मत्स्यव्यवसाय आणि मत्स्यपालन पायाभूत सुविधा विकास निधी (FIDF) च्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
February 08th, 09:13 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मत्स्यपालन पायाभूत सुविधा विकास निधीला (FIDF) आणखी 3 वर्ष म्हणजेच 2025-26 पर्यंत वाढवण्याला मान्यता दिली आहे. या साठी 7522.48 कोटी रुपयांचा निधी आधीच मंजूर झाला आहे तसेच 939.48 कोटी रुपयांचे अर्थसंकल्पीय सहाय्यही देण्यात आले आहे.