मुंबईतील वेव्हज परिषदमध्ये पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद
May 01st, 03:35 pm
वेव्हज परिषदे मध्ये उपस्थित महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन जी, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव जी, एल. मुरुगन जी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, अजित पवार जी, जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेले सृजनशील विश्वातील सर्व मान्यवर, विविध देशांतून आलेले माहिती, संवाद, कला आणि संस्कृती विभागांचे मंत्री, विविध देशांचे राजदूत, जगभरातील सृजनशील विश्वातील चेहरे, इतर मान्यवर, बंधूंनो आणि भगिनींनोपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वेव्हज 2025 चे उद्घाटन
May 01st, 11:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे भारतातील पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, त्यांनी आज साजरा होत असलेल्या महाराष्ट्र दिन आणि गुजरात राज्य स्थापना दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. सर्व आंतरराष्ट्रीय मान्यवर, राजदूत आणि सृजनशील उद्योगातील अग्रणींच्या उपस्थितीचे कौतुक करत, पंतप्रधानांनी या मेळाव्याचे महत्त्व अधोरेखित केले. 100 हून अधिक देशांचे कलाकार, नवोन्मेषक, गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते, प्रतिभा आणि सृजनशीलतेच्या जागतिक परिसंस्थेचा पाया रचण्यासाठी एकत्र आले आहेत यावर त्यांनी भर दिला. वेव्हज ही केवळ एक संक्षिप्त संज्ञा नव्हे तर संस्कृती, सृजनशीलता आणि सार्वत्रिक कनेक्टिव्हिटीचे प्रतिनिधित्व करणारी एक लाट आहे, असे त्यांनी नमूद केले. ही शिखर परिषद चित्रपट, संगीत, गेमिंग, अॅनिमेशन आणि कथाकथनाच्या विस्तृत जगाचे प्रदर्शन करते, तसेच कलाकार आणि सर्जकांचा संवाद साधून त्यांच्या सहयोगासाठी एक जागतिक मंच प्रदान करत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. पंतप्रधानांनी या ऐतिहासिक प्रसंगी सर्व सहभागींचे अभिनंदन केले आणि देश-विदेशातील मान्यवर अतिथींचे हार्दिक स्वागत केले.पंतप्रधानांनी दिग्गज अभिनेते आणि चित्रपट निर्माते मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला
April 04th, 08:34 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिग्गज अभिनेते आणि चित्रपट निर्माते मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी मनोज कुमार यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील एक आदर्श व प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व म्हणून गौरवले असून, त्यांच्या देशभक्तीने भरलेल्या चित्रपटांमुळे ते विशेषतः लक्षात राहतील, असे म्हटले.एम. टी. वासुदेवन नायर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला.
December 26th, 10:16 am
मल्याळम चित्रपट आणि साहित्य क्षेत्रातील सर्वात आदरणीय व्यक्तींपैकी एक, एम. टी. वासुदेवन नायर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. एम. टी. वासुदेवन नायर यांच्या कार्याने मानवी भावनांचा सखोल शोध घेऊन अनेक पिढ्यांना आकार दिला आहे आणि त्यांचे कार्य यापुढेही अनेकांना प्रेरणा देत राहतील, अशा शब्दात पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.ज्येष्ठ चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले
December 23rd, 11:00 pm
ज्येष्ठ चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान चित्रकर्मी राज कपूर यांना त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त वाहिली आदरांजली
December 14th, 11:17 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान चित्रकर्मी राज कपूर यांना आज त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त आदरांजली वाहिली. राज कपूर हे दूरदृष्टी लाभलेले चित्रपट निर्माते, अभिनेते आणि महान शोमॅन होते, असे त्यांनी म्हटले आहे. राज कपूर हे केवळ चित्रपटनिर्माते नव्हते तर भारतीय चित्रपटांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारे एक सांस्कृतिक राजदूत होते, चित्रपटनिर्मिती आणि अभिनय क्षेत्रातील पुढील अनेक पिढ्या त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकू शकतात, असे पंतप्रधान म्हणाले.श्री बुद्धदेव दासगुप्ता यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केल्या शोकभावना
June 10th, 11:44 am
चित्रपट कर्मी, विचारवंत आणि कवी श्री बुद्धदेव दासगुप्ता यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.