी लोक आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तुम्हाला आठवतंय, 10 वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली. या 10 वर्षांमध्ये हा दिवस दरवर्षी आधीच्यापेक्षा अधिक उत्साहात, भव्य स्वरूपात होत आहे.

11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

June 21st, 07:06 am

आंध्र प्रदेश चे राज्यपाल सय्यद अब्दुल नजीर जी, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री आणि माझे परममित्र चंद्राबाबू नायडू गारू, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहयोगी के. राममोहन नायडू जी, प्रतापराव जाधव जी, चंद्रशेखरजी भूपती राजू श्रीनिवास वर्मा जी, राज्याचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण गारू, अन्य मान्यवर तसेच माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो! तुम्हा सर्वांना माझा नमस्कार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्याला केले संबोधित

June 21st, 06:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे आयोजित 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सोहळ्याला संबोधित केले. पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभाचे नेतृत्व केले आणि योगसाधना सत्रात भाग घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (122 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

May 25th, 11:30 am

आज संपूर्ण देश दहशतवादाविरुद्ध एक झाला आहे, संतापानं क्रुद्ध आहे, संकल्पसिद्ध आहे. आज प्रत्येक भारतीयाचा एकच निर्धार आहे, की 'आपल्याला दहशतवाद संपवायचाच आहे.'

जागतिक यकृत दिनानिमित्त पंतप्रधानांनी नागरिकांना सजग आहार पद्धतीचा अंगीकार करण्याचे आणि लठ्ठपणाविरुद्ध लढा देण्याचे केले आवाहन

April 19th, 01:13 pm

जागतिक यकृत दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना सजग आहार पद्धती स्वीकारण्याचे आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. छोट्या पण परिणामकारक बदलांचे महत्त्व अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी असे नमूद केले की, तेलाचे सेवन कमी करणे यासारखी साधी कृतीही एकूण आरोग्य आणि निरामयता सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (120 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

March 30th, 11:30 am

माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. आज या अत्यंत शुभ दिवशी मला तुमच्यासोबत 'मन की बात' करण्याची संधी मिळाली आहे. आज चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातली प्रतिपदा तिथी आहे. आजपासून चैत्र नवरात्राला प्रारंभ होत आहे. भारतीय नववर्ष देखील आजपासून सुरू होत आहे. यावेळी विक्रम संवत 2082 (दोन हजार ब्याऐंशी) सुरू होत आहे. सध्या तुमची अनेक पत्रं माझ्यासमोर आहेत. काही बिहारची आहेत, काही बंगालची आहेत, काही तामिळनाडूची तर काही गुजरातची आहेत. यामध्ये लोकांनी त्यांचे विचार अतिशय मनोरंजक पद्धतीनं लिहिले आहेत. अनेक पत्रांमध्ये शुभेच्छा आणि अभिनंदनाचे संदेश देखील आहेत. पण आज मला काही संदेश तुम्हाला ऐकवावेसे वाटत आहेत -

For me, the nation itself is divine and mankind is a reflection of the divine: PM Modi in Lex Fridman Podcast

March 16th, 11:47 pm

PM Modi interacted with Lex Fridman in a podcast about various topics ranging from fasting to his humble beginnings to AI and more. He stressed on the unifying power of sports and said that they connect people on a deeper level and energize the world. He remarked that the management of Indian elections should be studied worldwide.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टमध्ये लेक्स फ्रिडमन यांच्याशी साधला संवाद

March 16th, 05:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टच्या माध्यमातून आज अमेरिकी संगणक शास्त्रज्ञ लेक्स फ्रिडमन यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. या मनमोकळ्या संभाषणादरम्यान जेव्हा पंतप्रधानांना विचारण्यात आले की ते उपवास का करतात आणि कशा पद्धतीने करतात तेव्हा मोदी यांनी पंतप्रधानांप्रती आदराचे प्रतीक म्हणून स्वतः उपवास धरण्याच्या लेक्स फ्रिडमन यांच्या कृतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “भारतात धार्मिक परंपरा दैनंदिन जीवनासोबत खोलवर रुजलेल्या आहेत ,” असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या अर्थानुसार, हिंदुत्व हे केवळ धार्मिक रीतीभातीविषयीचे तत्व नसून जीवनाला मार्गदर्शन करणारे तत्वज्ञान आहे असे त्यांनी सांगितले. उपवास हे शिस्त अंगी बाणवण्यासाठीचे तसेच आंतरिक आणि बाह्य आत्म्याचा समतोल साधण्यासाठीचे साधन आहे यावर मोदी यांनी अधिक भर दिला. उपवास केल्यामुळे आपल्या जाणीवा अधिक संवेदनशील तसेच जागरूक होऊन अधिक प्रखर बनतात असे त्यांनी नमूद केले. उपवासाच्या काळात कोणाकोणाला सूक्ष्म सुगंध आणि तपशील अधिक स्पष्टपणे जाणवतात असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. उपवासामुळे विचार प्रक्रियेला वेग येऊन नवीन दृष्टीकोन सापडत जातात आणि चौकटीबाहेरच्या विचारांना प्रोत्साहन मिळते असे देखील पंतप्रधानांनी अधोरेखित केले. उपवास म्हणजे केवळ अन्न वर्ज्य करणे नव्हे तर त्यामध्ये मनाची तसेच शरीराची तयारी आणि विषारी तत्वांचे निःसारण करण्याची शास्त्रीय प्रक्रिया समाविष्ट आहे असे त्यांनी स्पष्ट केले. कितीतरी दिवस आधीच ते आयुर्वेदिक आणि योग प्रक्रियांचे अनुसरण करून ते उपवासासाठी त्यांच्या शरीराला सज्ज करतात यावर अधिक भर देऊन पंतप्रधान मोदी यांनी या काळात पाणी पीत राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की एकदा उपवास सुरु झाला की त्यानंतर ते त्याला भक्ती आणि स्वयंशिस्तीची कृती मानतात आणि त्या काळात सखोल आत्मचिंतन आणि लक्ष एकाग्र करण्यावर भर देतात. पंतप्रधान म्हणाले की त्यांच्या उपवासाचे मूळ वैयक्तिक अनुभवामध्ये असून त्यांच्या शालेय जीवनादरम्यान महात्मा गांधी यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या चळवळीदरम्यान उपवास धरण्याची सुरुवात त्यांनी केली. त्यांच्या पहिल्याच उपवासादरम्यान त्यांना उर्जा आणि जागरुकता यामध्ये मोठी वाढ होत असल्याची अनुभूती आली आणि त्यातून उपवासाच्या परिवर्तनशील सामर्थ्याबद्दल त्यांची खात्री झाली असा अनुभव पंतप्रधानांनी सर्वांना सांगितला. उपवासामुळे त्यांच्या क्रिया मंद होत नाहीत तर उलट बहुतेकदा त्यांची उत्पादकता वाढते असे त्यांनी आवर्जून नमूद केले. ते म्हणाले की उपवासादरम्यान त्यांच्या विचारांचा ओघ अधिक मुक्तपणे आणि सर्जकतेसह वाहतो आणि त्यांच्यासाठी तो स्वतःला व्यक्त करण्याचा एक अतुलनीय अनुभव होऊन जातो.