पंजाबमधील फिरोजपूर येथे झालेल्या दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त; पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून आर्थिक मदतीची घोषणा
June 06th, 06:22 pm
पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात झालेल्या दुर्दैवी अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीव्र दुःख व्यक्त केले. या अपघातात मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती पंतप्रधानांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या असून जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली आहे. या दुर्घटनेतील प्रत्येक मृत व्यक्तीच्या वारसाला 'पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी'मधून 2 लाख रुपये, तसेच, अपघातातील जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये देण्यात येतील, असे त्यांनी जाहीर केले.पंतप्रधान 5 जानेवारी 2022 रोजी पंजाबला भेट देऊन तेथील 42,750 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांची कोनशीला ठेवणार
January 03rd, 03:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 जानेवारी 2022 रोजी पंजाबमधील फिरोजपूर येथे भेट देणार आहेत आणि दुपारी 1 वाजता तेथील 42,750 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची कोनशीला ठेवणार आहेत. या प्रकल्पांमध्ये दिल्ली-अमृतसर-कटरा द्रुतगती महामार्ग, अमृतसर-उना टप्प्याचे चौपदरीकरण, मुकेरीयन-तलवारा दरम्यान नवा ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, फिरोजपूर येथे पीजीआय सॅटेलाईट केंद्र उभारणी तसेच कपूरथला आणि होशियारपूर यथे दोन वैद्यकीय विद्यापीठांची स्थापना करण्याच्या प्रकल्पांचा समावेश आहे.PM Modi celebrates Diwali with Soldiers
November 11th, 05:02 pm