पंतप्रधानांनी 2025 फिडे जागतिक जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल अर्जुन एरिगैसी चे केले अभिनंदन

December 29th, 03:38 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोहा येथे झालेल्या 2025 फिडे जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यपद स्पर्धेच्या खुल्या गटात कांस्यपदक जिंकल्याबद्दल अर्जुन एरिगैसी याचे अभिनंदन केले आहे. त्याचा दृढनिश्चय कौतुकास्पद आहे. भविष्यातील वाटचालीसाठी त्याला खूप खूप शुभेच्छा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिडे जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धा 2025 मध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल कोनेरू हम्पीचे केले अभिनंदन

December 29th, 03:35 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोहा येथे झालेल्या फिडे जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धा 2025 मध्ये महिला गटात उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक जिंकल्याबद्दल कोनेरू हम्पी यांचे अभिनंदन केले आहे. खेळाप्रती त्यांची निष्ठा प्रशंसनीय आहे. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा, अशा शुभेच्छा पंतप्रधानांनी दिल्या.